मी पोलीस झालो तर निबंध

“माझ लहानपण खूप छान गेल. मला माझ्या लहानपणी पोलिसांची भीती माझ्या आईने खूप घालून ठेवली होती. जेवताना जर मी घास पटकन खाल्ला नाही, तर लवकर जेव! नाहीतर पोलीस काका येतील, असं म्हणत ती मला घाबरवायची. मग मी पटापट जेवण करायचो. असे एक नाही, प्रत्येकच गोष्टीत माझी आई घाबरायची. त्यामुळे माझ पोलीस काका आणि त्यांना घाबरण हे लहानपणापासूनच सुरू झाल होत”.

“आत्ता मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. मी शाळा संपण्या आधीच ठरवलं आहे, की मला एक चांगला पोलीस अधिकारी व्हायच आहे आणि या देशाची सेवा करायची आहे.

आमच्या वर्गशिक्षिका त्या दिवशी सांगत होत्या, की पोलिसांचे काम हे सगळ्यात जास्त खडतर काम असते. त्यांना एकही दिवस सुट्टी न घेता सतत काम करायला लागत”.

“मी जेव्हा हे घरी येऊन सांगितले, तेव्हा माझे बाबा म्हणाले, “बघ बाबा, हे तुला आयुष्यभर करायला जमेल का? नाही तर दुसर काहीतरी हो”.

“पण मी माझ्या मतावर ठाम आहे. माझे ठरले आहे, की मला पोलीस अधिकारीच व्हायचे आहे.

त्याचं कारण म्हणजे माझा चुलत भाऊ तो नुकताच पोलीस भरतीच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. मी देखील खूप अभ्यास करून परीक्षा पास होणार आणि खूप चांगला पोलीस होणार”.

“दादा मला नेहमीच कसा अभ्यास करायचा हे सांगत असतो. शाळेपासूनच त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. मी देखील शाळा संपायच्या आतच अभ्यासाला सुरुवात करणार आहे. मी त्याला विचारले की पोलिसांना नक्की काय – काय काम करायला लागतात?

तो नेहमी हसून सांगतो, “तू अजून लहान आहेस. नाही कळणार तुला”.

आज मात्र मी खूप हट्टाला पेटलो.

मी खूप आग्रह केल्यावर मग मला दादा ने नक्की पोलीस अधिकारी म्हणजे काय? किंवा पोलीस आपण कसे बनतो? आणि ते बनल्यावर काय काम करायला लागतात? या सगळ्या गोष्टी सांगितल्या.

‘पोलीस’ ही एक पदवी असते.

तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा दिल्यावर, जर त्यात पास झालात. तर तुमची एक शारीरिक पात्रता परीक्षा घेतात. त्यात पण जर तुम्ही पास झालात तर तुम्ही “पोलीस” या पोस्टला पात्र ठरता”.

“पण दादा ने हेही सांगितले, की शारीरिक पात्रता परीक्षा हि अत्यंत कठीण असते. म्हणजे जगात पोलिसांच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त कठीण परीक्षा ही भारतीय पोलिसांचीच असते. त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा कस असतो. म्हणून तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त असणे खूप जास्त गरजेचे असते”.

“मला हे सगळं ऐकून खूप भारी वाटले. मी पळत पळत बाबांकडे गेलो. त्यांना सांगितले, की पोलीस झाल की काय काम करावी लागतात ते!”

बाबा आधी तर खूप हसायला लागले.

मग त्यांनी मला विचारले, “काय राजे, ठरले वाटत पुढे काय करायचे ते?

मी म्हटले, “हो!”

“मला पोलीस व्हायचे आहे”.

मग बाबा बोलायला लागले.

ते म्हणाले, “पोलीस होणे एवढ सोप नसत. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. “कायदा आणि सुव्यवस्था” सांभाळावी लागते. कधीच काही चुकीची गोष्ट करून चालत नाही. आपल्यासमोर जर काही गुन्हे घडत असतील, तर ते कसे थांबवायचे, हे न भिता तुम्हाला कळले पाहिजे.

कोणीतरी सुरा घेऊन एखाद्याचा खून करत असेल तर तुम्ही घाबरून गेलात, तर तुम्ही त्या गुन्हेगाराला कसं पकडाल?

त्यामुळे पोलीस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे, ते म्हणजे तुला खूप धाडसी बनावे लागेल.

चोर खूप शातिर असतात. त्यामुळे तुला गुन्ह्याचा नीट तपास करून चोराला शोधावे लागेल. त्यासाठी खूप डोक चालवाव लागत.

कारण कोणताही गुन्हा घडतो, त्या वेळेला बऱ्याचदा पुरावा लगेच सापडत नाही”.

“त्याचप्रमाणे तुला रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुद्धा सांभाळावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर या देशात काही आणीबाणी ची परिस्थिती आली तर त्या वेळेला खूप सज्ज राहाव लागेल.

सणावाराच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुला कामाला जाव लागेल. कारण पोलिसांना सतत सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो.

त्यामुळे सुट्टी वगैरे न घेता आयुष्यभर कणखरपणे हे काम सांभाळाव लागेल. एवढेच नाही तर सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे चे रक्षण देखील करावे लागेल”.

लोक जर कोणत्या अडी अडचणीत अडकले तर तुला सगळी काम सोडून आधी त्यांची मदत करावी लागेल. कारण पोलीस हा देशाचा जबाबदार नागरिक असतो. देशाची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य असते.

जर तू या सगळ्या गोष्टी करायला सज्ज असशील, तरच तू पोलीस बनायला तयार हो”.

बाबांनी एवढं सगळं सांगून त्यांचं बोलणं थांबविले. मी बाबांच्या बोलण्याने अधिकच भारावून गेलो. आणि निश्चय केला की हे सगळे आपल्याला करायचे आहे. आपल्याला पोलीसच व्हायचे आहे”.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *