माझे आवडते फूल निबंध मराठी

Featured image: my favourite flower essay in marathi

माझे आवडते फूल निबंध

गुलाब या फुलाला सर्व ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. गुलाब हे दिसायला खूप सुंदर आणि सुगंध खूप छान असते. त्यामुळे सर्व फुलांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुलाब उठून दिसतो. गुलाबाचे अनेक फायदे आहेत. गुलाब हे अनेक कारणांसाठी वापरले जाते जसे सुगंध, सुशोभीकरण व औषधी फायदे. अनेक माणसांना गुलाब हे फुल अगदी मनापासून आवडते.

माझे देखील तेच आहे, मला सुद्धा गुलाब हे फुल लहानपणापासून फार आवडते!

माझ्या आत्याला गुलाबाचा फुल हातात घेतले की शिंकायला सुरुवात होते. लहानपणी मला या गोष्टीची खूप मजा वाटायची, परंतु आता आम्ही तिला गुलाबापासून लांबच ठेवतो, कारण तिला गुलाबाची मेजर ऍलर्जी आहे.

मुळात जगात खूप कमी माणसे आहेत, ज्यांना गुलाबाचे फुल आवडत नाही! प्रत्येक माणसाच्या आवडी या वेगळ्या असू शकतात. कोणाला नीळा गुलाब आवडत असेल, तर कोणाला पांढरा, कोणाला नारंगी गुलाब आवडत असेल तर कोणाला पिवळा! पण असे खूप कमी जण त्यांना गुलाब अजिबातच आवडत नाही.

माणूस गुलाब हे फुल अनेक कारणांसाठी वापरतो. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे तसंच ते शांततेचा प्रतीक देखील आहे. त्यामुळे अगदी सणासुदींपासून ते एखादा मोठा वाद झाल्यावर तो सोडवण्यासाठी म्हणून गुलाबाचे फुल नेले जाते. जर एखाद्याला त्याच्या प्रेमाची कबुली द्यायची आहे, तर तो सगळ्यात आधी गुलाबाच्या फुलांचा विचार करतो आणि आपल्या प्रेयसीला गुलाबाचे फुल देऊन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे!’ असं सांगतो!

तसेच जर एखाद्या ठिकाणी खूप मोठा वाद झाला आहे, दोन गटांमध्ये भांडण झाली आहेत आणि काही दिवसांनी तो वाद शांत झाला आहे तर मैत्रीसाठी आणि शांततेसाठी देखील गुलाब घेऊन जातात. पण तेव्हा आपण पांढरा गुलाब घेऊन जातो किंवा गुलाबी गुलाब घेऊन जातो.

गुलाब या फुलावर अनेक मोठमोठे कवी कविता करतात, अनेक शाहीर शायऱ्या करतात. गुलाब बघून प्रत्येक माणसाला छान वाटते मन प्रसन्न होते.

गुलाबाच्या झाडाचे अनेक फायदे असतात. फुलापासून गुलकंद तयार होते. गुलाबाच्या सुरुवातीच्या टोकावर बसून ते शेवटच्या टोकापर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत.

त्यापासून गुलकंद तर बनतेच, पण गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाब जल देखील बनवले जाते. त्याचा वापर पूजेत देखील मोठ्या प्रमाणावर होतो. पुण्याच्या दगडूशेठच्या मंदिरात दरवर्षी वेगवेगळ्या गुलाबांच्या रंगाची सजावट केली जाते. त्या दिवशी तर डोळ्यांना दिपवून टाकणार असे मंदिराचे रूप आपण पाहतो.

गुलाब हे आपल्याला आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट देखील शिकवतो ते म्हणजे गुलाबाला असणारे काटे! म्हणजेच काय तर प्रत्येक सुंदर गोष्टीत काही ना काही तरी त्रास देणाऱ्या गोष्टी असतातच.

गुलाबाचे अनेक रंग असतात गुलाबी, पांढरा, निळा, नारंगी, करडा, पिवळा, लाल व पर्पल. काही काही रंग तर खूप दुर्मिळ असतात आणि खूप कमी देशांमध्ये अशा प्रकारचे गुलाब सापडतात.

गुलाबाचे रंग प्रत्येक वेळी एक वेगळा संदेश देऊन जातो. पांढरा गुलाब हे शांततेचा प्रतीक असते तर लाल गुलाब हे प्रेमाचे आणि रागाचे प्रतीक असते, गुलाबी गुलाब हे यारी दोस्तीच प्रतीक असते. असे प्रत्येक रंग काही ना काही तरी सांगून जातात.

गुलाबापासून जी अत्तरे बनतात ती सगळ्यात जास्त सुगंध देऊन जातात. बऱ्याचशा सुगंधी द्रव्यांमध्ये बेस म्हणून गुलाबाच्या फुलाचा वापर करतात.

सध्या तर केक बनवण्यासाठी सुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि फुलांचा वापर करता येतो! कारण गुलाबाच्या फुलांची सजावट ही केक वर एक वेगळी शोभा आणते, त्यामुळे केक बनवून पूर्ण झाला की त्यावर गुलाब ठेवले जातात. लग्न समारंभ, साखरपुडा या सगळ्या समारंभाला तर गुलाबाची फुले ही आवर्जून केकवर लावली जातात. गुलाब बघून आपले मन शांत होते. रुसवे- फुगवे निघून जातात. म्हणूनच मला गुलाब फूल खूप आवडत!

मी माझ्या आवडत्या शिक्षिकेला सुद्धा गुलाबाचा फूल द्यायाचे. तसेच ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांना सुद्धा गुलाब खूप आवडायचा, ते त्यांच्या शर्टला नेहमी गुलाब लावायचे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *