माझा आवडता छंद निबंध
माणूस म्हटल की त्याला छंद आला!.आपण जन्माला आल्यापासून, नंतर मोठे होईपर्यंत अनेकदा, आपल्याला काय आवडते? काय नाही आवडत? हे आई बाबा बघायला सुरुवात करतात. लहानपणापासून कळायला सुरुवात होते, की आपण काय केल्यावर आनंद मिळतोय.
आयुष्यात जे केल्यावर आपल्याला खूप छान वाटते किंवा आनंद मिळतो ते म्हणजे छंद! कारण आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात. त्या आपण अगदी मनापासून करतो. म्हणूनच आपण त्याला छंद असे म्हणतो.
प्रत्येक माणसाला छंद फक्त एकच असला पाहिजे, असे गरजेच नाही. त्याचप्रमाणे मला देखील भरत नाट्य करायला, सुगम संगीत गायला, आणि फिरायला खूप आवडते. मोठे झाल्यावर मला अजून एक छंद निर्माण झाला आहे. तो म्हणजे मी जिथे-जिथे प्रवासाला जाते तेथील दगड गोळा करून आणण्याचा. जिकडे फिरायला जाईल तिकडून एक तरी दगड उचलून आणतेच मी!
माझ्या भरतनाट्यमची आवड ही मी दोन वर्षाची असल्यापासूनच चालू झाली. सगळ्यात पहिल्यांदा बिल्डिंगमध्ये गणपती उत्सव होता, तेव्हा पहिल्यांदा मी राधा बनले होते. तेव्हापासून माझ्या नृत्याच्या आवडीला आणि प्रवासाला सुरुवात झाली.
भरतनाट्यम म्हणजे काय? तर भरत नाट्यम हा कर्नाटकातील एक सुंदर असा नाट्यप्रकार आहे. दक्षिण भारतीय संस्कृतीतला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कर्नाटकामध्ये दर दोन घर सोडली की भरतनाट्यम करणारा एक ना एक विद्यार्थी तर आपल्याला नक्कीच सापडतो! भरतनाट्यम नाट्यप्रकार हा दक्षिण भारतातील सर्वात जुना नाट्यप्रकारापैकी एक आहे. मी दुसरीला असल्यापासूनच आमच्या बाई जोशीबाई यांच्याकडे भरतनाट्यम च्या क्लासला जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नृत्य करायला मला प्रचंड आवडते. त्यातून मिळणारा आनंद हा काहीतरी अनोखा असतो! शारीरिक गोष्टींमध्ये पण प्रगल्भता येते. म्हणजे काय तर मी रोज व्यायाम करत नाही पण एक तास तरी भरतनाट्यमचा सराव मात्र नक्की करते.
नृत्यामुळे शारीरिक व्यायामही आपसूकच होतो. कारण भरतनाट्य मधल्या अनेक स्टेप्स या खाली बसून उठण्याच्या असतात, त्यातून बराच व्यायाम रोज होऊन जातो. आता तर त्या गोष्टी फारच अंगवळणी पडल्या आहेत. भरतनाट्यम करताना त्यातील मुद्रा, हावभाव यातून खूप आनंद मिळतो.
त्यातील ‘नवरस’ तर मला खूप जास्त प्रमाणात आवडतात. प्रत्येक रसामध्ये एक वेगळी जादू असते. ‘हास्य’ रसातून आपल्या आयुष्यात असणारे सगळे हास्य बाहेर पडते. ‘विभत्स’ हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या खूप घाणेरड्या प्रसंगांना अगदी सहज कसे सामोरे जाता येईल हे दाखवून देतो. ‘शांत रस’ यामुळे आयुष्यातील सगळ्या शांततेचे महत्व आपल्याला एका झटक्यात कळून येते. ‘करुण रस’ आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात किती शांत राहावे याची आठवण करून देतो. आयुष्यात कितीही दुःख असले तरी आपल्यापेक्षा जास्त दुःख असलेल्या माणसाकडे बघितले की आपण ज्या जगात सुखी आहोत हे जसे कळते, तसे या प्रत्येक नवरसातून व्यक्त होण्याची जादू ही फक्त नृत्यातच आहे.
हा माझा सगळ्यात मोठा छंद का आहे कारण नाचताना मी कोणतरी वेगळीच व्यक्ती असते. हेच सगळ्यात मोठं आनंद देणार शस्त्र आहे!
अजून एक छंद म्हणजे मला गायला फार आवडते. माझ्या गाण्याची सुरुवात देखील लहानपणापासूनच झाली. शास्त्रीय संगीत मी वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकायला घेतले. मुळातच माझे आई-वडील कला आणि छंद जोपासणे या सगळ्याला फार महत्त्व द्यायचे. त्यामुळे कधीतरी एकदा मी लहानपणी छान गायले होते, आणि माझ् गाणं बाबांना फार आवडले. म्हणूनच त्यांनी मला गाणं शिकायला पाठवले. पाचवीत असल्यापासून ‘सा रे ग म प’ चे धडे गिरवत मी एक-एक राग दोन-दोन तास गाण्यापर्यंतचा प्रवास उत्तमरीत्या पार पाडला.
मुळातच गाणं गाताना आपण भान विसरून जातो. मनसोक्त गाण्याचा आनंद घेतो. म्हणूनच गाणं गायला मला फार आवडत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून झाल्यावर सुगम संगीत शिकायला सुरवात केली. मला फार आवडते सुगम संगीत!
हे शास्त्रीय संगीतापेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचे संगीत असते. त्यात मूळतः गाणी गायली जातात आणि राग किंवा आलाप ताना हे प्रकार कमी गायले जातात.
सुगम संगीताचा फायदा असा होतो, की ज्यांना गाणं माहिती नाहीये असे लोक देखील सुगम संगीत ऐकून खुश होतात कारण ही कानाला बरे वाटते. ऐकायला छान वाटले आणि थोडा फार कळले की लोक मस्त आनंद घेतात. सुगम संगीतात वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली जातात भक्ती गीत, भावगीत, लावणी, ठुमरी व भजन या सगळ्या प्रकारात गायला खूप मजा येते. म्हणूनच मला हे दोन्ही छंद खूपच आवडतात.
आता वळूया माझ्या तिसऱ्या आणि एकदम नव्या अनोख्या छंद कडे ते म्हणजे ‘दगड गोळा करणे.’ सुरुवातीला मला हा छंद नव्हता, फक्त वेगवेगळ्या दगडांचे आकर्षण लहानपणापासूनच होते. पण जसे-जसे मोठी झाले आणि कळू लागले, तसे-तसे एक गंमत वाटायला लागली. प्रत्येक ठिकाणी माती वेगळी असते, दगड वेगळे असतात. पर्यावरण वेगळे असते. त्यामुळे त्या मिळालेल्या दगडाचा आकारही खूप वेगळा असतो. त्याचे रंग हे काही किलोमीटरवर लांब गेल्यावर बदलत जातात! जशी भाषा बारा किलोमीटर नंतर बदलते, तसेच दगडही ठिकठिकाणी बदलत असतात.
सध्या माझ्याकडे एका बॉक्समध्ये मी ते जमा केलेले दगड ठेवले आहेत. आमच्याकडे कोणी पाहुणे मंडळी आले, की ते आवर्जून त्या दगडाचे कलेक्शन आणि त्याचे आकार शोधण्याचा मस्त आनंद घेतात. माणसाच्या आयुष्यात छंदाला खरंच खूप महत्त्व असते.