माझे आवडते लेखक साने गुरुजी निबंध
साने गुरुजी हे नाव घेतले, की माझ्या तोंडातून आपसूकच ‘श्यामची आई’ हे पुस्तक येत, आणि हे पुस्तक इतके गाजले होते की त्याची एकूण हजार प्रती तरी त्या काळात विकली गेली होती. साने गुरुजींनी त्यानंतर एकूण 70 ते 80 पुस्तके लिहून प्रकाशित केले. मुळातच साने गुरुजींचे लिखाण हे खूप सुंदर आहे. तसेच ते समाजाला सतत काहीतरी चांगले करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. म्हणूनच साने गुरुजी यांना प्रेरणादायी शिक्षक व समाज सुधारक देखील म्हटले जाते.
साने गुरुजींचे लिखाण हे साधे, सहज व सोपे असून प्रत्येकाला कळणारे असे आहे. ते त्यांच्या लिखाणात कोणतीही जड शब्दांचे शैली चा वापर करत नाहीत किंवा त्यांच्या लिखाणातून कधीच कोणती गोष्ट कळली नाही असे होत नाही. सहज साध्या व सोप्या शब्दात मांडणे हे त्यांच्या लिखाणाचे सगळ्यात मोठे यश आहे. तशी मला वाचण्याची आवड लहानपणापासूनच आहे. आता पर्यंत खूप लेखकांची खूप पुस्तके वाचली आहेत. मग ‘बोरकर’ असू देत की ‘ना.धो.महानोर’ असू देत. या सगळ्या लेखकांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडतात ते साने गुरुजी!
साने गुरुजी यांचे सगळ्यात गाजलेले गीत म्हणजे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’. त्यात त्यांनी ‘सर्वधर्मसमभाव’ या महान कल्पनेला अत्यंत सहजरीत्या जन्म दिला! मुळातच ते काळाच्या खूप पुढे चालणारे असे लेखक होते. त्यांच्या काळात ज्या छोट्या-छोट्या गोष्टींना ब्रिटिश सरकार आणि बाकीच्या लोकांकडून विरोध होत होता, अशा गोष्टी ते करून मोकळे व्हायचे. मुळातच काय आपण समाजाच्या खूप पुढचा विचार करतो. हे त्यांनी कधीच मोठेपणात दाखवून दिले नाही, तर आपल्या समाजात चांगल्या सुधारणा होऊन सगळ्या लोकांनी एकमेकांशी चांगली वागणूक द्यावी हीच त्यांची इच्छा असायची.
साने गुरुजींचे संपूर्ण नाव ‘पांडुरंग सदाशिव साने’ आहे. त्यांचा जन्म ‘२४ डिसेंबर १८९९’ वर्षी ‘रत्नागिरी’ जिल्ह्यातील ‘पालघर’ या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव ‘यशोदाबाई’ तर वडिलांचे नाव ‘सदाशिव’ होते. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पालघरला पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करून ते खूप मोठे शिक्षक झाले. मुळातच त्यांच्या काळात सगळ्यांना शिक्षण उपलब्ध होत नव्हते. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून शिकून त्यांनी शिक्षक ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे नाते खूप खेळीमेळीचे असायचे. सर्व विद्यार्थ्यांना ते समान दर्जा द्यायचे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना ते शिक्षक म्हणून अत्यंत आवडीचे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक धडे दिले नाहीत तर आयुष्याचे धडे दिले. तसेच स्वातंत्र्य काळात विद्यार्थ्यांना आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केले.
साने गुरुजी यांनी ‘सविनय कायदेभंग चळवळ’ यातून १९३० साली वक्ता म्हणून देखील काम केले. त्यांना समाजसेवेची आवड अगदी लहानपणापासून असल्याने त्यांनी अनेकदा समाजसेवा करण्यासाठी तुरुंगवास भोगला. भारत मातेची सेवा करण्यासाठी त्यांनी त्या गोष्टीला कधीच महत्व न देता आपल्या समाजसेवेचे कर्तव्य आयुष्यभर चालू ठेवले. त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा लिखाण पूर्ण केले.
मुळातच साने गुरुजी हे एक उत्तम कवी देखील होते. त्यांच्या कवितांचा प्रभावाणे ते लोकांना खूप उत्तेजित करत असत. नंतर तो प्रभाव इतका वाढला की ब्रिटिश सरकारने त्यांच्या कवितांवर बंदी घातली. त्यांच्या कविता साध्य, सोप्या व सरळ असायच्या आणि त्यात भारत सरकारसाठी किंवा भारतासाठी आपण सर्वांनी कशी सेवा केली पाहिजे? किंवा चळवळीत कसा भाग घेतला पाहिजे? याची पार्श्वभूमी असायची, त्यामुळे जनजागृती व्हायला मदत व्हायची. हेच ब्रिटिश सरकारला मान्य नव्हते म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांच्या कवितांवर बंदी घालायला सुरुवात केली आणि तेव्हा खूप प्रयत्न करून देखील ब्रिटिश सरकारने त्यांची अट मागे घेतली नाही. तेव्हा नाईलाजाने त्यांनी या चारोळी लिहिल्या ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.’
साने गुरुजींना मुळातच लहानपणापासून भारतातील जातीभेद, उच्च नित्यपणा, अस्पृश्यता, बालविवाह व सती परंपरा या सगळ्या रूढी परंपरा आवडत नव्हत्या, त्यांच्या म्हणण्यानुसार ‘ब्रिटिश येऊन आपल्यावर राज्य करतात त्यांना घालवायचे सोडून आपण या रूढी परंपरा प्रथा यांच्यावरून एकमेकांशी वाद घालत बसलो आहोत आणि ब्रिटिश आपल्या राज्यावरती राज्य करत आहेत. आपल्या भांडणामुळे त्यांचा फायदा होत आहे. भांडण संपवून जर आपण एकत्र आलो तर आपण त्यांच्या विरोधात खूप मोठा लढा देऊ शकू.’
साने गुरुजी लहानपणापासूनच खूप हालाकीच्या परिस्थितीमधून पुढे आलेत, त्यामुळे ते आयुष्यात कधीच हरले नाहीत. त्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देखील मुश्किलीने मिळायचे पण यातूनही मार्ग काढून त्यांनी त्यावर मात केली. ‘आपल्याला आपल्या आयुष्यातील ध्येय माहिती असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडत नाहीत’ या विचारांचे ते होते म्हणूनच त्यांनी या गोष्टीचा कधी फरक पडून न घेता आयुष्यात थांबले नाहीत. मोठे होऊन, शिकून शिक्षकाची पदवी मिळाली, उत्तम वक्ते होऊन लोकांना स्वातेत्र्य चळवळीत सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करू लागले म्हणूनच त्यांना समाज सुधारक ही मोठी पदवी देखील मिळाली. त्यांना हे संस्कार शाळेत असल्यापासूनच मिळायचे. त्यांची वैचारिक सुधारणा ही शाळेपासूनच झाली होती, त्यांनी विद्यार्थी असतानाच त्यांचे मासिक प्रकाशित केले होते जे खूप लोकप्रिय झाले होते. सविनय कायदेभंग चळवळीपासून ते देशासाठी लढू लागले, पुस्तके पूर्ण केलेत म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून काही ना काहीतरी शिकायला मिळते म्हणून मला साने गुरुजी फार आवडतात.