मी सायकल बोलते | सायकल निबंध मराठी

सायकल निबंध मराठी | मी सायकल बोलते…

सध्या बाजारात सायकलचे एक नवीन मॉडेल आले आहे.  त्या सायकल मध्ये सगळ्या सुविधा आहेत, त्या वर हेलमेट फ्री! अशी सायकल बघून मला माझ्या जुन्या सायकलीची आठवण झाली. माझी सायकल एवढी मॉडर्न आणि  आधुनिक पद्धतीने सेवा देणारी अशी नव्हती. खूप सोई सुविधा तर लांबच राहिले, ती तर खूप साधी सायकल होती. ती विकत घेलयांनातर त्याला आम्ही पुढे बास्केट वगेरे लावला.

साधी सरळ पण खूप छान अशी निळी शार सायकल होती माझी. सगळ्यात पहिल्यांदा पहिलं गिफ्ट म्हणून ती मला बाबांनी घेऊन दिली होती! माझ्या आयुष्यातील ती पहिली सायकल होती. म्हणूनच ती माझ्यासाठी खूप खास होती.

मी माझ्या सायकलीला अगदी मनापासून आठवत होते. तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. मी थोडी दचकले! एकडे-तिकडे बघितल. तेव्हा कळलं की माझी जुनी सायकल माझ्याशी बोलत होती. माझ्या पर्स मध्ये माझ्या जुन्या सायकल चा फोटो आहे. त्या फोटो मधूनच ती माझ्याशी बोलत होती.

“काय ग अनघा, आली का तुला माझी आठवण? बऱ्याच लवकर आठवलं मला. तू आठ वर्षांची होतीस, तेव्हा तुझ्या बाबांनी मला घरी आणले. त्याचाही किस्सा आठवते का ग तुला?” मी “हो” म्हंटलं आणि डोळ्यात पाणी आले माझ्या. सायकल परत बोलू लागली. “नको रडू ग पोरी! माझ्या लाडाची मैना आहेस तू. तुझे बाबा माझ्या बहिणीला, म्हणजेच त्या दुकानातील गुलाबी सायकल ला उचलून आणणार होते, तेव्हा तू खूप दंगा केला होतास. म्हणाली होतीस की “ नाही मला गुलाबी सायकल नको, मला ही निळी सायकल आवडली आहे.” आणि एवढा दंगा करून, हट्टाने तु मला  बाबांकडून घेतलं! आणि घरी आणल्या वर मला दाखवत पूर्ण  सोसायटीवर फिरलीस. दामले काकूंनी माझं स्वागत केलं. हळदी कुंकू लावून, दिव्याने ओवाळून, मला फार भारी वाटलं होतं तेव्हा. तू सगळ्यांना दाखवत, मिरवत असे. मला घेऊन फिरत होतीस अख्या कॉलनीत.”

“तुला आठवते का तो किस्सा? जेव्हा तू पहिल्यांदा मला घेऊन निघाली होतीस, इतका फास्ट चालवलं मला की जोरात पडलीस तेव्हा तुलाही लागला आणि मला ही!”

 “तू इतक्या छान पद्धतीने मला सगळ्यांसमोर दाखवलं की सगळ्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. मला चालवण्याचा जर कोणी हट्ट धरला तर तू सगळ्यांना पळवून लावत होतीस! मग एक दिवस काय माहिती का? पण उदार होऊन तू  सगळ्यांना दोन-दोन मिनिटांसाठी मला चालवायला दिल. पण तेव्हाही तू घाबरत होतीस, की जर कोणी मला पाडले आणि माझा कुठचा अवयव तुटला तर तुला फार दुःख होईल, राग येईल.”

“अनघा तू माझी मनापासून काळजी घेत होतीस. तुला नंतर बाबांनी अजून दोन सायकली आणून दिल्या होत्या. तरीसुद्धा तुला मीच आवडत होते. कारण मी तुझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिल वाहन होते, म्हणूनच तू माझी खूप मनापासून काळजी घेतलीस. पण जेव्हा मी जुनी झाली. तेव्हा एकदा तू मला तेजसला देऊन टाकायचा विचार करत होतीस. तेव्हा बाबांनी तुला अडवलं. नाही तर विकलच असतं की मला! खरं सांगू का? तेव्हा मला तुझा खूप राग आला होता पहिल्यांदा. पण ती तुझी पहिली आणि शेवटची चूक. त्या नंतर मात्र तू मला नाही जाऊ दिलं कुठेच.”

 “आज तुझं लग्न झालं आहे. तरीसुद्धा तू मला बाबांच्या घरी खाली पार्किंगला अगदी व्यवस्थित कंडिशन मध्ये ठेवल आहेस. बाकीच्या दोन सायकल तर तू कधीच विकून टाकल्यास पण मला नाही विकले अजून! याच मला खूप बरं वाटतं.”

“आजही मला खूप बरं वाटतंय. कारण एवढ्या वर्षानंतर तुला माझी आठवण आली. पण आता तू मला कधीच चालवत नाहीस. तुझ्याकडे आता दुचाकी, चार चाकी अश्या एक नाही दहा गाड्या आल्यात. तू त्यांनाच घेऊन फिरतेस आजकाल. तुला आरामदायी गाड्या वापरायची फार सवय झाली आहे.”

“ठीक आहे, मला चालवायला तुला थोडे कष्ट घ्यावे लागत होते. पण तेव्हा तू खूप फिट होतीस. तुला वेगळा व्यायाम करायला नाही लागायचा. आता मात्र तू खूप आळशी झाली आहेस. आता फक्त चार चाकी घेऊनच फिरतेस आणि जर चारचाकी नसेल तर कॅबचा वापर करतेस. पण त्या वेळी तू असा विचार करत नाहीस की, आज चार चाकी नाहीये तर मला घेऊन ऑफिसला जावं किंवा मला घेऊन बाजारात जावे. तुला थोडीफार शारीरिक समस्या देखील सहन कराव्या लागतात. जेव्हा तु मला वापरत होतीस तेव्हा तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. कारण तुझा रोज व्यायाम होत होता. फक्त व्यायामच नाही, तर जेव्हा तुम्हाला वापरत होतीस तेव्हा तू या पर्यावरणात प्रदूषणही करत नव्हतीस पण आता तू दुचाकी, चारचाकी या माध्यमातून इंधन वापरतेस. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि आवाजाचे प्रदूषण करतेस. या आधुनिकीकरणात तुम्ही सायकल ला म्हणजेच मला विसरून जात आहे! पण एक लक्षात ठेव. आज मोठमोठ्या कंपनीत मुले, सीईओ आणि मोठी मोठी जाणकार लोक माझ्याकडे परत वळतात. कारण त्यांना या पर्यावरणाला अजून त्रास द्यायचा नाहीये!”

“तू एक काम कर. मला एकदा चालून बघ, तुला छान वाटेल. बाकी चॉईस इज योअरस.”

“पण माझ्यासाठी तू माझी पहिली आणि शेवटची सखी असशील. तू मला चालव काय किंवा नाही चालवले काय मी तुझ्यासाठी कायम असणारे.”

पुढे बोलून सायकलने बोलणं थांबवलं. आणि मला रियालिटी चेक देखील मिळाला. मला लक्षात आलं की मी माझ्या सायकलीला खरंच खूप मिस करते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *