मी झाड झाले तर

झाडे हा पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असतात. जर झाडे नष्ट झाली, तर आपले पर्यावरण देखील नष्ट होईल.

जर मी झाड झाले, तर मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना सावली देईल, ऑक्सिजन देईल, फळफुल देईल. तसेच जर मी झाड झाले, तर माझ्यावर अनेक पक्षी येऊन बसतील, ते त्यांचे स्वतःचे घरटे तयार करतील. मला त्यांचं घर व्हायला आवडेल.

माझ्यावर फुल आल्यावर लहान मुले खुश होतील, ते बघायला मला खूप आवडेल. जर मी झाड झाले, तर मी माझ्यावर अनेक फुल आणि फळ येऊ देईल.

जर मी झाड झाले, तर माझ्यामुळे माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना सगळ्यांनाच प्राणवायू मिळेल. याचा मला आनंद होईल. मी कार्बन डाय-ऑक्साइड रात्री शोषून घेऊन व त्याच्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून सकाळी ऑक्सिजन बाहेर सोडेन. तसेच जमिनीवरचे पाणी मी शोषून घेईन, त्यामुळे जमिनीवरची पाण्याची पातळी वाढणार नाही आणि पूर येण्याची शक्यता कमी होईल.

जर मी झाड झाली, तर पक्ष्यांना खूप आनंदी ठेवत जाईल. जे प्राणी माझ्या सावलीमध्ये आपले घर बनवतात, त्यांना देखील तिथे आनंदाने राहून देईल. त्यांचे रक्षण करेल.

मुळात मी झाड होणार या कल्पनेतच मला खूप आनंद झालेला आहे.

जर मी झाड झाले, तर मला वडाचे झाड व्हायला आवडेल. कारण वडाच्या झाडाच आयुष्य हे सगळ्या झाडांपेक्षा खूप जास्त असते. वडाचे झाड कमीत-कमी १०० ते जास्तीत-जास्त दीडशे वर्ष पर्यंत जगत.

मला वडाचे झाड व्हायला आवडेल, कारण वडाच्या झाडाच्या सगळ्याच अवयवांचे खूप जास्त उपयोग असतात. वडाचे झाड औषधी असते. त्याच्या पारंब्यापासून अनेक औषधे बनतात. तसेच केस गळती, त्वचेचा रोग यांच्यावरती देखील वडाच्या पारंब्याची पावडर लावतात. त्यामुळे अनेक रुग्ण माझ्यामुळे बरे होऊ शकतील.

वडाच्या झाडाखाली पारावर सगळेजण बसतील. मोठ्या-मोठ्या लोकांच्या गप्पागोष्टी होतील. तसेच ग्रामपंचायतीची बैठक सुद्धा घेतली जाईल. हेच काय तर माझ्या पारावर बसून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

तसेच वटपौर्णिमेला सगळ्या बायका मिळून माझी पूजा करतील. त्यांना धार्मिक आणि मानसिक समाधान मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या पारंब्या जेव्हा वाढतात तेव्हा सगळी लहान मुलं त्याच्यावर झोका घेतात. वडाच्या फुलांचा आणि फळांचा देखील मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधे बनवण्यात उपयोग होतो.

वडाच्या झाडाला बंगालमध्ये ‘बनिया’ म्हणतात. म्हणूनच इंग्रजीत त्याचे नाव ‘बनियन ट्री’ असे पडले.

भारतातील काही प्राचीन शहरात खूप मोठे प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. गुजरात मधील नर्मदेच्या मुखाजवळ ‘कबीरवट,’ कलकत्त्याच्या शिवफूट बॉटनिक गार्डनमध्ये पसरलेला वड प्रचंड असून त्याच्या छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात तेही एका वेळेस. म्हणूनच मी जर झाड झाले तर वडाचे झाड होईल.

वडाच्या झाडांमध्ये ‘कृष्णवट’ नावाचा एक वेगळा प्रकार असतो. त्याची पाने किंचित वाकलेली असतात. ती द्रोणासारखी दिसतात. या झाडाची गोष्ट देखील खूप वेगळी आणि प्रसिद्ध आहे. एके दिवशी गोपाळकृष्ण गायींना घेऊन रानात गेले असता, गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या. त्याच्या आग्रहास बळी पडून लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सगळ्या सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्री गोपाल एक झाले, हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडकून त्याचा द्रोण तयार केला गेला, तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोण्यासारखी बनली आणि पुढेही तशीच पाने त्याला येऊ लागली, अशी आख्यायिका आहे, म्हणून वटवृक्षाला कृष्णवट असे नाव पडले.

भारतीय संस्कृतीमध्ये वडाचे महत्त्व खूप जास्त आहे. वडाला ‘आराध्य वृक्ष’ असे देखील म्हटले जाते. पुराणांमध्ये देखील आपण वडाच्या झाडाचा उल्लेख बघतो. चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचरसाचे मुख घेऊन त्यांनी खालच्या बाजूला ठेवले. त्या सोमचराचा एक वटवृक्ष बनला. अशी त्याच्या उत्पत्तीची कथा आहे. म्हणजेच काय तर वड हा ‘यज्ञय वृक्ष’ असून पवित्र असे हे झाड आहे.

एकूणच काय तर झाडाचे अनेक उपयोग आपण बघितले त्यामुळे झाडांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. जर मी झाड झाले तर मी निसर्गाला सतत देतच राहील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *