पाण्याचे प्रदुषण

मुळात प्रदुषण म्हणजे काय?

प्रदूषण म्हणजे ‘वातावरणात, हवेत, पाण्यात मिसळलेले दूषित पदार्थ होय’! हे प्रदूषण माणसामुळे म्हणजेच मानवनिर्मित असते, तसेच प्राण्यांमुळे आणि पक्षांमुळे देखील होते. निसर्गामुळे होणारे प्रदूषण खूप कमी वेळा होते. परंतु निसर्गामुळे देखील काही प्रमाणात प्रदूषण होते.

प्रदूषणांमध्ये मुख्यत्वे तीन प्रकार असतात. हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण आणि मातीचे प्रदूषण. जे निसर्गासंबंधी प्रदूषण आहेत, बाकी प्रदूषण सुद्धा पर्यावरणात असतात उदाहरणार्थ ध्वनी प्रदूषण.

पाण्याचे प्रदूषण कशामुळे निर्माण होते?

पाण्याचे प्रदूषण होण्यासाठी अनेक कारणे असतात. कारखान्यांमधून येणारे सांडपाणी हे त्यातील मुख्य कारण आहे. मानवनिर्मित कारखान्यांमध्ये दर दिवशी वेगवेगळे घटक तयार होतात, ते घटक तयार झाल्यावर तो उरलेला सगळा कचरा आणि सांडपाणी हे गटारांमध्ये किंवा त्यांच्या जवळच्या नदी प्रवाहात सोडले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे प्रदूषण होते.

हे सांडपाणी यात अनेक रासायनिक गोष्टी असतात. त्यामुळे पाण्याची पातळी खराब होते व पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. तसेच पाणी प्रदूषणाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाण्यात टाकला जाणारा कचरा होय. माणसांकडून अनेक वेळेला कचऱ्याची विल्हेवाट नीट न लावल्यामुळे तो सगळा कचरा आपण पाण्यात टाकतो. त्यामुळे कचऱ्याचे नीट विघटन होत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होते.

तसेच नुसत्या कारखान्यांचे नाही तर बाकीचे दूषित पाणी देखील नद्यांमध्ये सोडले जाते. बऱ्याचदा गटार फुटणे, पाणी नदीमध्ये मिश्रित होणे. अशा प्रकारच्या घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. त्यामुळे कचऱ्याचे नीट विघटन करून, शक्यतो ते पाण्यात न सोडता जमिनीवर व्यवस्थित विल्हेवाट लावू शकतो. आणि असे केल्याने, पाण्याचे प्रदूषण होण्यापासून आपण थांबवू शकतो.

थोड्याफार प्रमाणात प्राण्यांमुळे आणि पक्षांमुळे सुद्धा पाण्याचे प्रदूषण होताना दिसते, पण ते प्रमाण माणसांच्या प्रदूषित करणाऱ्या टक्केवारी पेक्षा खूपच कमी आहे.

अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे, बऱ्याचदा गावाकडच्या महिला नदीमध्ये कपडे धुताना आपण बघतो, त्यामुळे अनेक रासायनिक द्रव्य नदीच्या पाण्यात मिसळता. बऱ्याचदा गुरांना धुणे, त्यांची साफसफाई करणे, त्यामुळे देखील पाण्याचे प्रदूषण होताना दिसते.

तसेच आजकाल शेतीच्या कामांमुळे देखील पाण्याचे प्रदूषण होताना आपण बघत आहोत शेतीच्या बऱ्याचशा कामांमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसतो आणि त्यामुळे ते पाणी नदीला जाऊन मिसळते आणि पाण्याचे प्रदूषण होते.

तसेच अजून एक महत्त्वाचे कारण, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण तर मोठ्या प्रमाणावर होते. सहज परंतु त्या प्रदूषणामुळे पाण्यातील जीवांची मोठ्या प्रमाणावर हानी होते, कधीकधी तर ते जीव मरतात, ते म्हणजे तेल गळती! कधी कधी समुद्रात मोठ्या प्रमाणावर तेल गळती होऊन तेलाची एक थर तयार होतो, ज्यामुळे पाण्याचे दूषिकरण होते. तसेच मोठ्या प्रमाणावर माश्यांच्या जाती नष्ट होतात , कारण त्याचा सगळ्यात पहिला प्रभाव हा माशांवर, लहान मासे आणि मोठ्या माशांवर पडतो. मानवनिर्मित प्रदूषण हे खूप मोठे आहे.

जलप्रदूषणामुळे काय काय गोष्टी घडतात?

मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले, तर असणारे पाणी दूषित होईल. दूषित पाणी आपण पिऊ शकणार नाही आणि पाण्याचा जर योग्य साठा केला नाही, कचऱ्याचा नीट निचरा केला नाही तर येणाऱ्या काळात पाणी संपुष्टात येईल. तसेच जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.

माणसाला आणि प्राण्यांना पाणी प्यायला मिळणार नाही आणि पक्षांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.

नुसतेच जलप्रदूषण होऊन थांबणार नाही, तर त्यामुळे आपले निसर्गचक्र देखील बिघडेल आपल्याला स्वच्छ पाणी मिळायचे बंद होईल. पर्यावरणाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.

आपण हे थांबवण्यासाठी जर थोडे कष्ट घेतले, तर जल प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकतो. ते म्हणजे जर आपण कचऱ्याचे नीट विघटन केले, त्याचा निचरा व्यवस्थित झाला तर पाण्याचे प्रदूषण होणार नाही. सरकारने जर नवीन नियम आणि कायदे आणले तर लोक पाण्यात कचरा टाकणार नाहीत. तो कचरा टाकल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर जर शिक्षा मिळाली, तर त्याच्यावर आळा बसेल आणि माणसे ते करण्यापासून थांबतील.

तसेच जर आपण पर्यावरण अनुकूल गोष्टींचा वापर करायला लागलो तर त्याने देखील जलप्रदूषण थांबवण्यासाठी मोठी मदत होईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *