वृक्षारोपण काळाची गरज निबंध

Featured Image- vriksharopan kalachi garaj

वृक्षारोपण काळाची गरज निबंध

माणसांमुळे पर्यावरणात अनेक बदल होत आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. 21व्या शतकात प्रदूषण, लोकसंख्या वाढ यांचा परिणाम निसर्गचक्रावर आणि पर्यावरणावर होत आहे. माणूस आधुनिकीरणाच्या खूप अधीन झाला आहे, त्यामुळे ह्या आधुनिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा परिणाम हा संपूर्ण निसर्ग चक्रावर आणि पर्यावरणावर होत आहे. या शहरीकरणात मुख्य भाग म्हणजे इमारती उभारणे, कारखाने चालवणे, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, स्मार्ट सिटी बनवणे यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये आपण पर्यावरणाचा किती ऱ्हास होत आहे या गोष्टीची चिंता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. या सगळ्यात आपण किती प्रमाणावर झाडे तोडतो? आणि काँक्रीटचे जंगल बनवतो आहे याची आपल्यालाच कल्पना नाही आणि या सगळ्यांमुळे होणारे नुकसान हे खूप मोठे आहे! हे रोखण्यासाठी आपण वृक्षारोपण करणे आवश्यक आहे पण ते केले नाही तर खूपच हानी होईल.

      वृक्षारोपण न केल्याने होणारे तोटे –

1. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होईल – झाडे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात, म्हणजेच काय तर झाडांमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जाऊन फिल्टर होऊन त्याचे रूपांतर ऑक्सिजन मध्ये होते. ही प्रक्रिया दररोज न चुकता चालू असते. परंतु जर आपण झाडे मोठ्या प्रमाणावर कापली आणि तिथे बांधकाम उभे केले तर या झाडांमुळे मिळणारा ऑक्सिजन हा विरळ होईल आणि माणसाला ऑक्सिजन शिवाय जगता येणार नाही. झाडे खूप कमी केल्यास येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनची कमतरता खूप जाणवणार आहे.

2. निसर्गचक्रामध्ये बदल होतील – जर आपण सतत झाडांची नासधूस करत राहिलो तर निसर्गचक्रामध्ये देखील प्रचंड बदल जाणवतात कारण निसर्गचक्रांमध्ये झाडांचा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे.

3. पाण्याची पातळी वाढेल – मुळातच झाडे पाणी हे जमिनीतून शोषून घेतात. त्यामुळे पाण्याची पातळी जमिनीवर न वाढता जमिनीखाली जिरवली जाते. ज्याचा फायदा झाडे आणि अन्य वनस्पतींना होतो. परंतु जर आपण सतत झाडे तोडली तर झाडे पाणी शोषून घेणार नाही आणि उन्हाळा जास्त वाढल्याने बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढेल. सगळीकडे महापुराचे संकट उद्भवू शकेल.

4. ओझोन स्तराचे देखील नुकसान होईल – मुळातच ओझोन हा सूर्यकिरणांच्या अति तीव्र किरणांपासून आपले संरक्षण करत असतो, हा स्तर आकाशापासून थोडा खाली आणि पृथ्वीतलाच्या म्हणजेच भूपृष्ठभागापासून थोडा वर असा असतो. जर झाडांची वाढ न करता ती सतत तोडत गेलो तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल. त्याचप्रमाणे सतत प्रदूषण निर्माण होईल आणि या प्रदूषणाचा तोटा हा ओझोन लेअरला देखील निर्माण होईल.

   वृक्षारोपणाचे फायदे –

1. ऑक्सीजन मिळतो – झाडांमुळे आपल्याला रोज ऑक्सिजन मिळतो. माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे श्वास! आणि त्या श्वासाला फक्त झाडांमुळेच मदत होते म्हणूनच माणसाचे जीवन हे झाडांवरती फिरते आणि त्यावर अवलंबून असते.

2. जमिनीचा ऱ्हास होण्यापासून थांबवते – झाडांमुळे जमिनीचा ऱ्हास होण्यापासून वाचतो. तसेच जमिनीमध्ये पाण्याचं संतुलन नीट राहते, कारण झाडांमुळे पाणी नेहमी जमिनीच्या खाली दाबले जाते आणि त्यामुळे माती वाहून जाण्यापासून थांबते. मातीचे संरक्षण होते.

3. पर्यावरणाचे संतुलन राखते- झाडे हा निसर्गचक्रातील एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तसेच तो पर्यावरणाचाही एक महत्त्वाचा भाग आहे. पर्यावरणामध्ये झाडांमुळे संतुलन कायम राहते, म्हणजेच काय तर हिवाळा पावसाळा उन्हाळा असे ऋतू झाडांमुळे व्यवस्थित चालतात.

4. पुराचा धोका कमी निर्माण होतो- झाडांमुळे पाण्याची पातळी कायम राहते. जर आपण सतत झाडे तोडत राहिलो तर पाणी जमिनीत झिरपण्यास मदत होणार नाही आणि पाण्याची पातळी सतत वाढत राहील. अशीच पाण्याची पातळी वाढत राहिली तर पुराचा धोका निर्माण होतो. झाडे ते पाणी शोषून घेतात त्यामुळे पुराचा धोका कमी होण्याचे प्रमाण वाढते.

5. औषध निर्मिती – झाडांपासून नेहमी वेगवेगळ्या प्रकारची औषधी बनवली जातात. आयुर्वेदिक गोष्टींमध्ये तर मूळतः झाडांच्या खोडांचा, पानांचा, फुलांचा व फळांचा वापर केला जातो. तसेच काही औषधी झाडे जसे तुळस , कढीपत्ता व हळद यांचा वापर वेगवेगळे आजार बरे होण्यास अगदी सहजरीत्या केला जातो म्हणजेच झाडे औषधाच्या रूपाने माणसाला निरोगी राहण्यास मदत करतात.

6. निसर्ग सौंदर्यात वाढ होते – झाडांमुळे कायम आपले पर्यावरण बहरून येते. झाडांच्या पानांचा रंग, फुलांचा रंग आणि फळांचा रंग कायम मनाला प्रसन्नता देऊन जातो, त्यामुळे त्यांना पाहून नेहमीच बरे वाटते आणि निसर्ग सौंदर्यात बरीच वाढ होते.

7. झाडांपासून आपल्याला अनेक साधन संपत्ती मिळते – झाडांपासून आपल्याला मुळे, फळे, फुले, मध व डिंक इत्यादी प्रकारचे साधन संपत्ती मिळते. म्हणूनच आपण जितकी जमेल तितकी झाडांची वाढ आणि लागवड करावी कारण जितकी झाडे आपण तोडू तितका जास्त आपणच आपला तोटा करून घेत आहोत.

झाडांमुळे आपल्याला रोज असंख्य गोष्टी मिळत असतात, जसे की फळे, फुले, फांद्या व इतर. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा माणूस उपयोग करून घेतो. झाडांचा मुख्यतः अन्न म्हणून वापर होतो परंतु औषधे बनवण्यासाठी, चुलीसाठी इंधन म्हणून देखील झाडाच्या खोडाचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या तरुण पिढीला निसर्गाच्या होणाऱ्या -हासाची कल्पना आहे आणि म्हणूनच ते वृक्षारोपणासाठी अनेक प्रकल्प करत आहेत. दर रविवारी झाडे लावणे किंवा वाढदिवसाच्या दिवशी जाऊन झाडे लावण्याचा उपक्रम राबवणे तसेच मोठ्या दिवशी येऊन लावलेल्या झाडांची नीट निगा राखणे किंवा चांगली खते वापरणे, संरक्षण जाळीचा वापर करणे असे एक नाही अनेक उपाय योजले जातात आणि त्यावर काम केले जाते.

 आपण वृक्षारोपणाचे फायदे आणि तोटे दोन्ही बघितले आणि वाढत्या प्रदूषणामुळे ते लवकरात लवकर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *