पृथ्वी बोलू लागली तर…

Featured image: pruthvi bolu lagli tar

पृथ्वी बोलू लागली तर…

असे म्हणतात की या ब्रम्हांडमध्ये अनेक ग्रह आहे. त्यापैकी एक म्हणजे आपली ‘पृथ्वी’! मुळात पृथ्वी ही जशी आता आपल्याला दिसते, तशी आधी नव्हती. फार पूर्वी जेव्हा पृथ्वी तयार होत होती, तेव्हा सगळे देश एकच होते. पण हळूहळू त्याच्यात बदल होत आले आजची पृथ्वी जशी आहे तशी बनत गेली, समुद्रांमुळे प्रत्येक देशाला सीमा तयार होऊ लागल्या.

पृथ्वीचा इतिहास फारच छान आहे. पृथ्वीवर जास्तीत भूभाग हा पाण्यानेच व्यापला आहे, खूप कमी टक्के जमिनीने व्यापलेला भूभाग आहे. या सगळ्या बदलानंतर मग पहिला प्राणी आला, मग अश्मयुग झाले ते आज पर्यंत इतका प्रवास आपल्या पृथ्वीने केलेला आहे.

परंतु आजच्या काळात आपण जी पृथ्वी बघतो, ती अगदीच वेगळी आहे. सध्या पृथ्वीवर अनेक देश आहेत, त्यांच्या राजधान्या आहेत. सगळे देश आधुनिकीकरणाकडे आपली वाटचाल करत आहेत. काही देश खूप जास्त प्रगत आहेत, तर काही आत्ता प्रगतीच्या पथावर जात आहेत. या आधुनिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सध्याचे देशाचे स्वरूप हे खूप बदलले आहे.

जर पृथ्वी बोलायला लागली! असा विचार आपण केला. तर ती सगळ्यात पहिल्यांदा काय बर बोलेल? असा विचार मी करत होते.

तेव्हा मला चटकन आठवले की ती सगळ्यात पहिली गोष्ट बोलेल, ‘आता माझे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर मी थोड्या कालावधीतच संपून जाईल’.

पृथ्वीवरची सगळी झाडे आपण नष्ट करत आहोत, पाण्याचे प्रदूषण करत आहोत, मातीचे प्रदूषण करत आहोत. वायू प्रदूषणामुळे जो ओझोन लेयर असतो, त्याचे देखील आपण नुकसान करत आहोत. त्यामुळे पृथ्वी आपसुकच बोलायला लागली तर हेच बोलेल की ‘’अरे मानवा, मी इतकी सुंदर होते पूर्वी आणि तू मला वापरून वापरून असे बनवले आहेस, माझ्यावरची झाडे नष्ट केलीस. सतत आगीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे होणारे वायू प्रदूषण हे सगळे खूप भीषण आहे.’’

 अवकाळी पडणारा पाऊस, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी आपण नजरेआड जरी केल्या, तरी त्याचा दैनंदिन जीवनातही खूप परिणाम झालेला आपण रोजच्या रोज बघतो.

 जर पृथ्वी बोलायला लागली, तर काही काही गोष्टी तिला बरे वाटेल. कारण ज्या गोष्टीसाठी तिच्यात एवढे बदल झाले, त्या गोष्टी आपण आजकाल वापरत आहोत. ते म्हणजे जो भूभाग वेगवेगळ्या होऊन जे देश निर्माण झाले होते, आज ते देश स्वतंत्र झाले आहेत. त्यांनी त्यांचा विकास खूप चांगल्या पद्धतीने केला आहे. माणूस सक्षमीकरणाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पृथ्वी ही माणसाची ‘हॅपी प्लेस’ बनलेली आहे. त्यामुळे पृथ्वीला त्या गोष्टीत थोडे बरे वाटेल की माणूस तिच्यावर राहून खूप आनंदी आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीबद्दलच्या अनेक कथा सांगितल्या जातात की, कसे आपल्या देवांनी आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी कष्ट घेतले होते किंवा एकूणच आपल्या पूर्वजांनी आपल्या पृथ्वीसाठी खूप सारे कष्ट घेतले होते, जसे आपण आपल्या देशाला माता म्हणतो तसेच पृथ्वी देखील आपली माताच आहे. मग आपण कधीच आपल्या आईला त्रास देत नाही, पण आपण पृथ्वीला मात्र सर्रास त्रास देतो याचा विचार करणे खरच खूप गरजेचे आहे.

मुळातच पृथ्वीवरती सर्व प्राण्यांचे, पक्षांचे जीवन अवलंबून आहे आणि प्राण्यांचा जन्म झाल्यापासून मरेपर्यंत ती पृथ्वीला काहीच हानी पोहोचवत नाहीत. जास्तीत जास्त ते तिच्यातील नैसर्गिक गोष्टी खाण्यासाठी वापर करतात, परंतु त्यांच्याकडून पृथ्वीला काही हानी होत नाही आणि पक्षांचे देखील तसेच आहे. पक्षी कधीच पृथ्वीला हानिकारक अशा गोष्टी करत नाही, फक्त मानवच असा आहे जो त्याच्या कृत्यांमुळे पृथ्वीला हानी पोहोचवत आहे. वाढती जंगल तोड, इंधनांचा अतिवापर सगळ्या प्रकारची प्रदूषण, काँक्रीटचे जंगल उभा करणे, सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करून त्याचा वापर करणे, न्यूक्लियर सारखे महाविनाशक गोष्टींचा उपयोग करणे तसेच बॉम्ब बनवणे यामुळे पृथ्वीचा विनाशक होणार आहे. पृथ्वीचा जर विनाष झाला तर, सगळे प्राणी-पक्षी माणूस सगळ्यांचाच विनाश होणार. ‘विनाशकारी विपरीत बुद्धी’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. आपल्याला खरंच काही अधिकार नाहीये की आपल्यामुळे आपण बाकीच्या प्राण्यांना आणि पक्षांना त्रास देतो. त्यामुळे जितके जमेल तितके आपण या पृथ्वीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करूया.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *