भारतामध्ये खेळले जाणारे खेळ

भारत आणि पारंपरिक खेळ यांचे खूप घनिष्ठ नाते आहे. खूप वर्षांपासून अनेक खेळ भारतामध्ये खेळले जातात. यात भारतीय पारंपरिक खेळांचा समावेश तर आहेच, परंतु आधुनिक काळात पाश्यात्य खेळ देखील भारतामध्ये खेळले जातात.

भारतीय सरकार आता जुन्या भारतीय खेळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पारंपारिक भारतीय खेळाला बऱ्यापैकी कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची आवश्यकता नसते. भारतातील विविध प्रदेशांमध्ये विविध खेळ खेळले जातात, ते कोणते हे आपण बघूया.

त्यामध्ये ‘खो-खो’ हा साधारण चौथ्या शतकांपासून खेळला जाणारा खेळ आहे. याचा उल्लेख महाभारतामध्ये देखील झालेला आहे. तसेच ‘बुद्धिबळ’ हा देखील एक प्राचीन ‘बोर्ड गेम’ आहे. पूर्वीच्या काळी बुद्धिबळाचा आकार खूप मोठा असायचा. तसेच त्याच्या सोंगट्या सुद्धा खूप मोठ्या असायच्या. तसेच महाभारतात जर आपण बघितले, तर अभिमन्यूच्या मृत्यूवेळी जे चक्रव्यूह बनवले होते, त्याचा थोडाफार संदर्भ हा कबड्डी आणि खो -खो मध्ये खेळल्या जाणाऱ्या कौशल्याच्या संदर्भात आपण बांधू शकतो.

तसेच वेगवेगळ्या राजघराण्यांमध्ये देखील बऱ्यापैकी खेळ खेळले जायचे. बऱ्याचश्या राजकन्यांना घोड सवारी देखील शिकवली जायची.

मध्ययुगीन खेळांमध्ये देखील अनेक खेळांचे उल्लेख आपण भारतामध्ये बघतो. परकीय आक्रमणामुळे भारतात अनेक नवीन खेळ रुजू झाले. जसे ब्रिटन म्हणजेच ब्रिटिशर्स आल्यावरती त्यांनी क्रिकेटशी आपली गाठ घट्ट बांधली.

या खेळांमध्ये अनेक जुन्या खेळांचे देखील संदर्भ आहेत. जसे लंगडी, चोर-पोलिस, विटी -दांडू असे एक नाही, अनेक खेळ आहेत. तसेच भारतीय इतिहासात आपण ‘मार्शल आर्ट्स’ सारखे देखील खेळ बघतो. ‘अंताक्षरी’ हा आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ आहे. जेव्हा सगळे लोक जमतात तेव्हा आपण अगदी आनंदाने अंताक्षरी खेळतो. मुळात खेळांचे जे दोन प्रकार असतात, घरात खेळले जाणारे खेळ आणि बाहेर खेळले जाणारे खेळ. हे दोन्ही प्रकार भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळतात. मुळात खेळ हा भारतीयांसाठी एक अविभाज्य घटक आहे.

या सगळ्या खेळांमध्ये आत्ता चालू असणारे आणि खूप प्रसिद्ध असणारे काही खेळ आपण पुढे बघूया.

1. कबड्डी- हा खेळ खूप पूर्वीपासून भारतामध्ये खेळला जातो. सध्याच्या काळात ‘प्रो कबड्डी लीग’ नावाची एक स्पर्धा घेतली जाते. ज्यात भारतातील अनेक महत्त्वाचे कबड्डीपटू भाग घेतात. ही स्पर्धा २०१४ पासून सुरू झाली. तसेच कबड्डीमध्ये नवीन प्रेक्षक वर्ग तयार व्हावा, म्हणून अशा सगळ्या स्पर्धांचे नियोजन केले जाते.

2. खो-खो- हा सुद्धा भारतातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध खेळ आहे. प्रत्येक शाळांमध्ये, जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर हा खेळ खेळला जातो. शाळा, महाविद्यालय येथे वेगळ्यावेगळ्या गटांमध्ये स्पर्धा खेळल्या जातात. आजकाल आपले जुने खेळ जतन करावे, म्हणून प्रत्येक खेळाच्या ‘लिग’ ठेवल्या जातात. तसेच खो-खो ची स्पर्धा टीव्हीवर दाखवली जाते.

3. लंगडी-लंगडी- हा सुद्धा अत्यंत जुना आणि अत्यंत प्रसिद्ध असा खेळ आहे. जो प्रत्येक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये खेळला जातो. लंगडीचे सुद्धा गट केले जातात. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर त्यांच्या स्पर्धा होताना आपण बघतो.

4. सापशिडी- भारतात तर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर सापशिडी हा खेळ खेळला जातो. राजे -महाराजे सुद्धा सापशिडीचा खेळ खेळायचे. आत्ता सुद्धा सापशिडीचा खेळ प्रत्येक घरात खेळला जातो.

5. क्रिकेट- ब्रिटिशांकडून भारताकडे आलेला हा ‘क्रिकेट’ खेळ अत्यंत लोकप्रिय ठरला. १९८३ च्या विश्वचषकापासून भारताने आपली जागा या खेळात जगाला दाखवायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकर, धोनी आणि आता कोहली यांच्या नेत्वाखाली भारत आपले नाव जगाच्या पाठीवर कोरत आहे. लोकांना क्रिकेट इतका लोकप्रिय आहे की प्रत्येक गल्लीत क्रिकेट खेळला जातो. तसेच सचिन तेंडुलकरला लोक अगदी देवासमान मानतात. तसेच ज्या वेळेला भारत -पाकिस्तान मॅच असते किंवा भारत कोणत्या महत्त्वाच्या संघाबरोबर खेळत असतो. तेव्हा लोक देवासमोर बसून असतात, की भारत जिंकू दे. इतकं प्रेम आपलं या खेळावर आहे.

6. फुटबॉल- हा फक्त भारतातीलच नाही, तर जगातील लोकप्रिय खेळ आहे. भारतीय फुटबॉल संघ सध्या जगात १०५ क्रमांकावर आहे. भारतीय फुटबॉल संघाची लोकप्रियता बरीच आहे. तसेच अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये फुटबॉल खेळला जातो.

7. बॅडमिंटन- हा देखील भारतीयांचा आवडीचा खेळ आहे. भारतीय खेळाडूंनी आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. यात ‘पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, प्रकाश पादुकोण, पुलेला गोपीचंद, श्रीकांत’ यांचे नाव फार मोठे आहेत.

8. कुस्ती- भारतामध्ये कुस्ती हा देखील खूप जुना खेळ आहे. कुस्तीमध्ये ग्रामीण भागातून खूप खेळाडू पुढे येतात. भारताला कुस्ती मधून देखील अनेक पारितोषिके कुस्तीगिरांनी मिळवून दिलेली आहेत. कुस्तीचा आखाडा हा सन्माननीय आहे. ‘सुशील कुमार’ हे कुस्ती या खेळातील एक मोठे नाव आहे. २००८ पासून बीजिंग ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर आपले नाव कुस्तीसाठी खूप पुढे आले. तसेच ‘फोगाट गर्ल्स’ म्हणजेच ‘गीता फोगाट’ आणि ‘प्रियंका फोगाट’ यांनी मोठी बाजी मारली.

9. टेनिस- भारताने टेनिस मध्ये सुद्धा खूप मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. महेश भूपती यांनी २०१४ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय प्रीमियर लीग’ सुरू केली. आपले अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. ‘रोहन बोपन्ना’ आणि ‘सानिया मिर्झा’ हे दोन अनुभवी टेनिसपटू आहेत. त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे. तसेच ‘नदाल’ हा जगप्रसिद्ध खेळाडू सुद्धा टेनिसच खेळतो.

10. हॉकी- हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आपण १९२८ पासून ते १९५६ पर्यंत हॉकी स्पर्धेमध्ये सहा वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच ‘ध्यानचंद’ हे हॉकीतील मोठे नाव आहे. आपल्याकडे भारतात कृत्रिम मैदान नाहीत. म्हणून हॉकी हा खेळ सध्या खूप प्रसिद्ध नाहीये. पण भारतीय खेळाडू हे गवतावर खेळून हॉकीचा सराव करतात. तसेच ‘चक दे इंडिया’ नावाचा खूप प्रसिद्ध सिनेमा देखील हॉकी या खेळावरतीच आधारित आहे. असे एक नाही, अनेक खेळ भारतात खेळले जातात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *