मोबाईल निबंध मराठी |मोबाईल चे फायदे व तोटे

मोबाईल निबंध मराठी

मुळात मोबाईल म्हणजे काय? किंवा दूरध्वनी म्हणजे काय? तर मोबाईल म्हणजे एक प्रकारचे ‘इलेक्ट्रॉनिक साधन’ होय. ज्याचा वापर दोन व्यक्ती एकमेकांशी खूप लांब अंतरावरून बोलण्यासाठी करतात. नुसतच फोनवर बोलण्यासाठी नाही, तर एसएमएस द्वारा देखील आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो.

सध्याच्या आधुनिक काळात मोबाईलचा वापर आणि मोबाईलचे फंक्शन्स यामध्ये इतकी प्रगती झालेली आहे, की मोबाईलचा वापर आपण जवळजवळ सगळ्या गोष्टींसाठी करू लागलो आहोत. २१व्या शतकात मोबाईल हा खूप जीवनातला एक  महत्त्वाचा भाग झालेला आहे.

पूर्वीच्या काळी जे मोबाईल फोन होते, ते खूप छोटे असायचे! त्यातून फक्त कॉल आणि एसएमएस एवढ्याच सेवा मिळत होत्या, कधीतरी त्यावर छोटे छोटे गेम्स, म्युझिक, कॅमेरा असे फंक्शन होते. परंतु गेल्या सात आठ वर्षांमध्ये मोबाईल फोनच्या प्रगतीने अगदी आकाश ठेंगणे झाले आहे.

मोबाईल फोन्स ने इतकी प्रगती केली आहे, की आता आपण सगळ्या गोष्टीसाठी मोबाईल वरती अवलंबून आहोत. आता जर मोबाईल आपण कुठे विसरलो, तर आपले दैनंदिन जीवन सुद्धा सुरळीत चालणार नाही.

बाजारात जेव्हा सुरुवातीला फोन आले, तेव्हा ते खूप साधे होते. कॉलिंग आणि मेसेज इतकाच त्याचा उपयोग होता, नंतर मात्र त्याचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करत आहोत.

आता मोबाईल ला ‘वन क्लिक’ असे म्हटले जाते. म्हणजे काय, आपल्या मोबाईलच्या द्वारे आपल्या सगळ्याच गोष्टी एका क्लिकने करू शकतो. आपण लांब राहणाऱ्या लोकांशी व्हिडिओ कॉल वर बोलू शकतो. मोबाईल फोनचा अजून एक फायदा असा की त्याचे तंत्रज्ञान रोज बदलत असते. त्यामुळे लोक नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकतात.

तंत्रज्ञान जसे बदलते, तसे नवीन नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतात. उदाहरणार्थ एखादे नवीन अँप बाजारात आले की त्याला  बनवणारा, म्हणजेच डेव्हलपर लागतो, त्याचा सोशल मीडिया हँडल करणारा एक माणूस लागतो आणि बाकीचे काम करायला एक माणूस लागतो. त्यामुळे एखादा अँप आले की जवळ-जवळ दहा ते बारा नवीन जॉब्स निर्माण होतात. जसेजसे ते प्रसिद्ध होत जाईल तसेतसे जॉब ची संख्या वाढत जाते, कारण त्या अँपवर येणार कामही वाढत जात.

मोबाईल फोन मुळे जगाच्या सगळ्या सीमा जवळ आल्या आहेत. पूर्वी फक्त पत्राच्या सहाय्याने एकमेकांशी व्यवहार व्हायचा. लोक एकमेकांशी बोलण्यासाठी वर्षानुवर्षे पत्रांची वाट बघत बसायचे. परंतु आता हेच सगळे आपण मोबाईल फोन द्वारे करू शकतो. त्यामुळे कोणाचीही आठवण आल्यास आपण एका मिनिटात त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. त्याचप्रमाणे लहान मुलांची देखील मोबाईल फोन मुळे काळजी घेतली जाते. आज कालच्या जगात आई-वडील दोघेही नोकरीला जात असल्यामुळे, लहान मुलाला घरी एकटे ठेवायला लागते. त्याला एकट वाटणार नाही, म्हणून मोबाईल फोन दिला जातो आणि त्याच्याशी संपर्क साधणे त्यांना सोपे जाते. म्हणजेच काय तर मोबाईल फोनवर विश्वास ठेवून ते त्याला घरात एकट्याला सोडून कामाला जाऊ शकतात.

मोबाईल फोनवरून अगदी भाजी पासून ते मोठ्या मोठ्या कार पर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाईन विकत घेतल्या जाऊ शकतात. माणसाचे आयुष्य खूप सोयीचे झालेले आहे आणि सुखकर झालेले आहे. या आधुनिक जगात मोबाईलच्या किमती खूप कमी झालेला असल्याकारणाने सगळे लोकं मोबाईल फोन घेऊ शकतात आणि वापरू शकतात. काही काही कंपन्या जसे की ‘एप्पल आणि सॅमसंग’ यांच्या किमती खूप आहेत, परंतु बाकी सगळ्या फोनच्या किमती कमी असल्यामुळे सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात. नाहीतर आधीच्या काळात फक्त श्रीमंत लोकच मोबाईल घेऊ शकत होते. कारण तंत्रज्ञान तेवढे पुढारलेले नव्हते. त्यामुळे खूप कमी लोकांकडे मोबाईल फोन असायचे.

जसे मोबाईलचे खूप सारे फायदे आपण बघितले तसेच तोटेही बघूया. प्रत्येक गोष्टीचे फायदे आले की तोटेही येतातच. त्यामुळे मोबाईलचा उपयोग जरी आजच्या आधुनिक जगात खूप जास्त प्रमाणात होत असला. त्याचा फायदाही खूप मोठ्या प्रमाणावर असला तरी त्याचा दुरुपयोग ही आहे.

मोबाईल द्वारे आणि  मुख्यतः अॅप द्वारे ज्या गोष्टी ‘वन क्लिक’ वर आहेत त्यामुळे स्थानिक विक्रेता से मोठ्या प्रमाणावर नुकसान होते उदाहरणार्थ भाजीवाला, फळवाला.

फोनचा वापर करता करता गाडी चालवल्या मुळे अपघाताचे प्रमाण देखील खूप वाढले आहे, कारण वाहन चालवताना चालकाचे लक्ष पूर्णपणे वाहन चालवण्याकडे नसते, निष्काळजीपणा मुळे अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

आजकाल मोबाईल ला ‘तिसरा हात’ असे म्हणतात. मोबाईलचा इतका वापर केला जातो त्याने संवाद खूप कमी झाला आहे, त्यामुळे नातेसंबंध बिघडतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे बहिरेपणा येतो. त्याचप्रमाणे त्याचे रेडीयेषण मुळे डोक्यावर परिणाम होत आहे, अनेक आजार जडत आहेत.

पूर्वी लोक खेळायला जायची, व्यायाम करायची, सगळ्या गोष्टी करायची त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगायची परंतु मोबाईल आल्यामुळे आणि त्याच्यावर वेळ घालवल्यामुळे आता बसून बसून लोकांना हार्ट वर प्रेशर येत आहे.

आपण आयुष्याचा आनंद घ्यायला विसरत चाललोय. मोबाईल मुळे सोशल मीडिया देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, सोशल मीडिया वरती लाईक्स मागे सध्याचे तरुण पिढी धावते आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी पब्लिक करतो. आपल्या आयुष्यात काय चालले आहे? हे सतत पोस्ट करत राहतो. त्यामुळे मोबाईलचे जितके उपयोग आहेत तितकेच जास्त दुरुपयोग देखील आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्याने ठरवावे की मोबाईलचा चांगला फायदा करून घ्यायचा आहे की त्याचा दुरुपयोग करायचा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *