२६ जानेवारी भाषण मराठी

२६ जानेवारी भाषण

‘’नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज 26 जानेवारी निमित्त भाषण द्यायला मी उभी आहे!

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे अत्यंत प्रेम आहे’. ही संविधानाची प्रार्थना आपण अगदी लहानपणापासून करतोय. पण काय हो आपण या संविधानाच्या प्रार्थनेचा खरा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला का? सारे भारतीय माझे बांधव आहेत असे म्हणतो नेमके आपल्याच देशाला हे असे का उद्देशून म्हणतो?

त्याला कारण आहे, ‘विविधता मे एकता!’ हा नारा तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असणार, तो का बर वापरतो आपण? त्याचे कारण असे की भारतात इतके विविध जाती, धर्माचे, भाषेचे लोक राहतात. तरीसुद्धा आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि मग महाराष्ट्रातील नागरिक आहोत, असे संबोधतो. या आपल्या एकजुटीच्या भावनेला किंवा भारतीय असण्याच्या कल्पनेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. ही भावना कशातून येते बरं? ती येते संविधानातून!

भारतीय देशाचा सगळ्यात महत्त्वाचा कणा म्हणजे ‘भारताचे संविधान!’ म्हणूनच 26 जानेवारी हा भारताचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खास दिवस आहे. या दिवशी भारताच्या गणराज्याची स्थापना झाली होती आणि संविधानामुळे लोकांना समान अधिकाराच्या संधी, भारतीय नागरिकत्वावर मिळणे सुरू झाले ते याच दिवशी.

मग काय बरे झाले नेमके 26 जानेवारीला?

आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा एक देशाचे संघटन कसे असावे? किंवा राज्यव्यवस्था कशी असावी? याचा नियमांची सुसूत्रता ही 26 जानेवारीला बनवली गेली. या सर्व कामांसाठीच एक घटना समिती स्थापन करण्यात आली. या घटना समितीवर सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य हे असे होते की, भारतातील प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, भारतातील विविध प्रकारच्या स्तरावरील लोकांना एकत्र आणणे, हे यामागचे मूळ उद्दिष्ट होते.

भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ होते, म्हणूनच त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हटले जाते. या समितीत एकूण ७ सदस्य होते. या ७ सदस्यांनी मसुदा बनवला. राज्यघटना निर्मितीसाठी तब्बल २ वर्ष ११ महिने १८ दिवस काम केल्यावर एक मजबूत संविधान बनले.

याच दिवशी आपण ब्रिटिश राजवटी पासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे अशी प्रतिज्ञा ही घेतली! म्हणूनच हा दिवस भारतासाठी व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याकारणाने हा तीन राष्ट्रीय सणांपैकी एक मानला जातो! हा दिवस देशभरात खूप उत्साहात साजरा केला जातो.

दरवर्षी आपण या दिवसाची वाट बघत असतो. देशभरात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम देखील होतात. अनेक शाळांमध्ये शिक्षक देशभक्तीवरील गीतांवर नृत्य, गाणे तसेच नाट्य या स्वरूपात कार्यक्रम सादर केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जे सैनिक लढले आणि अजरामर झाले, त्यांना देखील श्रद्धांजली वाहिली जाते.

राष्ट्रीय स्तरावरती सगळ्यात महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडतात ते म्हणजे पंतप्रधान व राष्ट्रपती इंडिया गेट व कर्तव्य पथावर जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. तसेच भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात, तिरंगी झेंडा फडकवला जातो, अनेक राष्ट्रीय गीते वाजवले जातात, त्यानंतर घोडस्वार आणि पायदळ सैनिकांच्या तुकड्या येतात. अशा प्रकारे आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे अत्यंत उत्साहात स्वागत करतो. काही वर्षांपासून तर आम्ही या दिवशी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या मोहिमेत देखील सहभागी होतो. खूप सारी झाडे आपण फक्त लावून विसरून जातो, मात्र आम्ही ती लावलेली झाडे कशी जगतील यांचा उपक्रम करतो. म्हणजे त्यास खत-पाणी घालायचे, किंवा त्याचे पोषण व्हावे म्हणून वेगळे खत करायचे, नाहीतर मुंबई महानगरात असणारी चौपाटी साफ करायची, असे उपक्रम राबवतो. त्यामुळे समाजाला याचा खूप फायदा होतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *