नमस्कार मी भाग्यदा पुराणिक. मी एक पूर्ण वेळ लेखक आहे आणि समुपदेशक देखील आहे. मला पुस्तके वाचायला, लिहायला, मूव्हीज बघायला, आणि गाणी ऐकायला आवडतात.

Connect with me: Linkedin

शैक्षणिक पार्श्वभूमी

मी कलाक्षेत्रातून मास्टर ऑफ हिस्टरी डिग्री 2019 रोजी प्राप्त केली. त्यानंतर 2021 मध्ये मी फिल्म मेकिंग आणि ब्रॉडकॅस्ट जर्नालिझम यामध्ये सायली स्पेशल डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. तसेच 2018 मध्ये स्पॅनिश भाषेच्या दोन Levels देखील उत्तीर्ण केल्या आहेत. इंदिरा गांधी नॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेमधून टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा तीन वर्षाचा डिग्री कोर्स देखील पूर्ण केला आहे.

BA (History)2017
Spanish Language (2nd level)2018
MA (History)2019
Diploma in Film Making and Broadcast Journalism2021

प्रमाणपत्रे

मी शाळेत असल्यापासून बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आहेत. मला कलाक्षेत्रात काम करायला खूप आवडते. लहानपणापासून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत, नृत्य. या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप ऍक्टिव्ह होते. 😎

 1. संगीत गांधर्व महाविद्यालयाचे शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षा उत्तीर्ण
 2. संगीत गांधर्व विद्यालयाच्या सुगम संगीत अलंकार परीक्षा उत्तीर्ण.
 3. गांधर्व महाविद्यालयाची भरतनाट्यम ची दुसरी परीक्षा उत्तीर्ण.
 4. कॉलेजमध्ये असताना वाद-विवाद स्पर्धेत मध्ये प्रथम पारितोषिक.
 5. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
 6. पत्रलेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिक.
 7. निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक.
 8. एम ए हिस्ट्री करत असताना एक मोठा रिसर्च केलं आहे.

कामाचा अनुभव

मी माझ्या कामाची सुरुवात शिक्षिकेपासून केली. नंतर जेव्हा पत्रकारिता आणि फिल्म मेकिंग पूर्ण केले त्यानंतर मी आकाशवाणी मध्ये कार्यरत होते. मला सतत शिकायला आवडते म्हणून मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी आतापर्यंत शिकले आहे.

 1. एका कोचिंग क्लास मध्ये MA करता करता English Teacher म्हणून कामाची पहिली सुरुवात केली.
 2. सी एम एस हायस्कूल येथे दोन वर्षे हिस्टरी आणि पॉलिटिकल सायन्सची शिक्षिका म्हणून काम केले. यात मी सेकंडरी स्कूल टीचर होते.
 3. एका कंपनीमध्ये ऍडमिशन कौन्सिलर म्हणून देखील काम केले.
 4. तसेच मुंबई आकाशवाणी मध्ये एक वर्ष पोस्ट प्रोडक्शन मॅनेजर म्हणून देखील कार्यरत.
 5. तसेच बरेचसे प्रोजेक्ट फ्रीलान्स कन्टेन्ट रायटर म्हणून केलेले आहेत.
 6. तसेच आत्तापर्यंत अनेक शॉर्ट स्टोरीज आणि स्कीट देखील लिहिलेले आहेत.
 7. तसेच ॲडमिशन कौन्सिलिंग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील बऱ्यापैकी कार्यरत होते.