मी संगणक बोलतोय निबंध

मे महिन्याच्या सुट्ट्यांचे ते दिवस होते. बाहेर साधारण 41 डिग्री एवढे कडकडीत ऊन पडले होते. घरात बसून सुद्धा खूप कंटाळा आला होता. बाहेर जाऊन क्रिकेट खेळावे तर बाकीचे लोक घरी नव्हते. मग काय करायचे?,पुस्तक बिस्तक वाचायला काय मला आवडत नव्हते, म्हणून मी जाऊन बसलो मस्त संगणका पुढे.

‘आठवीला चांगले गुण मिळाले तर मी तुला संगणक गिफ्ट देईन’, या अटी वरती बाबांनी मला नवीन संगणक गिफ्ट दिला होता. नुकताच आलेला हा संगणक माझा अगदी जिवलग मित्र बनून गेलाय, तो बरोबर असेल तर मला बाकी कोणाचीच गरज लागत नाही. आई-बाबांना माझ्याशी खेळायला वेळ नसतो त्यामुळे मी उगाच त्यांना मस्का बिस्का मारत बसत नसे.

आता मी खूप वेळ खेळणार असा विचार करून संगणक सुरू केला आणि माझ्या आवडीचा रोड क्रॅश नावाचा गेम खेळायला सुरुवात केली. हा गेम तसा खूपच छान आहे आणि बाबांनी मला खूप सारे गेम्स डाउनलोड करून दिलेत, पण मला मात्र हाच गेम सगळ्यात जास्त आवडतो. दोन तास मस्त गेम खेळल्यावर मला कुठून तरी आवाज आला, “अरे बास कर की आता किती वेळ खेळशील!”, शोधलं तर कोणीच दिसले नाही. मी सोडून दिलं परत खेळायला लागलो, परत आवाज आला! “काय रे बाळा ऐकू येत नाही का? किती वेळ खेळतोयस बास कर की” आता मात्र मी घाबरलो, इकडे तिकडे बघितलं तर संगणकाचे डोळे आणि तोंड दिसायला लागलं आणि तोच माझ्याशी बोलत होता! मग आमचं मस्त हाय बाय झालं आणि त्याने मला परत तोच प्रश्न विचारला ‘किती वेळ खेळणारेस? उठायचं नाहीये का? बाकी काही करायचं नाहीये का?’, मी त्याला सरळ म्हणालो “मला बाकी काही आवडत नाही ब्रो”.

“अरे राजा मग माझ्याकडून काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न कर, माझा वापर काय फक्त गेम खेळण्यासाठी नाहीये. बाबांनी मला तुला स्मार्ट बनवण्यासाठी, तुझं ज्ञान वाढवण्यासाठी, तुझ्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी घरी आणलंय यातलं तू काहीच करत नाहीयेस फक्त गेम खेळतोय.” संगणक म्हणाला.

“माझ्याकडून तू एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पेंटिंग, टाइपिंग असे एक नाही अनेक गोष्टी शिकू शकशील पण त्यासाठी मुळात इच्छा असणं गरजेचं असतं! आणि तुला काय अभ्यास वगैरे काही करायचं नाहीये, सुट्टी लागली की फक्त गेम खेळायचा आहे.”

“अरे तुझे बाकीचे क्लासमेट सगळे पुढील आयुष्यातील अभ्यास कसा करायचा याचे धडे माझ्याकडून गिरवतात आणि तू मात्र बस गेम खेळत. तुला अभ्यासासाठी पीपीटी पण खूप उपयोगी पडतील, पीपीटी प्रेझेंटेशन देऊन तू परीक्षेत जास्त गुण सुद्धा मिळू शकशील आणि बाकी माझ्यातील इंटरनेट सर्च वापरून तू कोणतीही नवीन रेसिपी शिकू शकशील, पुस्तक वाचू शकशील, चित्रपट पाहू शकशील या सगळ्या गोष्टी सोडून तू फक्त गेम खेळत बसलाय, गेम खेळून कोणीही आयुष्यात पुढे जात नाही एवढे लक्षात ठेव!”.

“घे चल काहीतरी नवीन शिकायला, फक्त हे गुगल म्हण आणि हो सुरू मी आहेच तुझ्या पाठीशी!”.

संगणकाचे एवढं सगळं बोलणं ऐकून मी इन्स्पायर झालो. गुगलला सर्च दिला ‘हाउ टू मेक पीपीटी प्रेझेंटेशन?’ आणि नुसता मी एकटाच संगणकाचा चांगला फायदा करून घेणार नाही, तर माझे जे मित्र परिवार आहे त्यांना देखील सांगेन. ‘तुम्ही सुद्धा संगणकाचा चांगला उपयोग म्हणजे चांगल्या कामासाठी फायदा करून घ्या’. नुसता वेळ खेळण्यात न घालवता काही तरी चांगल्या कामात घालवा. नवीन गोष्टी शिका ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासात होईल, नंतर च्या शिक्षणाला होईल. आम्ही सगळे मिळून जर एकत्र पिपीटी बनवायला शिकलो तर त्याचा फायदा आम्हाला ग्रुप प्रोजेक्ट मध्ये सुद्धा होईल. चांगला अभ्यास करू शकू.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *