मी फुलपाखरू झाले तर
मला काल रात्री एक स्वप्न पडले होते, की मी एका सुंदर बागेत गेले होते. तिकडे शेकडो तरी फुलपाखरे असतील. सगळी खूप सुंदर वेगवेगळ्या रंगाची अशी होती. ती सगळी फुलपाखरे अगदी मनसोक्त फिरत होती. इकडे-तिकडे हिंडत होती व त्यांना थांबवणार कोणीच नव्हते.
मी सकाळी उठून विचार केला, की मी जर खरंच फुलपाखरू झाले. तर किती भारी होईल ना! मला सगळीकडे जाता येईल, वेगवेगळ्या रंगाचे सुंदर पंख पांघरता येतील. तसेच कुठेही जाताना मला कोणत्याही प्रकारची वाहनाची गरज लागणार नाही. मी कोणत्याही फुलावर जाऊन बसू शकेन. खूप मैत्रिणी बनवू शकेन. रोज नवीन घरात राहायला जाऊ शकेन, किती गोष्टी करू शकेन.
माणसाला कसे प्रत्येक ठिकाणी जाताना, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना वाहनाची गरज लागते, पण जर मी फुलपाखरू झाले. तर मला कोणत्याही वाहनाची गरज न पडता मी मनसोक्तपणे बागेत फिरेल, बाग फिरून झाल्यावरती शाळेत जाईल. शाळा खूप फिरल्यावर तिकडे मुलांबरोबर मस्ती करेन. मग मी इमारतीच्या अवतीभवती फिरेल. मग नदीवर जाईन, मस्त लाटांचे पाणी बघेन आणि नदीतून थोडेसे उडणारे थेंब अंगावर घेईन.
मग पाण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यावर, एखादे झाड बघून त्या झाडावर जाऊन शांतपणे झोपी जाईल. आयुष्य किती सुंदर आहे. जर मी फुलपाखरू झाले, तर त्या सुंदर आयुष्याचा मी मनसोक्त आनंद अगदी बेधडकपणे घेऊ शकेन!
झाडावरचे प्रत्येक फुल हे वेगळे असते, आणि जर मी फुलपाखरू असेन तर मी कोणत्याही फुलावर उडून जाऊ शकेन. जे फुल मला खूप जास्त आवडते त्या फुलाला माझं घर बनवू शकेन. त्यामुळे रोज एकाच घरात राहायचे बंद होईल, मला जे हवे ते घर मी रोज बदलू शकेन.
खूप मैत्रिणी बनवू शकेन. जर मी फुलपाखरू असेन तर बाकीच्या फुलपाखरांची तर मैत्री करेनच, पण उडणाऱ्या पक्षांची पण मैत्री करेन. कधी मांजरीशी, कधी बाकीच्या वेगवेगळ्या प्राण्यांची देखील मैत्री करू शकेन. जर मी फुलपाखरू असेल तर मध देखील गोळा करेन. प्रत्येक फुलातून वेगळा मध मिळतो. त्यामुळे मला रोज वेगवेगळ्या प्रकारचे जेवण मिळू शकेल.
जर मी फुलपाखरू झाले, तर माझ्या आयुष्याची सुरुवात ही सुरवंटापासून होईल. कारण कोणत्याही फुलपाखरू आधी सुरवंट असते, मग हळूहळू तेच रांगत ते सगळीकडे फिरते. झाडावरची पानं खाऊन जगते. मग स्वतःभोवती एक आवरण निर्माण करते, तसंच मी माझ्या अवतीभवती हिरव्या रंगाचा मस्त आवरण निर्माण करेल. नंतर संपूर्ण वाढ झाल्यावर माझ्या पंखात बळ निर्माण झाल्यावर मग मी त्या आवरणामधून बाहेर येईल. तसेच त्या आवरणामध्ये माझ्या पंखांना देखील वेगवेगळ्या रंगाचे आकार निर्माण होतील. मला जितके मोठे हवे तितके मोठे पंख मी बनवू शकेल. पंखांची हळूहळू वाढ होत होत माझे संपूर्ण शरीर तयार होईल व वाढ झाल्यावरती मी एक फुलपाखरू बनेन, आणि उंच आकाशात झेप घेईन.
अशी सगळी स्वप्न मी रंगवत बसले होते. परंतु तेवढ्यात मला लक्षात आलं की फुलपाखराच्या पंखाला जर कोणी हात लावला तर त्याचा आयुष्य कमी होते! तेव्हा माझ्या मनात चटकन विचाराला की आपण माणूस फुलपाखरांचे आयुष्य किती धोक्यात घालतो! आपल्याला मिळणाऱ्या क्षणिक आनंदसाठी आपण त्यांच आयुष्यभराचे नुकसान करतो. काही काही लोकांना सवय असते की फुलपाखरू आजूबाजूला दिसल्यावर त्याचा रंग आपल्या हाताला लागावा. आणि म्हणून ते त्यांच्या पंखांना हात लावतात, परंतु जेव्हा असे केले जाते तेव्हा आपण जोरात हात मारतो आणि त्यामुळे त्या फुलपाखराचे पंख निकामी होण्याचे खूप जास्त संभावना असतात. अशा वेळेला आपण त्या फुलपाखरांना हात लावू नये. एका क्षणिक आनंदासाठी त्यांचे आयुष्य खराब करू नये.
ही फुलपाखरू जेव्हा सुरवंट असतात, तेव्हा ती सरकत-सरकत अख्या झाडावर देखील फिरू शकतात. त्याच वेळेला त्यांच्या रंगांची आणि पंख बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलपाखरू स्वतःच्या पंखांचे रंग स्वतः तयार करू शकतात. त्यांना जो रंग हवा आहे जसा आकार हवा आहे तसे ते स्वतःहून बनवू शकतात.
फुलपाखरूंच्या अनेक जाती प्रजाती असतात. फुलपाखरू ला उडताना बघून अनेक माणसांच्या चेहऱ्यावरती हसू येते, म्हणूनच मला फुलपाखरू होऊन लोकांचा आनंद बनायचा आहे!
पाखरांना बघण्यासाठी लोक बागेत जातात तसेच अनेक ठिकाणी फुलपाखरांचे म्युझीयम देखील बनवलेले आहेत. अनेक लोक फुलपाखरांचे म्युझीयम बघण्यासाठी अगदी परदेशात देखील प्रवास करतात तिकडच्या एखाद्या घनदाट जंगलात जाऊन त्यांना फुलपाखरूंच्या जाती-प्रजाती यांचा अभ्यास करायचा असतो. फुलपाखरांच्या मेंदू वरती सुद्धा आता रिसर्च अनेक ठिकाणी चालू आहे. मुळात फुलपाखरू हे इतके मनसोक्तपणे फिरू शकते की कधी ते शहरात फिरू शकते, कधी गावात फिरू शकते, कधी एखाद्या नदी काठी जाऊन बसू शकते फुलपाखराचा स्वभाव हा खूप स्वच्छंदी असतो म्हणूनच मला फुलपाखरू होऊन त्याचे जग एकदा तरी अनुभवायचे आहे!