माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध

आम्ही मागच्या वर्षी ‘ताडोबा’ अभयारण्यात गेलो होतो. तिथे आम्हाला खूप सारे ‘वाघ’ तर दिसले, परंतु मी शोधत होते, ते सिंहाला! पण सिंह तर मला तिथे अजिबातच दिसला नाही, मी थोडी निराश झाली. कारण माझा आवडता प्राणी सिंह आहे! मी भारतात राहत असले आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी हा जरी वाघ असला, तरी सुद्धा मला लहानपणापासून सिंह फार आवडतो. मुळात आमच्या बाई सिंहाचे चित्र काढायला लावायच्या, तेव्हा मला त्याचे झुपकेदार तोंड काढायला फार आवडायच. सिंह बाकीच्या प्राण्यांपेक्षा खूपच वेगळा दिसणारा असा प्राणी आहे. जंगलाचा राजा देखील आहे! ‘सिंहाला’ जंगलाचा राजा म्हणतात!

मुळात ‘सिंह’ हा प्राणी अत्यंत ताकदवर आहे, त्यामुळे त्याला सगळेजण खूप घाबरतात. म्हणूनच की काय, त्याला जंगलाचा राजा देखील म्हणतात. कारण जशी सगळी प्रजा आपल्या राजाला घाबरून असते.

मी माझ्या बाबांना सांगितले की ‘मला सिंह पाहायचा आहे.’ तर ते मला राणीच्या बागेत घेऊन गेले आणि ते बाग मुंबईला आहे. आम्ही पुण्याहून आधी मुंबईला गेलो आणि मग राणीच्या बागेत. मला सिंह दिसला त्यादिवशी, तो दिवसभर झोपला होता असे तिकडच्या एका गार्डने सांगितले. जर तो जागा असता, तर मला तो कशी डरकाळी फोडतो? हे बघता आले असते. पण त्या दिवशी तो पूर्ण दिवस झोपला होता. पण मला याचे बरे वाटले की मला सिंहाला बघायला तरी मिळाले.

सिंह हा अत्यंत हुशार प्राणी आहे. तो त्याची शिकार कायम रात्रीच्या वेळीच करतो. कारण रात्रीच्या वेळी बाकीचे प्राणी झोपलेले असतात, जास्त सतर्क नसतात. अशा वेळेला खूप चतुराईने सिंह आपली शिकार करतो. मुळात सिंहाला जी शिकार करायची असते, त्याच्यावर तो आधी पाळत ठेवतो. तो प्राणी नक्की काय करतो? काय खातो? कुठे फिरतो? कोणाबरोबर असतो?  या सगळ्या गोष्टींची सिंहाला उत्तमपणे माहिती असते. मग शिकार कशी करायची? हे व्यवस्थित ठरवून मग शिकार करतो.

सिंहाचे प्रत्येक अवयव हे खूप वेगळे असतात. त्याचे दात तर खूप जास्त तीक्ष्ण असतात! तसेच त्याची नखे सुद्धा खूप जास्त तीक्ष्ण असतात. सिंहाच्या शरीराचा रंग हा सोनेरी असतो. जेव्हा सिंह तरुण असतो किंवा लहान असतो छोटे पिल्लू असतो, तेव्हा त्याचा रंग सोनेरी असतो. जसजसा सिंह मोठा होत जातो, तसतसा त्याचा रंग चॉकलेटी किंवा गडद सोनेरी रंगाचा होत जातो.

आत्ता सध्या ‘लायन किंग’ नावाचा एक हॉलीवुड चित्रपट खूप गाजतो आहे. तो मी दहा वेळा तरी बघितला असेल! त्यात सिंहाचे विश्व आणि तो त्याच्या बाळाला कशाप्रकारे मोठा करतो. हे अगदी खूप छान पद्धतीने दाखवले आहे. तसेच खऱ्या आयुष्यात देखील सिंहाचे पिल्लू जेव्हा या जगात जन्माला येते आणि हळूहळू मोठे व्हायला लागते,तसे सिंह आणि त्याची बायको दोघे मिळून त्याला शिकार कशी करायची? आणि दुसऱ्यांपासून आपला बचाव कसा करायचा? या गोष्टी शिकवतात. तसेच ते सिंहाचे पिल्लू स्वावलंबी बनावे यासाठी त्याला कधी-कधी एकटे सोडून देखील निघून जातात, म्हणजे बाकीच्या प्राण्यांबरोबर तो कसा जुळवून घेतोय? हे त्यांना बघायचे असते. या सगळ्या गोष्टी या चित्रपटात अगदी नीट नेटक्या मांडल्या आहेत. छोते-छोटे बारकावे खूप छान पद्धतीने मांडल्याने आपण सिंहाचे आयुष्य अगदी जवळून बघू शकतो.

सिंहाची अजून एक खासियत अशी आहे, ते कधीच एकटे राहत नाहीत. म्हणजेच सगळे सिंह कायम जमावामध्ये राहतात. त्यांचा सात आठ सिंहांचा मिळून एक गट तयार होतो, मग ते सगळे एकत्र राहतात, शिकारीला सुद्धा एकत्र जातात आणि नुसता सिंह एकटा नसतो तर त्याच्यामध्ये  मादी सुद्धा त्याच्याबरोबर राहते. सिंहाची अजून एक खासियत अशी की, प्रत्येक सिंहाच्या ग्रुपचे काही टेरिटरी मार्क्स असतात, म्हणजे त्यांना हवी ती जागा किंवा हवा तो भाग ते स्वतःसाठी राखीव करून ठेवतात. जर एखादी जागा त्या गटाने राखीव केलेली असेल आणि त्या भागात दुसरा कोणताही प्राणी आला तर ते त्याची शिकार करतात, प्रत्येक जंगली प्राण्याला माहिती असते की ही जागा या सिंहाच्या गटासाठी राखीव आहे.

सिंह आणि त्याची बायको मिळून वर्षाला दोन किंवा तीन मुलांना जन्म देतात. त्यांची मुले पहिल्या तीन महिन्यानंतरच मांसाहार करू लागतात. त्यामुळे ती पिल्लू स्वतःहून शिकार करून खायला शिकतात. मुळातच सिंह हा मांसाहारी प्राणी आहे, त्यामुळे त्यांची बाळ देखील शिकार करायला आणि मांसाहार खायला फार लवकर शिकतात. सिंह हा खूप चित्तवेधक प्राणी आहे, त्यामुळे मला सिंह हा प्राणी खूप जास्त आवडतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *