स्वातंत्र्य दिन निबंध

15 ऑगस्ट, 1947’ रोजी आपल्या भारत स्वतंत्र झाला. 250 वर्षांपेक्षा जास्त वर्षानंतर आपला भारत खूप कष्टांनी स्वतंत्र झाला. ‘1857 च्या उठाव’ पासून सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांनी खूप कष्ट केले!

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ‘75’ वर्षे झाली, भारताने खूप प्रगती केली आहे. आमच्या शाळेमध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आम्ही सगळे सकाळी सहा वाजता एकत्र जमलो. त्यानंतर मुख्याध्यापक आणि बाकीचे शिक्षक यांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडला. झेंडावंदन करत असताना आम्ही सगळ्यांनी ‘जन गण मन’ हे आपले राष्ट्रीय गीत म्हटले. तसेच सगळ्यात खास म्हणजे, सगळेजण शिक्षक आणि विद्यार्थी झेंड्यांचे रंग अशी वस्त्रे परिधान केली होती! कोणी पांढरे रंगाची वस्त्र घातली होती, तर कोणी नारंगी!

भारत मातेला वंदन करून आम्ही आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली.

त्यात कोणी नृत्य दाखवले, तर कोणी गाणे म्हटले. पण सगळ्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली होती ते म्हणजे सगळे नृत्य, सगळे गाणी ही देशभक्तीवर अशीच आधारलेली होती! मी जी नृत्य सादर केली होती, त्यात भारतीय नृत्य प्रकारचे विविध रंग रेखाटले होते. कोणी भरत नाट्य, कोणी कथकली, तर कोणी कथक, कोणी भांगडा असे विविध प्रकार सादर केले. आपल्या भारतातील सार्वभौमत्वाचे महत्व सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या नृत्या मधून दाखवले. महाराष्ट्रातील विविध भागातील नृत्य प्रकार देखील एका ग्रुपने सादर केले.

तसेच देशभक्तीपर गीते देखील खूप विद्यार्थ्यांनी सादर केली. काही विद्यार्थ्यांनी छोटी नाटके देखील तयार केली होती, त्या नाटकांमध्ये सुद्धा काही प्रसंग हे इतिहासाचे घेतले होते. त्यामुळे आपल्या देशाचे भरभरून कौतुक झाले.

आम्ही पण एक छोटस नाटक लिहिले होते, त्यात आम्ही भारतीय राजकारण, आपल्या देशात होणारा भ्रष्टाचार यावर छोटे नाटक सादर केले. आपल्या भारतात झालेली प्रगती दाखवली. एक छोट्या पीपीटी च्या माध्यमातून आम्ही इतक्या वर्षात भारताने औद्योगिक क्षेत्रात कोणती कोणती प्रगती केली याचं एक प्रेझेंटेशन बनवले होते ते देखील आम्ही सादर केले!

आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे एवढे कष्ट बघून मुख्याध्यापक आणि बाकीचे शिक्षक खूप खुश झाले.

एवढ्या सगळ्यांनी आपले आयुष्य बाजूला ठेवून आपल्या देशासाठी लढा दिला त्या सगळ्यांचे कष्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्याध्यापकांनी देखील एक छोटेसे भाषण दिले, त्यात त्यांनी आपल्या भारतातील पुढच्या पिढीचे महत्त्व सांगितले, तसेच भारत अजून कसा प्रगतिशील होऊ शकतो? याची देखील आम्हाला सगळ्यांना कल्पना दिली. सर्वांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सगळेजण आपापल्या घरी गेले.

आम्ही सगळे घरी आलो आणि आपल्या देशातील लाल किल्ल्यावरचे सेलिब्रेशन आम्ही टीव्हीवर बघायला सुरुवात केली. या देशाचे प्रंतप्रधान देशाच्या भल्यासाठी किंवा एकूणच सगळ्या गोष्टींसाठी भाषण देतात. सगळ्यात पहिल्यांदा झेंडा फडकवला जातो, मग भाषण होते आणि आपला स्वातंत्र्य वीरांचे स्मरण होते. या दिवशी एखाद्याला कोणतीही कला दाखवायला किंवा परेडमध्ये भाग घ्यायला मिळाले, तर ते खूपच प्रेस्टिजिअस असते. संपूर्ण भारतासमोर काही खास लोकांमध्ये त्यांची गणना असते. त्यामुळे हे सगले बघायला आम्हाला खूप आवडते.

यामध्ये वेगवेगळ्या कला सादर होतात. भारतातील नामवंत कलांचे प्रदर्शन या दिवशी सगळ्या भारतासमोर आणि जगासमोर सादर होते.

यावर्षी आमच्या मुख्याध्यापकांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की, ‘तुम्ही झेंडे विकत घेऊ नका किंवा घेतला तरी तो झेंडा दुसऱ्या दिवशी पायदळी जाणार नाही, याची काळजी नक्की घ्या. कारण आपण आपल्या देशाच्या झेंड्याचा अपमान करू नये.’ मग बाबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्वातंत्र्य दिवस कसा साजरा केला हे सांगितले. आईने तिच्या हॉस्पिटलमध्ये कसा स्वातंत्र्य दिवस साजरा होतो हे सांगितला. एकूणच काय तर सगळ्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खूप उत्साहाचे वातावरण असते आणि ते आपण तसेच ठेवले पाहिजे कारण आपल्या यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *