वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

Featured Image -vruttapatra che manogat

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

वृत्तपत्र म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘न्युज पेपर’. वृत्तपत्र आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेमध्ये, वृत्तपत्रांचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात सांगितले आहे. तसेच इतिहासामध्ये देखील पुरावे म्हणून वृत्तपत्रांचाच वापर केला जातो. वृत्तपत्रे भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून खूप महत्त्वाची आहेत. कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्रांचा वाटा खूप मोठा आहे.

स्वातंत्र्यापूर्वी वृत्तपत्रांचा वापर हा जनजागृतीसाठी व्हायचा. त्यामुळे लोक स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचे. तसेच भारत एकत्र येऊन लढा देण्यासाठी देखील वृत्तपत्रांचे कार्य खूप मोठे झालेले दिसते.

वृत्तपत्रांना पूर्वीपासून एक महत्त्वाचे दळणवळणाचे साधन मानले जाते. सगळ्यात आधी सुरुवातीला भारतात ‘बेंगाल गॅझेट’ नावाचे वृत्तपत्र होते. तेव्हापासून आज भारतात अनेक नवनवीन वृत्तपत्रे आली. २०२३ मध्ये जवळ-जवळ दहा हजार पेक्षा जास्त वर्तमानपत्रांची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच काय तर वृत्तपत्रांचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप वाढले. त्यामुळे नवनवीन वृत्तपत्रे तयार होऊ लागली. आज तर भारतात प्रत्येक भाषेत आणि बोलीभाषेत देखील वृत्तपत्रे आहेत.

टिळकांनी सुरू केलेलं ‘केसरी’ आणि ‘मराठा’ हे त्या वेळेचे जनजागृती चे सगळ्यात मोठे साधन होते. टिळकांना जो संदेश भारतीयांना द्यायचा असायचा, तो या दोन वृत्तपत्राद्वारे दिला जायचा. तसेच भारतात सध्या ‘द हिंदू’, ‘द इंडियन एक्सप्रेस’ हि महत्त्वाची वृत्तपत्रे आहेत.

“नमस्कार! मी ‘लोकसत्ता’ नावाच वृत्तपत्र बोलतोय. माझे आता खूप वय झालेले आहे. मी राजकीय गोष्टींसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध होतो. परंतु आता मी खूप मागे पडत चाललेलो आहे. कारण आजकालचे लोक वृत्तपत्र वाचायलाच मागत नाहीत. त्यामुळे माझा जास्त वापर कोणी करतच नाही.”

“परंतु पूर्वीच्या काळात माझे महत्त्व खूप जास्त प्रमाणावर होते. मी राजकीय गोष्टींसाठी तर खूप महत्त्वाचा होतो. कोणतीही मोठी राजकीय घडामोड झाली की सगळ्यात पहिले त्याची बातमी मीच लोकांपर्यंत पोहोचवत होतो. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांच्या आयुष्याची माहिती देखील मीच सर्वांपर्यंत देत होतो. तसेच दर रविवारी येणारी पुरवणी आणि त्यातून मिळणारे संदेश, याची लोक आतुरतेने वाट बघत असायचे. तसेच भारतीय आणि क्रिकेट हा खूप पूर्वीपासूनचा चालत आलेला घनिष्ठ प्रकार आहे. भारतीय क्रिकेटसाठी किती वेडे आहेत, हे मी सांगायची गरज नाही. आपण ते वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. क्रीडेची संपूर्ण माहिती ही देखील मीच सर्वांपर्यंत पोहोचवत होतो. कोणत्या खेळाडूने किती धावा काढल्या?, कोण कसे हरले? याची माहिती मी पोहोचवत होतो. तसेच खेळाडूंच्या लग्नापर्यंतच्या सगळ्या बातम्या मी सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचवायचो”.

“तसेच माझ्यावर लिहिले जाणारे देश- विदेशाचे, तसेच खाण्याचे लेख, हे देखील खूप माहिती देणारे असायचे. हे सगळे लेख वाचून लोकं कुठे फिरायला जायचे, हे ठरवायचे. तसेच काय खायला जायचे हे सुद्धा!” “एखाद्या नवीन शहरात कोणते नवीन दुकान उघडले आहे. तर त्याची खासियत काय ? हे मी सर्वांपर्यंत पोहोचवायचो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *