तंत्रज्ञानाची किमया

सध्याच्या आधुनिकीकरणामुळे तंत्रज्ञानात बऱ्यापैकी बदल झालेला आहे. जग खूप जास्त जवळ आलेल आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक गोष्टीचा जो वापर करतो, ती तंत्रज्ञानाचीच किमया आहेत, उदाहरणार्थ इस्त्री, मिक्सर, कणिक मळायला वापरणारा फ्रुट प्रोसेसर या सगळ्या उपकरणांमुळे आपले जीवन खूप जास्त सुखकर झाले आहे. ही सगळी उपकरणे आपण कशामुळे वापरू शकतो? तर ते म्हणजे ‘तंत्रज्ञान’. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच आज आपण जे काही जीवन जगतो आहे त्यात आपल्याला बदल दिसत आहे. कारण जेव्हा पृथ्वी तलावर सगळ्या जीवांचे, प्राण्यांचे उगम होत होते त्यावेळेला प्राणी जसे जन्माला आले किंवा प्राणी वर्षांनुवर्ष ज्या अवस्थेत आहेत, तशाच अवस्थेत आजही आहे. परंतु मानवाने आज खूप सारी प्रगती केलेली आहे.आपण अगदी अश्मयुगा पासून ते आजचे आपले प्रगती युग हे खूप वेगळे आहे.

मानव रोज काहीना काहीतरी प्रगती करत असतो. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे, त्यामुळे आपण कोणत्याही देशातील तंत्रज्ञान आपल्या देशात वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपले जीवन खूप सुखकर झाले आहे. खूप कमी वेळेत आपली जास्त कामे व्हायला सुरुवात झाली आहे आणि तंत्रज्ञानामुळे नवीन आर्थिक संधी देखील मिळाल्या आहेत.

तंत्रज्ञानामुळे आपली कला जगापर्यंत जायला लागली आहे, दुसरीकडे लोक एकमेकांच्या संस्कृती शिकायला लागले आहेत, ज्या पूर्वी बाकीच्या देशांसाठी अगदीच अनभिज्ञ होत्या. अशा सगळ्या संस्कृती आपण शिकायला लागले आहोत. एवढेच नाही तर बाकीच्या संस्कृतीतल्या बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करायला देखील सुरुवात केली आहे.

लोक भारतातल्या संस्कृतीचा वापर त्यांच्या देशातील दैनंदिन जीवनात करत आहे. भारतीय संस्कृतीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, योगा किंवा साधना यांसारख्या पद्धतीने ते आत्मसात करत आहेत. भारतीय लोक सुद्धा बाकीच्या देशातील चांगल्या प्रथा आपल्या आयुष्यात वापरत आहेत.

तंत्रज्ञानाचे सगळ्यात मोठे यश म्हणजे ‘संगणक’. संगणकाचा शोध लागल्यानंतर जणू माणसाने सगळ्यात मोठी प्रगती केली, संगणकाचा वापर करून तुम्ही कोणत्याही गोष्टी करू शकता, संगणकाद्वारे आपण माहितीचा संग्रह करू शकतो, या संग्रहामुळे आपण आयुष्यभरची माहिती एका उपकरणामध्ये ठेवू शकतो. पुस्तके खराब होण्याची शक्यता असते, तसेच पुस्तके हा एका जागेचा लिमिटेड सोर्स असतो, परंतु संगणकावर आपण ती माहिती स्टोअर करून नंतर इंटरनेटच्या सहाय्याने ती जगभरात पोहोचवू शकतो. संगणकामुळे माणसाची कामे खूप सहज आणि सोपी झाली.

तसेच तंत्रज्ञानामुळे अजून एक मोठा बदल घडला तो म्हणजे ‘मोबाईल’! मोबाईल मुळे आजकाल आपल्याला सगळी कामे ‘वन टॅब’ मोडवर करता येतात. अगदी भाजी आणण्यापासून ते कार खरेदी करेपर्यंतची सगळी कामे आपण मोबाईलवर करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलचा जर योग्य वापर केला तर आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध होते, आपण नवीन नवीन गोष्टी कोणत्याही ठिकाणी बसून कमी खर्चात शिकू शकतो.

तसेच तंत्रज्ञानामुळे अजून एक मोठा बदल आपल्या दैनंदिन आयुष्यात घडला तो म्हणजे ‘वाहतूक आणि दळणवळणाची सुविधा’. पूर्वी भारतात बैलगाडी, घोडागाडी यांवरून लोक जायचे. राजे महाराजांच्या काळात घोडागाडीवर सवार होऊन सगळे लोक जायचे. परंतु तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपण आता दळणवळणाच्या खूप सुविधा उपभोगू शकतो. आता आपण रेल्वे मार्गाने सामान एकीकडून दुसरीकडे पोहोचू शकतो, बसने कमी अंतरावरती पण जलद पोहोचण्यासाठी उपयोग होतो. जहाजाने आपण दुसऱ्या देशात आरामात पोहोचू शकतो आणि जहाजाने मोठे मोठे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. विमानाद्वारे देखील आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामात जाऊ शकतो.

पूर्वी शेतीला सुद्धा खूप कष्ट लागायचे, परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतीची अनेक उपकरणे उपयोगात आणून शेतकरी खूप लवकर शेती करतात. पूर्वी शेतकऱ्यांना कापणी झाल्यावर ती धान्य वेगळ करायला म्हणून काहीच सोय नव्हती, त्यामुळे त्यांना खूप कष्ट करायला लागायचे. सगळ्याच शेतीच्या टप्प्यात त्यांना खूप कष्ट असायचे. आता ट्रॅक्टर, कापणीचे मशीन, धान्य वेगळे करायचे मशीन या सगळ्या सुविधांमुळे शेतीची काम बऱ्यापैकी सोपी झालेली आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी लढाई झाली आहे. पूर्वी लोकांचे अल्पशा आजाराने निधन व्हायचे, परंतु आता औषधे आणि ऑपरेशन करणे सोपे झाले आहे, त्यामुळे लोकांचे जगण्याचे वय वर्ष सुद्धा वाढलेले आहे. लहान मुलांसाठी सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग होत आहे. एकूणच काय, तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य खरच खूप सुखकर बनले आहे आणि तंत्रज्ञानाची किमया खरच खूप मोठी आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *