मी सैनिक बोलतोय निबंध

Featured Image- me sainik boltoy atmakatha in marathi

मी सैनिक बोलतोय निबंध

“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत” असे म्हणत मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली. मी एक सैनिक बोलतोय! भारत या नावातच आमचं सर्वस्व समावलेलं असतं. सैनिक हा एक असा पेशा आहे तिथे दिवस-रात्र एकच असते. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आम्हाला देशाच्या सेवेसाठी घालवावेच लागतात. सैनिक होणं ही अजिबात सोपी गोष्ट नसते. सैनिक होण्यासाठी तुमच्या अंगात प्रचंड ताकद असावी लागते. त्याचप्रमाणे देशांवर अतोनात प्रेम असावे लागते आणि मनात प्रचंड जिद्द लागते की आपण जे करतोय ते बरोबर आहे.

 कोणीही सामान्य व्यक्ती सैनिक या पदासाठी निवडून येत नाही. जे शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात त्याचप्रमाणे ज्यांनी सैनिक होण्यासाठी जी एक परीक्षा द्यावी लागते, त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले असतात आणि ज्यांना आपल्या देशाची सेवा करण्यास सर्वस्व अर्पण करायचे आहे अशाच

व्यक्तीला एक सैनिक बनण्याचा अधिकार असतो!

मुळात सैनिक म्हणजे कोण? ‘जो दिवस-रात्र तुमच्या सेवेला असतो आणि जो कधीही न झोपता देशाच्या रक्षणासाठी कायम तत्पर असतो अशा व्यक्तीला सैनिक असे म्हणतात.’ सैनिकाचे संपूर्ण आयुष्य हे देशाची सेवा करण्यातच जाते. आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सैनिकाची जी परीक्षा असते ती उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर आमची फिटनेस ट्रेनिंग होते आणि भारतात मध्ये होणारी आर्मीची फिटनेस ट्रेनिंग ही सगळ्यात जास्त कठीण ट्रेनिंग पैकी एक आहे. ही आर्मीची ट्रेनिंग आम्ही पास झालो की आमच्या विविध वैद्यकीय तपासण्या देखील होतात त्यामध्ये गळ्याची, डोळ्यांची, सर्जिकल. हातापायांची, उंची, वजन व इतर या सगळ्याची परीक्षा होते त्यानंतर आम्हाला ट्रेनिंग दिले जाते. त्या ट्रेनिंग मध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. खूप अंतरापर्यंत धावणे, सुरुवातीला धावून तुमच्यामध्ये किती क्षमता आहे हे बघितले जाते. त्यानंतर तुम्हाला बंदूक कशी चालवावी हे देखील शिकवले जाते.

संबंधित पोस्ट -  माझा आवडता विषय मराठी निबंध

फक्त शक्तीचा वापर करून नेहमी युद्ध जिंकता येत नाही याचे देखील ट्रेनिंग दिले जाते! त्यामुळे शत्रूवर मात करण्यासाठी युक्तीचा देखील वापर करावा लागतो हे देखील ट्रेनिंग मध्ये शिकवले जाते. जेव्हापासून तुम्ही सैनिकाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता, तेव्हापासून ते रिटायर्ड होईपर्यंत तुम्हाला कुटुंबापासून लांब राहण्याची तयारी ठेवावीच लागते. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न मी तर लहानपणापासून पाहिले. त्यामुळे घरापासून लांबच राहावं लागणार याची कल्पना होती. मी वर्षातून फक्त दोनच वेळा घरी जातो. बऱ्याचदा आतंकवादी हल्ल्यांना देखील आम्हाला सामोरे जावे लागले त्यातून वाचून मी आज तुमच्याशी बोलतोय!

त्याचप्रमाणे भारत स्वतःहून कधीच कोणत्याही युद्धाला चेतावणी देत नाही! परंतु जे देश स्वतःहून भारताशी युद्ध चालू करतात त्या युद्धांना आम्हाला सामोरे जावेच लागते. त्याचप्रमाणे नागरिकांचे धोकादायक ठिकाणी असलेल्या प्रदेशांमध्ये तसेच सीमेवर आर्मीच्या लोकांना राहावेच लागते. मी तर कारगिल युद्धाला देखील सामोरे गेलेला असा आर्मी ऑफिसर आहे आणि ते सोडून सुद्धा अनेक छोट्या मोठ्या युद्धातून मी वाचलो! हा काही वेळा खूप लागले जखमाही झाल्या परंतु कारगिलमध्ये मी माझा एक हात गमावला. माझा एक हात निकामी झालेला असल्याकारणाने मला बाकीच्या गोष्टी करायला बऱ्याचशा लिमिटेशन्स येऊ लागल्या.

माझ्या मुलाने देखील माझ्याच पावलावर पाऊल ठेवून सैनिक होण्याचे स्वप्न बघितले आणि माझा मुलगा बरीच वर्ष काश्मीर बॉर्डरला होता. एके दिवशी गावकऱ्यांना वाचवायला गेला आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी गोळीबार करायला सुरुवात केली त्यामुळे त्याला वीरगती प्राप्त झाली. माझा मुलगा ज्या दिवशी शहीद झाला त्या दिवशी मी एक बाप म्हणून जिंकलो होतो! कारण माझा मुलगा देशासाठी काम करता करता शहीद झाला होता!

माझ्या करिअर मधला सुरुवातीचा काळ फारच वेगळा होता त्यावेळेला मी नुकताच सैनिक म्हणून जॉईन झालेला होतो. आम्ही जंगलातून काट्याकुट्यातून सगळ्यातून वाट काढून प्रशिक्षण घेऊन पुढे आलेलो असे सैनिक होतो. सुरुवातीला मी बॉम्ब या गोष्टीला खूप घाबरायचो. पण मी माझ्या त्या भीती वर मात केली आणि युद्धात जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासमोरच बॉम्ब फुटला तेव्हा ती भीती मुळापासून नष्ट झाली. मग मात्र मी कधीच थांबलो नाही, मी लढत राहिलो देशासाठी, प्रत्येक दिवस रक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

संबंधित पोस्ट -  माझे आवडते लेखक- साने गुरुजी

मला फक्त एक गोष्टीचे खूप आनंद वाटतो ते म्हणजे भारतीय सैनिक खूप जीव तोडून बॉर्डरवर मेहनत घेत असतात. त्यांना मिळणारे जेवण हे अत्यंत चांगले प्रतीच्या धान्यातून बनवलेले असते त्याचप्रमाणे इकडचे राजकारणी, नॉर्मल लोकं सुद्धा किती मान देतात आम्हाला! बाकीच्या देशा मधल्या सैनिकांना खूप वेगळ्या प्रकारे मान दिला जातो आम्ही कधीच या गोष्टीची परवा करत नाही. आम्ही निःस्वार्थ भावनेने फक्त देशासाठी लढत असतो. आमची तहानभूक विसरून, आम्ही फक्त देशाचे रक्षण करायचे एवढेच ध्येय उराशी बाळगून जगत असतो. काही काही ठिकाणी आम्हाला खरंच खूप मान मिळतो ते म्हणजे आम्ही घरी जाऊन कोणताही सण साजरा करू शकत नाही म्हणून आम्ही जिथे कुठे ड्युटीला असतो तिकडच्या स्त्रिया आवर्जून आम्हाला भेटायला येतात. आमच्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून घेऊन येतात. त्या स्त्रिया मला भाऊ मानून राख्या बांधतात. मी जेव्हा सीमेवर गेलो होतो, तेव्हा तिकडच्या गावातल्या बायकांनी दिवाळीचा फराळ देखील करून आणला होता. अशाप्रकारे मला अभिमानच आहे की मी एक भारतीय सैनिक आहे!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *