मी पुस्तक बोलतोय निबंध लेखन

मुळात पुस्तके ही फार छान असतात. पुस्तके म्हटली की ती ज्ञानाची एक अद्वितीय प्रतीक असतात. पुस्तकांमध्ये आधीच्या लोकांचे तर सर्व जगत सामावलेले असायचे. पुस्तके आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. एक पुस्तक वाचून आपण अस्तित्वात नसलेल्या जगामध्ये फिरून येऊ शकतो. पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना खूप छान रंगवून सांगितले जाते. आपण एकाच वेळेला अनेक लोकांचे आयुष्य पुस्तकामार्फत वाचत असतो, अनुभवत असतो.

मुळात पुस्तके वाचणे हा एक अनुभव आहे. पुस्तके माणसाला नेहमी खरे बोलायला आणि वागायला शिकवतात. आपण जसे आहोत तसेच आपण दाखवायला पाहिजे, कोणताही खोटेपणा न करता. म्हणूनच पुस्तकातली एक-एक पात्रे खूप महत्वाची असतात. लेखक या पात्रांमार्फत आपल्याला जणू आयुष्याचे धडेच गिरवत असतो. पुस्तके आपली कधीच साथ सोडून जात नाही. एक वेळ माणूस माणसाची साथ सोडून जाईल, पण पुस्तके कधीच सोडणार नाहीत. मुळातच पुस्तके आपल्या आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला ज्ञानाचा महासागर उपलब्ध करून देत असतात. अगदी सुरुवातीला ‘’अ, ब, क, ड’’ पासून ते मरेपर्यंत. अध्यात्मिक पुस्तकांमुळे आपले जीवन खूप सुखकर होते. पुस्तकाचे अनेक प्रकार देखील असतात, जसे कि रहस्यमय कथा. काही वेळा या रहस्यमय कथा वाचून अश्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात का बरे घडत नाहीत? असा माणसांना प्रश्न पडतो. रहस्यमय कथा आपल्याला खूप काही गूढ-गुपिते देऊन जातात.

“काही वेळा लोक भाषा आणि शैली समृद्ध करण्यासाठी माझा वापर करतात. कधी-कधी मी भयपट होतो, तर कधी दिवाळी अंक होतो. दिवाळी अंक तर सगळ्यात मोठी शान असते. वर्षभरात एकदाच दिवाळी अंकाला मान मिळतो. त्यात असलेल्या गोष्टी आपल्याला खूप काही सांगून जातात. तसेच शिकवून जातात.

एकूणच काय तर साहित्याच्या जगात पुस्तके सगळ्यात उच्च स्थानावर असतात. पुस्तकांमुळे जगातील साक्षरता वाढते. मग ती अभ्यासाची पुस्तके असू देत, नाही तर कादंबरी, ललित लेखन असू देत किंवा नाट्यसंगीत. मी जरी वेगवेगळ्या गरजांसाठी वापरला गेलो असलो तरी शेवटी माझी किंमत लोकांना कायम असते”.

“पण सध्याच्या काळात मात्र हळूहळू यात बदल होत आहे. पुस्तकांचे महत्त्व कमी होत आहे. ही नवीन पिढी खूप आपलेपणाने मला वाचतच नाही. उलट त्यांचा नाईलाज असतो, तेव्हाच ते मला हातात घेतात. अन्यथा मला वाचत सुद्धा नाहीत!”

“असो, मी माझी ओळख करून देतो. नमस्कार! मी ‘व. पु. काळे’ यांच पुस्तक ‘सखी’ नावाच”.

“कसे आहात सगळे? आज मला खूप आनंद झालाय. कारण आज ‘गोडबोल्यांच्या’ घरी येऊन एक वर्ष पूर्ण झाले. म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलतोय.

एक वर्ष झाले म्हणून एकीकडे मला खूप छान वाटतंय. पण दुसरीकडे खूप दुःख देखील होते. या वर्षभरात मी जास्तीत जास्त दहा वेळा बाहेर निघालोय. लोक आता मला फक्त कपाटामध्ये ठेवायला, घराची शोभा वाढवायला म्हणून घेऊन येतात. पण खरंच किती लोकांना मी मनापासून त्यांच्या घरी हवा असतो? आजकालच्या या आधुनिक काळात खरंच मी महत्त्वाचा आहे का? असे एक नाही, दहा प्रश्न मला कायम पडतात. पुस्तके वाचणे, त्यातून माहिती घेणे, आपले ज्ञान वाढवणे या सगळ्या गोष्टी लोक पूर्वी आवर्जून करायचे. परंतु आता लोकांनी पुस्तक वाचणेच बंद केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुस्तक लिहिणारे त्यांचे संपूर्ण आयुष्य मला लिहिण्यात घालवायचे. मला वाचून लोक आनंदी व्हायचे. माझ्याकडून नेहमी काही ना काहीतरी शिकत राहायचे. पण आता हे सगळच बंद झाले आहे. या आधुनिकीकरणामुळे आता पुस्तकांची जागा कॉम्प्युटर आणि इंटरनेटने घेतली आहे. या आधुनिकतेमुळे माझा वापर जवळ-जवळ बंदच झाला आहे. मी आता फक्त कपाटातील एक सुंदर दागिना झालेलो आहे. ज्याला फक्त आणून सजवून ठेवतात”.

“आज गोडबोले आजोबाच फक्त मला सतत घेऊन वाचत असतात. परंतु बऱ्याच वेळी त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. त्यामुळे ते मला थोड्या वेळ वाचतात आणि परत नेऊन ठेवतात. हे चक्र कायम चालू असते. मी एक गाजलेल पुस्तक आहे. म्हणून एवढी तरी किंमत देतात. जर मी दुसरे एखाद सामान्य पुस्तक असतो, तर मला एवढी देखील किंमत लोकांकडून मिळाली नसती.”

“आजकालच्या आधुनिक जगामध्ये ज्ञानाचा महासागर म्हणल्या जाणाऱ्या पुस्तकांना नवीन पिढी हात देखील लावत नाही. शाळेतील पुस्तके मुले वाचत नाहीत, ती पुस्तके देखील ‘ऑडिओ बुक्स’ मध्ये उपलब्ध असल्याकारणाने ती ऐकतात. तसेच युट्युब वरती त्याचे व्हिडिओज बघतात”.

“स्वयं अध्ययन करून आयुष्यात स्वतःहून ज्ञान मिळवण, हि गोष्ट या पिढीला माहितीच नाहीये. मला नवीन आणले, की नवीन पुस्तकाचा वास घेणे. या केवढ्या मोठ्या सुखाला ही पिढी मुकत आहे. हे त्यांनाच माहिती नाहीये”.

“असो, मी माझ्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण संपवतो. कारण मी असल्या नसल्याने कोणालाच काही फरक पडत नाही”.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *