लगोरी खेळाची माहिती

“नमस्कार! मी छोटू”.

“मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.

मला वेगवेगळे मैदानी खेळ खेळायला आवडतात. कबड्डीमध्ये तर मी दहा लोकांना एकत्र हरवतो. पण लंगडी, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू या सगळ्या खेळांमध्ये मला एक खेळ खूप जास्त आवडतो. तो म्हणजे ‘लगोरी’”.

“आम्ही दादरच्या एका चाळीमध्ये राहतो. आमच्या चाळीची ही प्रथा आहे, दरवर्षी दिवाळी संपली की, आम्ही दोन गट करतो आणि त्या दोन गटांमध्ये लगोरी या खेळाची स्पर्धा लागलेली असते.

लगोरी हा तसा पारंपरिक भारतीय खेळ आहे. त्यामुळे आमच्या वडिलांनी आणि आजोबांनी ही प्रथा चाळीमध्ये चालू केली. दरवर्षी दिवाळी झाली की, आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो.

नक्की कोण विजयी होणार? कोण कोणावर मात करणार? हे भांडण सतत चालू राहते. आम्ही अगदी जीव तोडून आमचा गट जिंकवण्यासाठी म्हणून खेळतो.

लगोरी मध्ये तर मी सगळ्यांचा उस्ताद आहे. माझ्यावर राज्य आले की, मी सगळ्यांना हरवतो. अगदी फार आमच्या गल्लीतल्या पप्याला सुद्धा.

पप्या हा सुद्धा माझ्यासारखाच लगोरी खेळण्यात एक उस्ताद आहे. तो अशा एका ठिकाणी लपतो, तिकडे त्याला शोधणं खूपच कठीण असतं. पण तरीसुद्धा मी पप्प्याला देखील आरामात शोधून काढतो.

मी सगळ्यांना हरवतो, हे माहिती आहे म्हणूनच माझ्यावर राज्य आले की लोक घाबरतात.

बर हा लगोरी खेळ म्हणजे नेमकं काय बरे?

तर लगोरी हा पारंपारिक भारतीय खेळ आहे. आजकाल आधुनिकीकरणामुळे मुले मैदानी खेळ खेळतच नाहीत. पण तरी देखील आमच्याकडे हा खेळ आवर्जून खेळला जातो. कारण आजकाल मैदानी खेळ खेळण हे खूपच दुर्गम गोष्ट झाली आहे. खूप कमी विद्यार्थी आता शारीरिक खेळ खेळतात.

पण आम्ही मात्र ठरवून शाळेला सुट्टी लागली की, घरी गेल्यावर आवर्जून हा खेळ खेळतो. आम्ही सगळे लोक ‘गल्ली लगोरी’ खेळतो. बाकी लोक ‘गल्ली क्रिकेट’ खेळतात, पण आम्ही गल्ली लगोरी खेळतो.

या खेळात साधारण सात खेळाडू ते नऊ खेळाडूंचे दोन संघ असतात. या खेळाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते, ते म्हणजे मोकळे मैदान. किंवा बाग. जर तुमच्या इमारतीच्या खाली आजूबाजूला जास्त जागा असेल तर तुम्ही तेथे देखील हा खेळ खेळू शकता.

या खेळाला थोडेफार सामान देखील लागते. ते म्हणजे सात ते नऊ छोट्या आकाराच्या ‘चपट्या’ म्हणजेच ‘लगोऱ्या’ आणि एखादा रबरी किंवा टेनिस चेंडू लागतो.

पूर्वीच्या काळी घरे खूप वेगळी असायची. म्हणजे त्यांचे बांधकाम करण्याची पद्धत खूप वेगळी असायची. त्याच्या फरशा देखील रंगीत आणि ठिपकेदार असायच्या. त्यामुळे आम्ही त्या चिपक्या शोधून आणायचो. त्या फुटलेल्या फरशांना आम्ही चिपक्या असे नाव ठेवले होते.

पण आता प्रत्येकाने घर फरशांची ठेवली नाहीयेत. त्यामुळे आता चिपक्या मिळण फार कठीण असत. म्हणून आम्ही बाजारात जाऊन लगोऱ्या विकत घेऊन येतो. लगोऱ्या या लाकडाच्या असतात. तसेच रबराचा चेंडू आणावा लागतो.

सगळ्यात पहिले तर भांडण होतात की, कोण कोणाच्या संघामध्ये मध्ये जाणार. कारण एखादा खेळाडू जो खूप चांगला खेळतो, तो ज्या गटात जाईल तो गट जिंकण्याची संधी खूप जास्त असते.

संघ एकदा ठरले की, नाणेफेक केली जाते. जो कोणी नाणेफेक जिंकेल त्यावर राज्य येत. ज्याच्यावर राज्य असत त्याने एक ते पन्नास आकडे म्हणायचे असतात. तोपर्यंत सगळेजण लपतात. मग ज्याच्यावर राज्य असत, तो एकेकाला शोधायच काम सुरू करतो.

त्याच वेळेला दुसऱ्या गटाने जर त्या चेंडूने ने लगोरी फोडली तर तो संघ जिंकतो.

ज्या संघावर राज्य असते, त्याने जर ती लगोरी परत रचली, आणि सगळ्यांना शोधले तरच हा खेळ जिंकता येतो. हा खेळ खेळताना मुळातच खूप मजा येते म्हणूनच मला लगोरी हा खेळ खूप आवडतो”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *