‘मृदा’ म्हणजे माती. ज्या मातीला भारतामध्ये आईचा दर्जा दिला जातो. माती हा पर्यावरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पर्यावरण हे दगड, माती, झाडे, डोंगर, दर्या, पक्षी, पशु, माणूस, खनिज या सगळ्यांचे मिळून बनते.
हे एक निसर्गचक्र आहे आणि ही एक पर्यावरणातली साखळी आहे. या पर्यावरणातल्या साखळीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘माती’.
या मातीचे एवढे महत्त्व असताना काही वर्षांपासून मानवनिर्मित प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मातीचा दर्जा त्या प्रदूषणामुळे खालावत चालला आहे.
मातीत सगळे पोषक घटक असतात. जे झाडांना जीवनदान देण्याचे काम करतात. मातीच्या पोषणावरच झाडाचे जगणे अवलंबून असते. झाडे हे आपल्याला अन्न पुरवण्याचा काम करतात. म्हणजेच काय तर माती हा सगळ्यात प्रमुख घटक आहे. ज्यामुळे आपले जीवन चालू होते. असे म्हणतात की, आपला जन्म मातीतून होतो आणि आपला मृत्यू देखील मातीतच होतो. मग एवढ्या महत्त्वाच्या पर्यावरणाच्या घटकाला आपण काहीच मान का देत नाही. आपण त्याचे सतत प्रदूषण करतो, हे कितपत योग्य आहे?
मातीचे काय – काय फायदे आहेत?
शेतकरी हा अन्न पिकवण्यासाठी खतांचा म्हणजेच मातीचा वापर करतो. मुळात सगळ्या झाडांना पोषण हे मातीतूनच मिळते. माती नसेल, तर या पृथ्वीतलावर जगणे खूप कठीण होईल. म्हणूनच प्रत्येक शेतकरी जमिनीला आणि मातीला आईचा दर्जा देतो.
मातीमुळे पाण्याची पातळी वाढत नाही. म्हणजेच काय तर मातीमुळे पाणी हे जमिनीच्या आत शोषले जाते आणि त्याचा वापर चांगल्या वाढीसाठी होतो. म्हणजेच झाडांच्या वाढीला पाण्याची खूप गरज असते, तेव्हा ते पाणी त्यांना जमिनीतून मिळते. पण जर मातीमध्ये सिमेंट किंवा कोणत्या वेगळ्या गोष्टी मिसळल्या असतील, ती माती जर शुद्ध नसेल, तर त्या भेसळयुक्त मातीत पाणी जिरण्याचे प्रमाण हे कमी होते. जर पाणी जिरले गेले नाही, तर पृथ्वीतलावर पाण्याची पातळी वाढेल.
मातीचे खूप फायदे मानवाला देखील होतात. म्हणूनच मातीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. परंतु गेल्या काही वर्षात मातीचे प्रदूषण खूप वाढले आहे.
मृदा प्रदूषण म्हणजे काय?
मृदा प्रदूषण म्हणजे मातीमध्ये झालेली भेसळ आणि त्या भेसळीमुळे झालेला मातीचा ऱ्हास होय.
मृदा प्रदूषणाचा परिणाम हा मातीच्या सुपीकतेवर होतो. मातीत झालेल्या प्रदूषणामुळे तीची सुपीकता खूप कमी होते आणि माती हळूहळू नापीक जमीन व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेला ती जमीन नापीक होते, त्या वेळेला त्याचा काहीच फायदा पर्यावरणाला होत नाही.
मातीच्या नापिकपणामुळे अन्नधान्यांवर खूप फरक पडतो. अन्नधान्य हे जास्त प्रमाणात सुपीक जमिनीत उगवले जाते. जर या मातीचा दर्जा घालवला, तर हळूहळू त्याचा परिणाम हा पिकांवर देखील जाणवायला लागतो. मातीच्या ऱ्हासासाठी अन्नधान्य देखील कारणीभूत ठरते. म्हणजेच काय तर शेतकरी सुपीक जमीन आहे, म्हणून त्यावर जास्त प्रमाणावर अन्नधान्य उगवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय खतांचा देखील वापर केला जातो. त्या सेंद्रिय खतांमध्ये मिसळलेल्या रसायनांमुळे मातीवर घातक परिणाम होतात. त्यामुळे मातीमध्ये नको असलेली द्रव्य मिसळल्यामुळे देखील मातीचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. याने झाडे हळूहळू वाढायला सुरुवात होते. जमीन नापीक होते. जमिनीखाली मिळणारी द्रव्य म्हणजेच कोळसा, तेल किंवा कोणत्याही प्रकारचा धातू याच्यासाठी जमीन खोदावी लागते. त्यामुळे देखील मातीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो.
भारताच्या बऱ्याचशा भागात आढळणाऱ्या कोळशामुळे जमिनीखाली खोदकाम केले जाते. मातीचा थर जणू नष्ट होऊन जातो. कारण ज्या वेळेला ते जमीन परत बुजवण्याचचे काम करतात, तेव्हा त्या मातीचा तसाच थर राहत नाही, जसा तो नैसर्गिक रित्या अस्तित्वात असतो.
माती प्रदूषणाची कारणे :
माती प्रदूषित व्हायला अनेक कारणे आहेत. जसे की कारखान्यांमुळे येणारे पाणी बऱ्याचदा नदीत आणि मातीत मिसळले जाते. ती द्रव्ये अत्यंत घातक अशी असतात. त्यामुळे ती मातीत जर मिसळली, तर मातीची सुपीकता जवळजवळ नष्ट होते.
तसेच प्लास्टिक किंवा इतर कचरा जो पर्यावरणात कुजत नाही किंवा ज्याचा परत वापर करता येत नाही. अशा कचऱ्यामुळे देखील मातीचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा अतिवापर केला, तर जमिनीवर आघात होऊन सुपीक जमिनीची नापीक जमीन व्हायला वेळ लागत नाही.
तसेच सगळ्यात मोठे कारण म्हणजे सध्याच्या आधुनिकीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी जंगलतोड हे मातीच्या ऱ्हासाचे सगळ्यात मोठे कारण आहे. कारण ज्या वेळेला झाडे तोडली जातात आणि माती साफ केली जाते, त्यावेळेला तिकडची माती नष्ट होऊन तिथे सिमेंट – काँक्रीटची जंगले बनतात. ज्याचा पर्यावरणाला शून्य उपयोग आहे.
शेतात वापरले जाणारे किटकनाशके देखील मातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतात. शेतकरी जर गरजेपेक्षा जास्त कीटकनाशके वापरत असेल, तर त्यामुळे देखील मातीचे प्रदूषण होते.
मातीचे प्रदूषण हे आपल्या दैनंदिन जीवनाला अत्यंत घातक आहे. मातीचे प्रदूषण खूप जास्त प्रमाणात होत असल्याकारणाने माणसांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये त्याची जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आपण मातीचा ऱ्हास होण्यापासून थांबवू शकतो.