झाडे लावा झाडे जगवा

Featured Image-zade lava zade jagva

झाडे लावा झाडे जगवा निबंध

झाडे हा पर्यावरणातील आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. झाडांपासून ऑक्सिजन आणि बाकी सर्व घटक मिळतात. जर झाडे नसती तर निसर्ग चक्रं बिघडले असते. सगळीकडे ओसाड माळरान, रिकामा आणि भकास असं वाटले असते.

पर्यावरणात झाडे आहेत म्हणून वेगवेगळ्या प्रजाती जिवंत आहेत, तसेच वेगवेगळे पक्षी झाडांवर येऊन राहतात. फळे-फुले सगळे आपल्याला झाडांमुळेच मिळतात. जर झाडे नसतील तर नुसतच जमीन आणि रिकामी माळरान इतकंच राहिले असते. थोडं फार नको असलेले गवत आजूबाजूला दिसल असता, परंतु झाडांमुळे हिरवळ आहे. झाडांमुळे पक्षी आनंदाने या पृथ्वीतलावावर राहतात. तसेच जर झाडे नसती तर माणूस जिवंत राहिला नसता.

जर झाडे नसती तर सूर्यामुळे जमिनीवरचे सगळे पाणी आटलं असते. म्हणजेच काय तर निसर्गचक्र नीट राहावं यासाठी झाडांचा खूप मोठा वाटा असतो. पाऊस पडण्यासाठी तसेच पाणी जमिनीच्या खाली झिरपण्यासाठी देखील झाडांचा मोठा वाटा असतो.

आपण रस्त्यावरती चालत असताना, जर एखादे झाड असेल, तर त्याच्या सावलीमध्ये दोन मिनिट विश्रांती घ्यायला आपल्याला खूप बरे वाटते. जेव्हा कडक ऊन असते तेव्हा झाडां इतके चांगले सावली कोणीच देत नाही. झाडाच्या सावलीत आल्यावर लगेचच आपल्याला थंड हवा मिळायला सुरुवात होते. झाडे माणसासाठी खूप जास्त प्रमाणात महत्त्वाची असतात. त्याचप्रमाणे ती प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी देखील महत्त्वाची असतात, झाडांवरती अगदी छोट्या पासून छोटे जीव जसं की मुंग्या, डोंगळे, मधमाशा, फुलपाखरू यांपासून ते अगदी माकडांपर्यंत सर्व जण आनंदाने राहतात.

जंगली प्राणी जे शाकाहारी प्राणी असतात, ते तर झाडांशिवाय जगू शकत नाहीत. त्यांच्या अन्नाचा मुख्य स्त्रोत ही झाडेच असतात. माणूस हा जरी शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी असला तरी सुद्धा जो भारतात शाकाहारी वर्ग आहे. त्यांच्यासाठी झाडापासून मिळणाऱ्या गोष्टी हा अन्नाचा एकमेव स्त्रोत असतो. त्यामुळे जर झाडे नसतील तर माणूस खरंच जिवंत राहू शकत नाही.

तसेच झाडांमुळे अजून एक महत्वाचा फायदा होतो. जर पावसाची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढली असेल, तर झाडांमध्ये इतकी ताकद असते की ते सर्व पाणी शोषून घेतात. पण जर पृथ्वीवर झाडेच नसतील तर या पाण्याची पातळी खूप वाढली असती, मग बर्फ वितळून खूप जास्त पाऊस पडून पृथ्वीवर पूर आला असता. कारण पाणी जमिनीत जिरपायला आणि कुठे जायला वाटच फुटली नसती. त्यामुळे आतापर्यंत पूर्ण पृथ्वीवर पूर घेऊन सगळे वाहून गेला असता, कोणीच जिवंत राहू शकळे नसते. ना प्राणी, न पक्षी, न माणूस.

सगळ्यात मोठे कारण म्हणजे माणसाला ऑक्सिजन हा फक्त झाडांपासूनच मिळतो. म्हणजेच काय तर झाडांमध्येच एवढी ताकद असते की पर्यावरणातील ‘कार्बन डाय-ऑक्साइड’ आत घेऊन ‘ऑक्सिजन’ बाहेर सोडायचा. ही प्रक्रिया फक्त झाडांमध्ये असते. त्यामुळे प्राण्यांना आणि माणसांना मिळणारा ऑक्सिजन हा झाडांपासूनच मिळत. माणूस काय स्वतःहून ऑक्सिजन कधीच तयार करू शकत नाही. माणूस जो ऑक्सिजन तयार करतो ते फक्त गरजेच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये वापरले जातात.

 माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत, ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या तिन्ही देखील झाडांमुळेच पूर्ण होतात. माणसाला ऑक्सिजन आणि अन्नाचा स्त्रोत तर झाडांमुळेच मिळतो, वस्त्र यासाठी लागणारा जो कच्चामाल आहे. तो म्हणजे ‘कापूस’, तो देखील झाडांमुळेच मिळतो. तोही मिळाला नसता तर ती गरज पूर्ण झाली नसती. तिसरी गरज म्हणजे ‘निवारा’. पूर्वीच्या काळी लाकडाची घर असायची ते सुद्धा झाडा मुळेच मिळते, राहायला घरही माणसाला झाले नसते.

 म्हणजेच काय, झाडे नसतील तर माणसाच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होणार नाहीत. जर झाडेच अस्तित्वात राहिली नाही तर मुळात माणूस पर्यावरणात राहू शकणार नाही, प्राणी देखील राहू शकणार नाही. कारण सगळ्यांना जगायला ऑक्सिजन लागतो. झाडे नसतील तर फक्त जमीन, पाणी आणि सूर्य एवढे तीनच घटक पृथ्वीवर राहिले असते. प्राणी, पक्षी व झाडे ही संकल्पना मुळात पृथ्वीवर कधी अस्तित्वात राहिली नसती.

देवाने हा निसर्ग किती छान पद्धतीने बनवला आहे! त्यात कसलीच चूक त्याच्याकडून झालेली नाही. त्यामुळे या गोष्टीची कल्पना देखील करावीशी वाटत नाही. त्यात जर झाडे या जगातून नष्ट झाली. तर ही कल्पना खूपच भीतीदायक वाटते. त्यामुळे जोपर्यंत झाडे आहेत तोपर्यंत आपले आयुष्य खरच खूप सुखकर आहे!  जर झाडे आपण नीट जगवली नाही, तर येणारा काळ आपल्यासाठी खूप खडतर जाईल आणि आपल्याला ऑक्सिजन साठी देखील पैसे मोजावे लागतील. आपल्या ग्रहावरच्या सगळ्या गोष्टी जर आपण वापरून संपवून टाकल्या तर आपल्याला शेवटी दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहावे लागेल. म्हणूनच नुसती झाडे लावून फायदा नाही तर ती नीट जगणे, हे देखील आपले पहिले आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे. तरच आपण या भारताचे ‘सुजाण नागरिक’ म्हणून जगण्यास पात्र आहोत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *