माझा भारत देश महान

Featured image- maza bharat mahan nibandh

माझा भारत देश महान निबंध

आपल्या सर्वांची भारत माता 2023 मध्ये स्वतंत्र होऊन 76 वर्षे झाली आहे. ‘15 ऑगस्ट 1947’ ला भारत स्वतंत्र झाला. तसे तर संपूर्ण भारत असताना मराठ्यांच्या काळा पासूनच भारताने एक नाही तर अनेक गोष्टींमध्ये अग्रगण्य यश मिळवले आहे.

भारतातील शेती, कारखाने, आधुनिकीकरण व तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये मोठे यश मिळवले आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ‘विविधता मे एकता’ या सुविचाराला देखील घेऊन चालतो. म्हणजेच काय तर भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही संस्थेचा देश आहे. आणि एवढ्या लोकसंखेच्या, मोठ्या देशांमध्ये अनेक प्रकारची विविधता आपुलकीने राहतात.

गेल्या 76 वर्षात भारताने अनेक गोष्टींमध्ये खूप यश मिळवले आहे. मुळातच व्यवस्थित आखणी करून आपण एकेका गोष्टीत हळूहळू पुढे जात आहोत. लहानपणी आपल्याला ससा व कासवाची गोष्ट सांगितली जायची. त्यात ससा अतिघाई करून जिंकण्याच्या ओघात अति आत्मविश्वास दाखवतो आणि शेवटी हरतो. पण तेच कासव हळूच जातो आणि शर्यत जिंकतो. हेच लक्षात ठेऊन भारताने निर्णय घेतले आहेत. तिच गोष्ट समोर ठेऊन हळूहळू प्रगती करू, या गोष्टीवर जास्त भर दिला आहे. कारण जे देश खूप लवकर पुढे जातात ते तसेच मागे पण येतात. ते म्हणतात ना ‘कमी प्रयत्नात मिळाले यश हे जास्त काळ टिकत नाही’.

 भारताने खेळ, स्वयंपाक, इन्फ्रास्ट्रक्चर, गाड्या, सायन्स, शेती शिक्षण, न्यूक्लिअर एनर्जी, नृत्य, संगीत, मुव्हीज व इतरही सगळ्या गोष्टींमध्ये एक अग्रगण्य असे यश मिळवले आहे.

तसेच भारतातील बदलत्या राजकीय परिस्थितीत मुळे भारतात अनेक बदल घडत असतात. पण गेल्या काही वर्षात जी राजकीय सेवा भारताला मिळत आहे. त्यानुसार भारताला जगात एक वेगळे प्रकारचे स्थान प्राप्त झाले आहे.

सध्याचा भारत हा अत्यंत प्रगतीशील आणि विकसनशील बनला आहे. भारतातील खेळामध्ये तर प्रचंड प्रगती केली आहे. एशिया वर्ल्ड कप असू दे की असू दे की आयपीएल असू दे आपण प्रत्येक क्षेत्रात जिंकतो आहे. मुळातच भारतातील खेळ हे आपल्या मातीशी खूप निगडित आहेत. म्हणजे काय तर भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या खेळाचे ट्रेनिंग ही फिजिकल फिटनेस पासून चालू केले जाते. आपण भारतीय आहोत ही फिलिंग सगळ्यात पहिले खेळाडूंमध्ये आणले जाते. आपल्याला स्वतःसाठी खेळायचे नसून आपल्याला भारत मातेसाठी खेळायचा आहे. या शिकवणीतूनच आपले सर्व खेळाडू पुढे येतात, त्यामुळेच आपण जगापासून वेगळे असे तयार होतो.

सध्याच्या 2023 वर्ल्ड कप मध्ये तर भारत अजून एकही मॅच हरलेला नाही. या आशेवर भारतीयांचे विश्व चषक जिंकण्याच्या स्वप्नात बळ आले आहे. तसेच सध्या ‘बुद्धिबळ’ या खेळात देखील भारताचे अग्रगन्य असतात. भारत देशाने या जगाला कित्तेक ग्रांड मास्टर्स दिले आहेत. आपण बघतो ‘कॅरम’ मध्ये देखील भारताचे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. तसेच ‘नीरज चोप्रा’ सारखे लोक ‘जेवलिण थ्रो’ नावाच्या एका वेगळ्या खेळात देखील मोठे यश मिळवत आहेत. नीरज चोप्राने तर सुवर्ण पदक मिळवून जगाच्या पाठीवर भारताचा एक नवीन इतिहास लिहिला आहे. त्यांची ही कामगिरी अजूनही सुरुच आहे.

भारताने ‘कुकिंग’ या क्षेत्रात देखील खूप प्रगती केली आहे. म्हणजेच काय तर ‘मास्टर शेफ ऑफ इंडिया’ असू देत. ‘मास्टर शेफ ऑफ ऑस्ट्रेलिया’ किंवा वर्ल्ड मधील कोणते मास्टरशेफ असू देत त्यामध्ये एखादा तरी सदस्य हा भारतीय दिसून येतो. भारतीय डिश जगापर्यंत पोचवले जात आहे. पारंपरिक पदार्थ एका वेगळ्या पद्धतीने सादर करून आपल्या रेसिपीज जगापर्यंत पोहोचवायचे काम आपले हे शेफ लोक उत्तम रित्या करत आहेत.

मुळातच भारतीय खाद्य संस्कृती ही बाकीच्या जगभरातील खाद्य संस्कृती पेक्षा खूप वेगळी आहे. आपल्याकडे वापरले जाणारे मसाले हे जगापासून आपल्याला वेगळे सिद्ध करतात. सध्याच्या जगात सर्व देश शाकाहारी जेवणाकडे आकर्षिले जात आहेत. त्यात भारताचा क्रमांक पहिला येतो. कारण आपल्या देशात सगळ्यात जास्त लोक हे शाकाहारी जेवण जेवतात.

 भारताने हे जगाला सिद्ध देखील केले आहे. मांसाहार सारखेच शाकाहारी जेवण सुद्धा तेवढेच चांगले बनवून लोक चवीने खाऊ शकतात.

भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर देखील एका वेगळ्या लेव्हलवर आता जाऊन पोहोचले आहे. म्हणजेच काय तर आपण सध्या करत असलेले बांधकामे हे येणाऱ्या वर्षात खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. जसे समृद्धी महामार्ग, अयोध्या मंदिर, विविध प्रकारच्या प्रतिमा. सध्या निर्मित होत असणाऱ्या अयोध्या मंदिराची तर भक्कम असणारा गाभा हा भूकंप ने ही बाधित झाला नाही. अशा प्रकरचे रचना करण्यात येत आहे.

फ्रान्स आर्किटेक्चर किंवा गॉथिक आर्किटेक्चर या सगळ्या जगभरातील मोठ्या-मोठ्या स्टाईल सोडून आपण पारंपारिक भारतीय आर्किटेक्चर स्टाईलनुसार सध्याची बांधकामे करत आहोत. नवनवीन अंतरराष्ट्रीय दर्ज्याचे संघटना भारतात त्याचे मुख्यालये बनवण्या साठी त्यांची इच्छा दर्शवत आहेत.

भारताने गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील खूप प्रगती केली आहे. सध्या जगात ‘टेस्लाच्या’ जगात ‘टाटा’ व ‘महिंद्रा’ आपले पाय घट्ट रोवून आहे. विविध प्रकारच्या गाड्या त्यांच्या कारखान्यांसाठी भारत सरकारशी बोलणी करत असल्याचेसमोर आले आहे.

नुसतच एवढेच नाही तर भारताने ‘सायन्स’ क्षेत्रामध्ये देखील प्रचंड प्रगती केली आहे. याच वर्षी रक्षाबंधनाच्या दरम्यानच्या काळात इस्त्रो ने ‘चांद्रयान 3’ हा प्रकल्प उत्तमरीत्या घडवून आणला. भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रावर अशा भागात लँड केले जिथे अजून कोणताही देश पोहचू शकला नाही. भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी जणू भारताला उच्च स्थानावर नेऊन ठेवते.तसेच सह्या कार्यात असलेला गगनायण हा प्रकल्प भारताला एका आगळ्या वेगळ्या जागतिक मालिकेत घेऊन जाणार आहे.

 भारताने शेतीमध्ये देखील प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा ‘हरितक्रांती’ झाली नव्हती. त्याआधी भारतात वर अशी वेळ आली होती, की भारताने अमेरिकेतून अत्यंत खालच्या दर्जाचे असे गहू आयात केले होते आणि लोकांना खायला दिले होते. तेव्हा अनेक प्रकारची रोगराई पसरली होती. लोकांची उपासमार झाली होती. परंतु आत्ता हरितक्रांतीनंतर भारताने शेतीमध्ये एवढी प्रगती केली आहे की आपण सगळ्या गोष्टी भाजीपाला, मसाले, बिगर बासमती प्रकारचा तांदूळ, बासमती तांदूळ व विविध प्रकारचे समुद्री प्राणी सगळ्या जगाला निर्यात करतो. आपल्या भारतातील शेतकऱ्यांनी खरंच खूप मोलाचे योगदान दिले आहे, ज्यांनी भारताला अन्नधान्य मध्ये सुदृढ देश बनण्यास मदत केली.

 भारताने शिक्षण क्षेत्रात सुद्धा प्रचंड प्रगती केलेली आहे. अगदी ‘वैदिक संस्कृती’ पासून ते आत्ताच्या काळापर्यंतचा सगळा इतिहास. जवळपास सगळ्या गोष्टी आपण आजही करतो. आपली परंपरा, संस्कृती जपत आपण नवीन आधुनिक जगाला अलगद आपलेसे केले आहे. याचा प्रत्यय आपल्या देशातील शैक्षणिक पद्धती मधून सुद्धा दिसतो.

 भारताने काही वर्षांपूर्वी केलेल्या ‘अणु चाचण्यांमुळे’ आपल्या देशाचे नाव हे ‘अणुशक्तीने समृद्ध देश’ असे देखील घेतले जाते.

 भारतात जवळजवळ 150 हून अधिक भाषा आणि 200 हून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. इतक्या भाषा एका देशात असणारा आपण पहिलेच आहोत.

बॉलीवूड भारत म्हटलं की नृत्य, गाणे आणि कलाक्षेत्र हे आलेच. भारताने केवळ शैक्षणिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रगती केलेली नसून कलाक्षेत्रात देखील खूप प्रगती केलेली आहे. जसे जगभरात हॉलीवुड आहे, तसे भारतात बॉलीवूड आहे, दक्षिणेतील सिनेमा आणि बॉलीवूड इतके प्रसिद्ध आहे की आपली गाणी बाकीच्या देशांमध्ये लोकांच्या अगदी ओठांवर असतात.

सध्याच्या काळात अनेक देशांमध्ये संघर्ष चालू आहेत. ते संघर्ष इतके शिगेला पोहोचले आहेत, युद्ध शब्द परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आजपर्यंत एकदाही भारताने कोणत्याही देशाबरोबर स्वतःहून युद्ध चालू केलेले नाही. ज्यावेळी आपले संविधान लिहिले गेले, त्यावेळेला भारताने आपली ‘विदेशी नीती’ अशी बनवली होती, की आपण स्वतःहून कोणत्याच देशाशी कधीच युद्ध पुकारणार नाही. म्हणूनच जे देश सध्या युद्धामध्ये भरडले जात आहेत. अशा देशापेक्षा आपण खूप वेगळे ठरतो. म्हणूनच मला आपला देश खूप आवडतो. आपला भारत देश हा खरंच महान आहे!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *