संगणक शाप की वरदान

संगणकाचा वापर आजच्या आधुनिक जगात करतात. कारण संगणकाशिवाय आजकालची कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत.

तर संगणक म्हणजे काय?

संगणक म्हणजे इंग्रजीमध्ये ‘कॉम्प्युटर’. तर संगणक हे एक उपकरण आहे, त्याच्यावरती आपण सगळी कामे करू शकतो. संगणकामुळे आजकालचे जीवन खूपच सुखकर झालेले आहे.

संगणकामुळे आपल्याला बऱ्याच व्यवसायाच्या संधी मिळतात. ज्याचा फायदा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये होतो. दहावीनंतर काय करावे? बारावीनंतर काय करावे? याचे धडे आपल्याला संगणकामुळे आणि सामाजिक प्रसार साधनांमुळे घेता येतात. मुळात पूर्वीच्या काळी शिक्षण एवढे सोपे झालेले नव्हते. गुरुकुल पद्धती होती. शिक्षण संस्था सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने काम करायच्या. परंतु आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि संगणकामुळे सगळ्या गोष्टी सुखकर झालेल्या आहेत.

संगणकामुळे तुम्ही माहिती संग्रहित करू शकतात. त्याचा फायदा हा आपला, आपल्या देशाचा आणि एकूणच पर्यावरणाचा इतिहास जपण्यासाठी होतो. संगणकामुळे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. पूर्वी पुस्तके लिहायला किंवा कोणतीही गोष्ट लिहायला आपल्याला फक्त हातानेच लिहावे लागायचे. कागद-पेन याचाच वापर करायला लागायचा. त्यामुळे खूप जास्त पर्यावरणाचा ऱ्हासही व्हायचा, वेळही खूप वाया जायचा, या गोष्टींना थांबवण्यासाठी किंवा या गोष्टींना उपाय म्हणून आपण संगणकाचा वापर करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी या आता आपण टाईप करून अपलोड करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कागद खूप वर्ष ठेवल्यानंतर त्याला वाळवी लागण्याची शक्यता असते किंवा खराब होण्याची शक्यता असते. परंतु एकदा टाईप करून बाकीच्या ठिकाणी आपण ऑनलाईन संचय करू शकतो. जेणेकरून ती माहिती कधीही खराब होत नाही. ती माहिती जशी आहे तशीच राहते.

तसेच संगणकामुळे आपल्याला ‘स्टोरेज स्पेस’ म्हणजेच ‘रॅम’ देखील मिळते. संगणकामुळे हे काम अगदी सहज सोपे झाले आहे. कारण पूर्वी जेव्हा आपण ऑडिओ किंवा कोणतेही माध्यम वापरायचो, त्या वेळेला त्याची क्षमता खूप छोटी असायची. त्यामुळे जास्त माहिती आपण त्यात संग्रहित करू शकत नव्हतो. परंतु संगणक आल्यानंतर आपण त्यात बरीचशी माहिती संग्रहित करून ठेवू शकतो.

तसेच संगणकाचा वापर मोठमोठ्या ऑफिसेस मध्ये आणि कामाच्या ठिकाणी होतो. त्यामुळे काम करण्याची पद्धत खूप सोपी झाली आहे.

तसेच संगणकामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतो. जर एखादे लहान मुल घरी एकटेच असेल, तर तो संगणकाद्वारे अभ्यास करू शकतो. खेळ खेळू शकतो. नवीन गोष्टी शिकू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण फक्त एका साधन करू शकतो. पूर्वी प्रत्येक गोष्टींसाठी वेगळे वेगळे साधने वापरली जायची. गाणे ऐकण्यासाठी लोक टेप रेकॉर्डर, रेडिओ अशा माध्यमांचा वापर करायचे. परत दूरदर्शनचा देखील वापर व्हायचा. तसेच कोणाशी संपर्क साधायचा असेल, तर पत्र लिहिले जायची, परंतु आता संगणकामुळे या सगळ्या गोष्टी आपण एकाच यंत्राद्वारे करू शकतो.

संगणकामध्ये आपण एम. एस ऑफिस, एक्सेल, पावर पॉइंट यासारख्या गोष्टी शिकू शकतो. दैनंदिन जीवनात वापरू शकतो. त्यामुळे आपले जीवन खूप सुखकर होते, कारण एम. एस. ऑफिसमध्ये आपण वेगवेगळे लेख लिहू शकतो, माहिती संग्रहित करू शकतो. एक्सेल या प्रकारामध्ये आपण हिशोब ठेवू शकतो. कंपनीचे मोठमोठ्या उलाढाली, अगदी दोन रुपयापासून ते कोटी पर्यंतच्या सगळ्या उलाढाली आपण एक्सेल वर व्यवस्थित संग्रहित करू शकतो.

सध्या खूप चालत असलेल, एक चांगलं माध्यम म्हणजे ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, त्या आपण वेगवेगळ्या पॉईंट्स मध्ये मांडतो. त्याला चित्र वगैरे जोडतो. त्यामुळे त्या लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या पोहोचतात. आपल्याला जास्त शब्दांचा वापर करावा लागत नाही. साधं, सोपं, सरळ असा या संगणकाचा उपयोग आहे.

संगणकामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आधी ज्या कामांना खूप कष्ट करायला लागायचे, ते बऱ्यापैकी आता सोपे झाले आहेत. जेव्हा सगळ्यात पहिला संगणक बनवला, तेव्हा त्याचा आकार खूप मोठा होता. परंतु आता खूप लहान आकाराचे संगणक बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत.

जसा प्रत्येक गोष्टीचा फायदा असतो, तसा तोटाही असतो. तसेच संगणकाचेही फायदे खूप जास्त असले, तरी संगणकाचे काही तोटेही आहेत. ते पुढील प्रमाणे पाहू.

संगणकामुळे बरेचसे डोळ्यांचे आजार होऊ लागले आहेत. सतत स्क्रीनकडे बघून लोकांचे डोळे खराब होऊ लागले आहेत. तसेच लोकपूर्वी सगळ्या कामांसाठी शरीराची हालचाल करायचे, परंतु आता संगणकामुळे एकाच जागी बसून सगळी काम होतात. त्यामुळे शरीराचा स्थूलपणा वाढला आहे. त्यामुळे आजारही वाढले आहेत. लोकांना हृदयाचा त्रास, मधुमेह, अति रक्तदाब यांसारखे त्रास सुरू झाले.

संगणकामुळे लोकांना खूप गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्या आहेत. सगळी माहिती संगणकावर उपलब्ध असल्यामुळे, पुस्तकांचे महत्त्व खूप कमी झाले आहे. पूर्वी कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असल्यास लोक त्या-त्या विषयांच्या संबंधात पुस्तक घेऊन यायची आणि त्याची संपूर्ण माहिती घ्यायचे, परंतु आता लोक पुस्तकच वाचत नाहीत.

तसेच त्यांना संगणकामुळे लोक स्वतःहून कोणतीही माहिती गोळा करणे किंवा कोणती माहिती संग्रहित करणे या सगळ्या गोष्टी आता स्वतःहून करतच नाहीत, सगळ्या गोष्टी संगणकाद्वारेच चालवतात. संगणक जरी आताच्या जगाला वरदान असलं. तरी सुद्धा थोड्या प्रमाणात शाप देखील आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *