मी पाहिलेला निसर्ग निबंध
तसे तर आमच्या कुटुंबाला फिरायला खूप आवडते त्यामुळे दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातोच. मला आणि माझ्या बाबांना निसर्गाच्या जवळ जाणारी ठिकाण तर अजूनच भावतात. निसर्ग सतत खूप देत असतो त्यामुळेच आम्हाला ते बघायला फार आवडते.
यावर्षी आम्ही हिमाचलला गेलो होतो. हिमाचल तर खूपच सुंदर आहे! हिंदी चित्रपटात आम्ही सुरुवातीला हिमाचल चे खूप सारे पिक्चर्स बघितले होते. जे सीन हिमाचलला शूट झालेत, अशा सगळ्या जागांवरती मला आणि माझ्या बहिणीला जायचे होते. त्यामुळे आम्ही बाबांच्या मागे लागलो होतो की आम्हाला बर्फात घेऊन जा. पण आम्ही एप्रिल-मे महिन्यात जाण्याचा प्लॅन केलेला असल्याने तिथे एवढा बर्फ बघायला मिळणार नव्हता. तरी जी जी ठिकाण पिक्चर मध्ये दाखवली आहे ती सगळी आम्हाला दोघींना फिरायची होती!
आमची सगळ्यांची तयारी झाली आणि बाबांनी ट्रिप बुक केली. आम्ही या वेळेला पहिल्यांदाच एका ग्रुप बरोबर, एका कंपनीबरोबर चाललो होतो. नाहीतर बाबांना दरवेळेला स्वतःहूनच सगळ्या गोष्टी प्लॅन करतात, त्यांना ते खूप आवडते. ते इतके उत्साही आहेत की ते प्रत्येक जागी स्वतःहून जातात. तिकडच्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतात, मग आम्हाला तिकडे घेऊन जातात. पण यावर्षीचा प्रदेश खूप वेगळा होता. आम्ही मुंबईवरून हिमाचलला जाणार होतो! त्यात ते अंतर खूपच लांबचे होते. त्यामुळे आम्ही कंपनीबरोबर जायचा निर्णय घेतला.
सगळ्यात पहिले आम्ही मुंबईवरून निघालो, आणि चंदीगडला उतरलो. संपूर्ण दिवस तिकडेच राहिलो. खूप छान छान खाल्ले. चंदीगड हे त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी खूपच सुप्रसिद्ध आहेत! सगळ्या पंजाबी आणि तत्सम उत्तर भारतीय जिन्नस चंदिगडला अगदी भरभरून मिळतात. मग गुजराती असू देत, इंदोरी असू दे नाहीतर पंजाबी असू दे! सगळ्या प्रकारचे खानपान तिथे खूप छान मिते. त्यानंतर तिकडच्या मार्केटला गेलो तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी माझ्या आणि बाबांच्या आवडीची गोष्ट ते म्हणजे आम्ही निसर्गाच्या खूप जवळ ‘हुसेन रोज गार्डन’ या ठिकाणी गेलो होतो, तिकडचे नयनरम्य वातावरण बघून आम्ही फारच थक्क झालो. मग चंदीगड ची सगळ्यात सुप्रसिद्ध अशा ठिकाणी गेलो ते म्हणजे ‘सुखाना लेक’.
ही जागा चंदीगड मध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. तिकडचे वातावरण इतके सुंदर होते थोडासा गारवा हवेत जाणवत होता, समोर हिरवीगार गर्द झाडी आणि त्यात आम्ही त्या लेक मध्ये बोटिंग करायला गेलो. तो बोटिंग च अनुभव शब्दात सांगता येणार नाही कारण एका बाजूला होणारा सूर्यास्त आम्हाला दिसत होता! दुसरीकडे आकाशात नुकताच आलेला चंद्र ही दिसत होता! अशा वातावरणात आम्ही पाण्याच्या मध्यभागी लेकवर सुंदर बोटिंग करत होतो.
चंदीगड नंतर आम्ही कारणे त्याच दिवशी हिमाचलला रवाना झालो. चंदीगडचे ते सौंदर्य पाहून ट्रीप ची सुरुवात खूप छान झालेली होती व पुढची ट्रिप देखील खूप मस्त होणार हे आम्ही गृहीतच धरले, होते मग आलो आम्ही ‘धर्मशाला’ येथे.
धर्मशाला याला ‘विंटर कॅपिटल’ असे म्हणतात. पूर्ण हिमाचलच्या विंटर कॅपिटल मध्ये आम्ही होतो. धर्मशाला मध्ये खूप नवीन नवीन जागा सध्या टुरिस्ट साठी उघडल्या आहेत. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ‘कांगारा व्हॅली’ मध्ये बसलेले शहर आहे तिथे फिरत होतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही क्रिकेटच्या स्टेडियमला गेलो, जिथे 2023 च्या वर्ल्ड कप ची एक मॅच झाली होती.
तिथे गेल्यावर खूप सारे फोटोज काढलेत, पण या स्टेडियमची खासियत अशी की पूर्ण स्टेडियमच्या आजूबाजूला लाल रंगाच्या खुर्च्या आहेत आणि हे स्टेडियमच्या वर कौल घातलेले आहेत आणि समोरच्या दृश्य बघायचे झाले तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुले आढळली. त्यानंतर आम्ही धर्मशाला मधील सगळ्यात सुप्रसिद्ध चर्चला गेलो ते म्हणजे ‘जॉन चर्च’. हे चर्च सगळ्यात जुन्या चर्चमधील एक असे मानले जाते.
त्यानंतर आम्ही ‘दलाई लामा’ नावाच्या एका मंदिरात गेलो, ते तिकडचे सगळ्यात सुप्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर आम्ही ‘डलहौसी’ या ठिकाणी गेलो. डलहौसी हे देखील हिमाचल मधील खूप छान शहर आहे. आम्ही त्यानंतर पंचपुरा धबधब्याला गेलो, त्यानंतर चमेरा लेक ला गेलो. पंचकुरा धबधबा हा तिकडचा सगळ्यात मोठा धबधबा मानला जातो, त्यानंतर सेंट्रल चर्च जे 1863 ला बांधले गेले आहे ते डलहौजी मधील सगळ्यात जुने चर्च आहे.
मुळातच हिमाचल प्रदेश हे खूप सुंदर आहे! हिमाचल प्रदेशची खासियत म्हणजे हा प्रदेश सगळ्या झाडांनी गजबजलेला असा भूभाग आहे. डोंगर आणि दरी यांनी भरलेला असा हा भाग खूप आनंद देऊन जातो. यातील झाडे, दर्या, फुले व संस्कृती सगळ्यात जास्त लोकांना आकर्षित करतात. काही काही झाडे जी बाकी भारतीय प्रदेशांमध्ये दिसून येत नाही, ती फक्त आपल्याला हिमाचल मध्येच सापडतात! यात बांबू, ओक, आफ्रिकन मेरी गोल्ड आणि इंडियन ब्लिंग केअर या फुलांमुळे या प्रदेशाची शोभा वाढते. येथे मुख्यतः निलगिरीची झाडे आणि देवदार ची झाडे खूप प्रसिद्ध आहेत.