मला लॉटरी लागली तर

जर मला लॉटरी लागली तर, एक खूप मोठे स्वप्न सत्यात उतरेल! आमचे कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे.

आमच्या कुटुंबात एकूण पाच जण राहतात. आई, बाबा, माझी लहान बहिण आणि माझा लहान भाऊ.

माझे बाबा रिक्षा चालवून आमचे घर सांभाळतात. बऱ्याचदा पैशांची चणचण निर्माण होते, तेव्हा आई धुणे, भांडीचे काम करते. त्यामुळे आई-वडील दोघेही घर चालवण्यासाठी खूप जास्त कष्ट करतात आणि त्यात आम्ही तीन भावंडे आहोत.

मी सगळ्यात मोठा असल्याने आपसुकच सगळी घरची जबाबदारी माझ्यावरच येणार आहे. त्यामुळे एक ‘सर्वसाधारण मध्यमवर्गीय’ मुलासारखे माझे देखील स्वप्न आहे, की जर मला लॉटरी लागली तर?

जर मला लॉटरी लागली, तर माझ्या लहान बहिणीचे शिक्षण पूर्ण करेन! कारण सध्या तरी माझे बाबा माझ्या शिक्षणावरच खूप खर्च करत आहेत. त्यामुळे माझ्या लहान भावाचे शिक्षण आणि लहान बहिणीचे शिक्षण दोघांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा हवा असेल.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दोघेही त्यांच्या पायावर उभे राहतील. दोघेही घराच्या खर्चाला हातभार लावतील.

त्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे आहे.

तसेच जर मला लॉटरी लागली तर माझ्या बहिणीच्या लग्नासाठी देखील मी पैसे साठवेन. बाबा एक-एक पै जमवतात, त्यांना थोडा हातभार लागेल.

तसेच बऱ्याचदा माझ्या वडिलांची तब्येत बरी नसते. त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या औषधोपचाराचा देखील खर्च पूर्ण करू शकेल. आमचे घर खूप छोट आहे आणि घरामध्ये जास्त फर्निचर किंवा चार नवीन गोष्टी देखील नाही आहेत. जर लॉटरी मिळाली तर घर राहण्यासारखे बनवेल, चार नवीन गोष्टी घेईल, जेणेकरून आमचे आयुष्य सुखकर होईल.

तसेच जर मला लॉटरी लागली तर, आमच्या घराजवळच एक एनजीओ आहे. तिथे अंधबालक राहतात आणि त्या एनजीओला जास्त अनुदान पण मिळत नाही. त्यामुळे त्यांना देखील थोडीफार मदत करेल.

या दिवाळीत आम्ही त्यांच्यासाठी फराळ करून दिला होता. माझी आई म्हणते “आपण चार लाडू कमी खाल्ले तरी चालतील, पण या मुलांचे हाल व्हायला नको.”

जरी पैसा कमी असला तरी देखील माझ्या आई-बाबांनी आम्हाला सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार दिले. आपल्यालाकडे जितके आहे, तितक्यात आपण दुसऱ्यांना मदत करावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. ‘माणूस जरी पैशाने मोठा नसला तरी तो आशीर्वादाने खूप मोठा होऊ शकतो.’ ही शिकवण आम्हाला आमच्या आई-वडिलांनी दिले, त्यामुळे जरी पैशांची चणचण असली, तरी सुद्धा आम्ही आनंदाने कुटुंबात राहतो.

ते दोघे सुरुवातीला एक वेळेचे जेवून आमच्या शाळेसाठी फी भरायचे, परंतु बाबांनी जेव्हा स्वतःची रिक्षा घेतली आणि आईने दोन धुणं भांडीच काम चालू केली, त्यानंतर परिस्थिती जरा थोडी बदलली. पण आता मला खूप मोठे व्हायचे आणि आई-बाबांना सगळ्या सुख सुविधा द्यायच्या आहेत.

मला जर लॉटरी लागली, तर मी तो पैसा इन्व्हेस्ट करेल आणि त्यातून नफा कमवेन, कारण पैसा मिळाल्यावर तो सगळाच जर उडवून टाकला, तर परत पैशांची चडचण भासते. त्यामुळे पैसा मिळाल्यावर तो आधी मी इन्व्हेस्ट करेन.

आणि जर मला लॉटरी लागली तर आईसाठी चार नवीन साड्या घेऊन येईन. ते दोघेही आमच्यासाठी खूप कष्ट करतात, राब राब राबतात. त्यामुळे आईला कधी सुख अनुभवता आलेच नाही. सतत असलेली गरिबी आणि त्याच्यावर आजारपण. या सगळ्यातून आई नुसते कष्ट करते!

सगळ्या गोष्टी सांभाळायचा प्रयत्न करते, म्हणूनच जर पैसे मिळाले, तर सगळ्यात आधी तिचा आनंद शोधून आणि तिला चार नवीन साड्या घेऊन तिची हौस पूर्ण करेल. तिला जरा आराम करायला लागेल. सगळ्यात पहिले तिचे धुणे भांड्यांचे काम बंद करेन. जेणेकरून ती जरा थोडा आराम करू शकेल. जर या सगळ्यातून पैसे वाचले, तर मी स्कुटी घेईन! कारण बस मध्ये जाताना येताना कित्येकदा उभे राहून गर्दीतून जावे लागते. त्यामुळे दिवसभर एवढे दमून आल्यावर निदान बस मध्ये तरी थोडा वेळ आराम करता यावा, या विचाराने रोज बस मध्ये चढायचे आणि रोज बस मध्ये उभेच राहून यायचे. कारण मी शिकता-शिकता सोन्याच्या दुकानात काम करत आहे, त्यामुळे खूप दमून आल्यावर बसायला सीट मिळेल असे नाही, म्हणूनच जर स्वतःची स्कुटी असेल तर घरी जाताना तरी आरामात जाऊ शकेल.

‘लॉटरी लागणे’ हे जसे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न असते, तसेच ते माझे आहे. हे जर पूर्ण झाले तर उत्तमच, नाहीतर मी खूप कष्ट करून माझ्या कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी करेन आणि त्यांचा आयुष्य सुखकर बनवेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *