भारतीय शिक्षणाचा इतिहास खूप मोठा आहे. आपले पूर्वज गुरूंच्या आश्रमात जाऊन झाडाखाली बसून शिक्षण घेत होते! त्यानंतर हळूहळू अनेक विद्यापीठे सुरू झाली.
‘ज्योतिबा फुले’ आणि ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या कष्टामुळे सगळ्या मुली शिकू लागल्या. आपण एका पद्धतशीर शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजेच सिस्टीम मध्ये आलो. शिक्षण हे आता ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने उपलब्ध झालेले आहेत.
ऑनलाइन शिक्षण पद्धती म्हणजे काय? तर आपण आपला अभ्यास सध्याच्या आधुनिक काळात संगणकाद्वारे, इंटरनेट द्वारे करू शकतो. मध्यंतरीच्या काळात शाळेत जाणे शक्य नव्हते, तेव्हा ऑनलाईन शाळा देखील भरत होत्या. शिक्षक ऑनलाईन तासानद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या संपूर्ण अभ्यास व्यवस्थितपणे शिकवत होते. या ऑनलाइन शिक्षणाचा सगळ्यात मोठा फायदा हाच होतो की एखादी महामारी समाजात आलेली असते, त्यावेळी आपल्याला बाहेर जाता येत नाही. तेव्हा मुलांचे नुकसान न होऊ देता ही शिक्षण प्रणाली उपयोगी ठरते.
आधुनिक शिक्षणाची ही एक वेगळी पद्धत आहे. ऑनलाइन शिक्षण ही आता काळाची गरज झालेली आहे. ऑनलाईन मुळे आपण जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात बसून अगदी सगळ्या विषयांचे व्यवस्थित ज्ञान घेऊ शकतो. सध्याच्या आधुनिक काळात या ऑनलाइन आणि इंटरनेटमुळे सगळे जग जणू खूप जवळ आले आहे. ऑनलाइन शिक्षणात अगदी बालवाडी पासून एमबीएपर्यंतचा आणि कॉलेज कोर्सेस पासून अगदी पीएचडी पर्यंतचा अभ्यास घरबसल्या होऊ शकतो! पूर्वीचा काळ वेगळा होता, तेव्हा शिक्षणाचा वापर फक्त प्राथमिक गरजा भागवण्यासाठी व्हायचा. परंतु आता प्राथमिक गरजा भागवून आवड म्हणूनही लोक अनेक गोष्टी शिकतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगातील वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान आपण घरी बसून घेऊ शकतो. पूर्वी आपण कधी न ऐकलेल्या भाषा सुद्धा आज अगदी सहजतेने इंटरनेटवर उपलब्ध होतात, त्या आपण घरबसल्या शिकू शकतो.
या ऑनलाइन शिक्षणाचे फायदे अनेक जणांनी घेतलेले आहे. या गोष्टीचे महत्त्व जसे तरुण पिढीला पटले आहे, तसेच बाकीचे लोक देखील या शिक्षणाचा उपभोग घेत आहेत.
मुळातच ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे असलेल्या नसलेल्या सगळ्या भौगोलिक सीमा जवळ नष्ट झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणात सध्या प्रचंड स्पर्धा असल्याकारणाने सगळी विद्यापीठे दर्जेदार शिक्षणावर जास्त भर देतात. म्हणजे काय तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटला जास्त आकर्षित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान प्राप्त होते.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अजून एक फायदा असा देखील आहे की भारतात कोर्स उपलब्ध नसेल तर ज्या इतर देशांमध्ये उपलब्ध असेल, तेथे विद्यार्थी त्या कोर्सला सहभाग घेऊ शकतात, मग तो जपानी देशात असेल किंवा अमेरिकेत! पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे या भौगोलिक सीमा आता जवळ आल्या आहेत. कोणीही कोणत्याही विषयाचे ज्ञान आता घरबसल्या घेऊ शकत आहे!
ऑनलाइन शिक्षण हे रोज वर्गामध्ये जाऊन शिकवले जात नाही. त्यामुळे जरी गृहिणी किंवा नोकरी करणारे विद्यार्थी कोणताही नवीन कोर्स शिकू शकतात. त्यांना कसलेही बंधन न ठेवता ते त्या कोर्सला रुजू करू शकतात.
ऑनलाईन क्लासेस मध्ये जर ऑनलाईन लेक्चर ला उपस्थित राहता आले नाही किंवा कोणत्या कारणाने ऑनलाइन लेक्चर अटेंड करता आले नाही, तर त्या लेक्चर चे ऑफलाइन लेक्चर म्हणजेच त्याचे रेकॉर्डिंगस सुद्धा उपलब्ध असतात! त्यामुळे कोणाचाही अभ्यास बुडत नाही.
ऑनलाईन चा अजून एक फायदा म्हणजे, लेक्चर झाल्यावर ती लेक्चर परत ऐकून, नीट समजून घेता येतात. त्याच प्रमाणे स्वतःच्या स्वतः नोट्स काढता येतात, म्हणजेच सेल्फ लर्निंग करता येते! हे या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शक्य झाले आहे आणि जेव्हा विद्यार्थी स्वतः मेहनत घेऊन शिकतो, तेव्हा त्याचे ज्ञान अजून जास्त वाढते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे तंत्रज्ञानात रोज काहीना काहीतरी बदल होत राहतो. आपण त्याच्याशी व्यवस्थित जुळवून घेतो. नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. यामुळे नुसता अभ्यासच नाही तर तंत्रज्ञानाचा देखील कसा वापर करावा हे आपण शिकतो. ऑनलाइन शिक्षण पद्धती सध्या काळाची खूप मोठी गरज असल्याकारणाने त्याला प्रचंड मागणी आहे.