माझा आवडता शास्रज्ञ

माझा आवडता शास्रज्ञ, ही भारतातली एक खूप लाडकी व्यक्ती आहे. सगळ्या भारतीयांसाठी ती शान आहे. ते म्हणजे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम.

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वर येथे झाला.

डॉ. कलाम हे एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या क्षेपनास्र आणि अणुशक्ती या क्षेत्रांमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. कलाम यांनी त्यांचे ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ या विषयांमधून आपली अभियांत्रिकी पदवी मद्रास मधून घेतली. ज्याला मराठी मध्ये ‘अंतरिक्ष अभियांत्रिकी’ असे देखील म्हणतात.

त्यानंतर कलाम यांनी संशोधन या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. मग ते इस्रोचे सदस्य झाले. कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ ही पदवी मिळाली. इस्रो मध्ये काम करत असताना ते ‘प्रोजेक्ट लीडर’ बनले. त्यांनी भारतामधील पहिले ‘सॅटॅलाइट लॉन्च वेहिकल’ वर काम देखील केले.

तसेच अजून एक खास गोष्ट म्हणजे कलाम हे इस्त्रो मधील पहिले सदस्य होते. ज्यांनी ‘रॉकेट प्रोजेक्ट’ साठी काम केले. त्यानंतर त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात झाली. कलामांनी विज्ञान क्षेत्रामध्ये जवळजवळ चार दशके गाजवली. भारताचे स्थान जगात निर्माण केले. त्यांना भारतात महत्वाचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार पद्मभूषण मिळाला होता.

२००२ मध्ये कलामांनी राजकारणात देखील प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी मधून राष्ट्रपतीपदावर ते विराजमान झाले. छोट्या गावापासून सुरू केलेला प्रवास कलामांनी राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती बसूनच संपवला.

अब्दुल कलाम यांनी कधीच आपल्या संपत्तीचा किंवा आपल्या पदाचा दुरुपयोग केला नाही. त्यांनी कधीच पैशाचा माज देखील दाखवला नाही. त्यांच्याकडून आपण सगळ्यात महत्त्वाची शिकवण घेऊ शकतो, ती म्हणजे खूप मोठे होऊनही, आपली मुळे जमिनीशी निगडीत राहिली पाहिजेत. यालाच इंग्रजीमध्ये ‘डाउन टू अर्थ’ असेही म्हणतात. हीच खरी मोठ्या यशस्वी माणसाची लक्षणे आहेत.

राष्ट्रपती पद सोडल्यावर सुद्धा ते सतत काम करत राहिले. त्यांनी कधीच आयुष्यात आराम केला नाही. ते तरुणांसाठी काम करत असताना त्यांना एक लक्षात आले की, देशाचे युवा लोकच देश बदलण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे ते लहान मुलांना कायम ‘देशासाठी काम करण्यासाठी तत्पर व्हा!’ असा संदेश द्यायचे.

अध्यक्ष पद सोडल्यावर कलाम हे ‘भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संस्थेचे कुलपती झाले. याशिवाय वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन कलाम यांनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यांना वैज्ञानिक होण्यासाठी सतत जागृत केले.

२७ जुलै २०१५ रोजी कलाम हे शिलॉंग ला गेले होते. तिथे कार्यक्रमादरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि मुलांशी बोलता बोलताच ते जमिनीवर कोसळले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. म्हणून त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. ३० जुलै २०१५ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

भारतामध्ये अब्दुल कलाम गेल्यावर सात दिवसाचा दुखवटा पाळला गेला. आजही अब्दुल कलाम जाऊन एवढे वर्ष झाले, तरीसुद्धा त्यांचे महत्त्व भारतासाठी कधीच कमी झाले नाही.

अब्दुल कलाम यांनी जवळजवळ २५ हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या पुस्तकांच्या प्रती खूप प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा असतो. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे ‘विंग्स ऑफ फायर’(अग्निपंख). त्यानंतर नंबर लागतो तो ‘इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी’ या पुस्तकाचा. सध्या युवा पिढीमध्ये त्यांचे सगळ्यात जास्त गाजणार पुस्तक म्हणजे ‘मिशन ऑफ इंडिया’. ज्यांना आयुष्यात खूप पुढे जायचे आहे, ते कसे जायचे, हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी कलामांचे ‘फेल्युअर टू सक्सेस’ नावाचे पुस्तक नक्की घ्यावे.

कलाम यांनी जगण्यासाठी खूप महत्त्वाचे संदेश देखील दिले. या संदेशांना जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणले तर आपल्याला एक मोठा माणूस होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीत. त्यांनी दिलेले विचार आजही जगात वापरले जातात त्यांचे काही महत्त्वाचे विचार पुढीलप्रमाणे-

१. स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वप्न पाहणे गरजेचे असते.

२. आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत जे असते, ते खरं स्वप्न असतं.

३. देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी हा शेवटच्याच बाकावर सापडतो.

या अशा काही संदेशांमुळे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात खूप जास्त प्रेरणा मिळते. एकूणच कलाम यांच्या आयुष्याच्या प्रवासाने, त्यांच्या प्रत्येक विचाराने सतत आपल्याला काही ना, काहीतरी शिकायला मिळतं. त्यांच्याकडून आपण रोज नवीन गोष्ट शिकतो. म्हणूनच डॉ. अब्दुल कलाम हे माझे नेहमीच आवडते शास्रज्ञ राहतील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *