वर्तमान पत्राचे महत्व

वर्तमान पत्राचे महत्व

वृत्तपत्र म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘न्युज पेपर’. जे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेमध्ये वृत्तपत्रांचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आढळते. इतिहासामध्ये देखील पुरावे म्हणून वृत्तपत्रांचाच वापर केला जातो. वृत्तपत्रे भारतीय स्वातंत्र्यच्या पूर्वीपासून खूप महत्त्वाची आहेत. कारण भारताच्या स्वातंत्र्यासाठी वृत्तपत्रांचा वाटा खूप मोठा आहे.

स्वातंत्र्य पूर्वी वृत्तपत्रांचा वापर हा जनजागृतीसाठी व्हायचा. त्यामुळे लोक स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचे. भारत एकत्र येऊन लढा देण्यासाठी देखील वृत्तपत्रांचे कार्य खूप मोठे झालेले दिसते.

वृत्तपत्रांना पूर्वीपासून एक महत्त्वाचे दळणवळणाचे साधन मानले जाते. सुरुवातीला भारतात ‘बेंगॉल गॅझेट’ नावाचे वृत्तपत्र होते, तेव्हापासून भारतात अनेक नवनवीन वृत्तपत्रे आली. आज 2023 मध्ये जवळजवळ दहा हजार पेक्षा जास्त न्यूज पेपर चे म्हणजेच वर्तमानपत्राचे रजिस्ट्रेशन आहे. म्हणजेच काय तर वृत्तपत्रांचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप वाढलेले आहे. त्यामुळे नवनवीन वृत्तपत्रे तयार होऊ लागली. आज तर भारतात प्रत्येक भाषेत आणि बोलीभाषेत देखील वृत्तपत्रे आहेत.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले ‘केसरी’ आणि ‘मराठा’ हे त्या वेळेचे जनजागृती चे सगळ्यात मोठे साधन होते. टिळकांना जो संदेश भारतीयांना द्यायचा असायचा तो या दोन वृत्तपत्राद्वारे दिला जायचा, तसेच भारतात सध्या

‘द हिंदू’, ’द इंडियन एक्सप्रेस’ व ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ असे महत्त्वाचे पेपर आहेत.

वृत्तपत्रे ही राजकीय गोष्टींसाठी देखील खूप महत्त्वाची असतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी वृत्तपत्रांमार्फत व्यवस्थित सांगितल्या जातात. पूर्वीच्या काळी तर कोणतीही मोठी राजकीय उलाढाल व्हायची, तेव्हा वृत्तपत्रांचे आधार घेतला जायचा. कारण लोकांना जनजागृती करण्याचे ते एकमेव साधन होते. मुळात वृत्तपत्रे हे दळणवळणाचे सगळ्यात महत्त्वाचे साधन मानले जाते. आजही जरी कितीही मोठमोठे इलेक्ट्रॉनिक माध्यम आली तरीसुद्धा जितका विश्वास लोक वृत्तपत्रांवर ठेवतात, तेवढा कशावरतीच ठेवत नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रे हा एक विश्वासू दुवा मानला जातो.

वृत्तपत्रे हे आर्थिक गोष्टींसाठी देखील खूप महत्त्वाचे असते. जसे ‘इन्कम टॅक्स कसा भरावा?’ याची माहिती उत्तमपणे सांगितली जाते. तसेच ज्या-ज्या वेळेला बजेट येते त्या-त्या वेळेला देशाची आर्थिक उलाढाल कशी असणार आहे? यासाठी संपादकीय आणि काही विशेष लेख लिहिले जातात. त्यामुळे अगदी त्या गोष्टीबद्दल माहित नसलेल्या नागरिकांना देखील त्या लेखांमुळे थोडेफार नॉलेज मिळते. पूर्वीपासून वृत्तपत्रांचे महत्त्व इतके वाढत गेले, की आज भारतात प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या भाषांचे आणि बोलीभाषांचे मिळून दहा हजार पेक्षा जास्त वृत्तपत्रे रजिस्टर केलेली आहेत. तसेच बॉलीवूड, क्रीडा, ट्रॅव्हल, इतिहास, प्रवास वर्णन व जागतिक घडामोडी या सगळ्या गोष्टींची देखील माहिती वृत्तपत्राद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर दिली जाते.

बॉलीवुड हे जगातील एक महत्त्वाचे माध्यम मानले जाते, त्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात काय चालले आहे? त्यांचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? किंवा त्यांच्या आयुष्यातील अगदी छोट्या-छोट्या घटनेपासून मोठ्या घटनेपर्यंत सगळी माहिती वृत्तपत्रे अगदी उत्तम पोहोचवतात. कोणता पिक्चर कसा आहे? हा पिक्चर बघावा की नाही? हे देखील वृत्तपत्रे सांगतात. त्यासाठी वेगळे लेखक ठरवलेले असतात, जे पिक्चर बघून त्याचे विश्लेषण देतात. त्यामुळे प्रेक्षकांना समजते की ही गोष्ट करावी की नाही करावी.

भारत आणि क्रीडा याचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूने किती धावा काढल्यात? कोणी कोणाची विकेट घेतली? यापासून ते त्यांच्या खाजगी आयुष्यापर्यंतची सगळी माहिती ही वृत्तपत्रे आपल्याला देतात. ट्रॅव्हल हा एक महत्त्वाचा सेगमेंट वृत्तपत्रांमध्ये असतो कारण बरेचसे प्रवासी हे वृत्तपत्रांचा आधार घेऊन आपली ट्रिप प्लॅन करत असतात. त्यामुळे तिथे दिलेल्या माहितीचा वापर त्यांना अगदी भरभरून होतो.

तसेच खाण्यापिण्याच्या अनेक रेसिपीज महिला बघून, वाचून बनवत असतात. वृत्तपत्रांमधल्या येणाऱ्या रेसिपीचे ते संग्रह करून ठेवतात आणि मग दर दिवशी एक अशा देखील बनवतात. वृत्तपत्रांमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘संपादकीय’. प्रत्येक वृत्तपत्राला एक संपादक उपसंपादक असा क्रम असतो. सर्वात उच्च स्थानी संपादक असतो, त्यामुळे संपादकीय हे संपादकाच्या लिखाणातून आलेले असते. त्यांचे जे विश्लेषण असते ते खूप महत्त्वाचे असते. संपादकीय मधून राजकीय गोष्टींचे नीट विश्लेषण मिळते त्यामुळे सामान्य माणसालाही एखादा निर्णय एखाद्या राजकीय पक्षाने का घेतला आहे याचे कारण कळते.

त्याचप्रमाणे जे प्रसिद्ध डॉक्टर असतात ते दर रविवारी एखाद्या माहीत नसलेल्या आणि जास्त प्रसिद्ध नसलेल्या आजाराबद्दल संपूर्ण माहिती देतात. त्याच्या निदानाबद्दल देखील बोलतात. त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्याला होतो.

वर्तमानपत्रांमध्ये ‘रविवारची पुरवणी’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. पूर्वी तर लोक रविवारी संपूर्ण दिवस हा वृत्तपत्रे वाचण्यातच घालवायचे. तो वर्ग वेगळा असायचा, परंतु आता वृत्तपत्रे बरीचशी मागे पडत चालली आहेत.

वृत्तपत्रांमध्ये मिळणारे जॉब्स हे लोक आजही बघतात कारण मोठमोठ्या कंपन्या वृत्तपत्रांना आधी संपर्क साधतात त्यामुळे कोणताही चांगला जॉब हवा असेल तर तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून शोधता येऊ शकतो. तसेच अजूनही लग्नासाठी स्थळे लोक वृत्तपत्रांमध्ये पाठवतात. दर रविवारी येणार राशिभविष्य हे तर वाचकांसाठी पर्वणी च असते.  वृत्तपत्रांची जागा जरी आता सोशल मीडिया आणि युटूब सारख्या गोष्टींनी घेतली असली तरीसुद्धा वृत्तपत्रांना एक ऑथेंटिक सोर्स म्हणून आजही ओळखले जाते. जी माहिती वृत्तपत्रांमध्ये असते ती ऑथेंटिकच असणार असा विश्वास वृत्तपत्रांनी निर्माण केलेला आहे. म्हणूनच वृत्तपत्रे कधीच कोणत्या अफवांवर विश्वास ठेवत नाही. माणूस हा एक समाजात राहणारा घटक आहे त्यामुळे समाजाला नीट समजून घ्यायचे असेल तर वृत्तपत्रे वाचणे गरजेचे असते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *