जर मी शास्त्रज्ञ झालो तर

मुळात सध्याच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की सगळेजण तंत्रज्ञान आणि विकास शिकून घेत आहेत, त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शास्त्रज्ञ. मी शास्त्रज्ञ झालो तर मला इस्त्रोसाठी काम करायला आवडेल. माझा जन्म भारतात झाला आणि भारतीय रिसर्च सेंटर साठीच मला काम करायचे आहे. मी बाकीच्या शास्रज्ञांसारखा उठून नासाला अजिबात जाणार नाही. आपल्या देशासाठी संशोधन करण्यात आणि भारतीय संशोधनासाठी अजून महत्त्वाच्या गोष्टी करण्यात मदत करेल.

जर मी शास्त्रज्ञ झालो तर सगळ्यात आधी ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी काय काय करावे लागेल, तर कारखान्यांमधून येणार धूर असेल किंवा कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर थांबवेन. अश्याने सगळ्यात पहिले हवा प्रदूषण थांबेल, मग पाणी प्रदूषणाकडे लक्ष देईल आणि मग ध्वनी प्रदूषणाकडे लक्ष देईल.

पण ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे खूप गरजेचे आहे. सध्याच्या जगात जर आपल्याला नीट जगायचे असेल तर ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आहे. आजकाल ओझोन लेयर सुद्धा खूप विरळ झालेला आहे, त्यामुळे त्वचेचे कॅन्सर होणे, नको असलेली सूर्याची किरण आपल्या अंगावर येणे अशा सारख्या समस्या उद्भवत आहेत. मुळात ऑक्सिजनची कमतरता देखील भासत आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे हे सगळ्यात महत्त्वाचे लक्ष आहे.

तसेच आकाशातून सौरऊर्जेवर वर चालणाऱ्या गाड्या तयार करेन जेणेकरून इकडचा ट्राफिक कमी होईल. तसेच या गाड्यांमध्ये भरपूर लोक बसतील अशाने कमी वाहने रस्त्यांवर धावतील आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल. कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी देखील प्युअर करण्याचे मशीन शोधून काढेल. जेणेकरून सांडपाण्यातून निघणारे घातक इंद्रिये समुद्रात आणि नद्यांमध्ये मिसळणार नाहीत.

तसेच हवेचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न करेन. हवेचे प्रदूषण होण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे कारखान्यातून येणारा धूर आणि दुसरे म्हणजे प्लास्टिकच्या कचरा जाळून निर्माण होणारा धूर. या दोन्हीचे उपाय शोधून काढेल जेणेकरून हवेचे प्रदूषण खूप कमी होईल.

तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या होणारी खूप मोठ्या प्रमाणावरची वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न करेन. ऑक्सिजन तयार करण्यासाठी नवीन उपकरण तयार करेल जेणेकरून झाडे जरी खूप कमी झालेली असली तरी ऑक्सिजन मिळायला सोपा होईल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे वेगवेगळे शोध लावेल त्यात भारत देशाचे नाव पुढे न्यायचा प्रयत्न करेन.

तसेच असे शोध लावेल ज्याने सगळ्या लोकांचा फायदा होईल आणि कोणाचाच नुकसान होणार नाही. खूप कमी प्रमाणात पण जास्त उपयोगी असणारे असे तंत्रज्ञान बनवेल जेणेकरून सामान्य माणसाला देखील त्या गोष्टी घेता येतील.

जर मी शास्त्रज्ञ झालो तर आजकाल वाढत जाणारे कोरोना सारखे आजार कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवेल जेणेकरून उगाच कोणाचा नाहक जीव जाणार नाही.

तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर मी शास्त्रज्ञ झालो तर ज्या गोष्टीमुळे जीवितहानी होते, अशा गोष्टींचा कधीच शोध लावणार नाही. आजकाल सतत होणाऱ्या युद्धामुळे आपण एकमेकांचे जीव धोक्यात घालण्याशिवाय बाकी काहीच करत नाही. याचा परिणाम फक्त त्या देशातल्या लोकांना होत नाही तर अख्या जगावर होतो. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीचा मी कधीच शोध लावणार नाही. आजकाल जगात ‘न्यूक्लिअर वेपन्स’ आणि बाकीच्या गोष्टी मुळे कोण श्रेष्ठ आणि कोण नाही हे ठरवतात. परंतु या सगळ्या वाईट गोष्टींमुळे जीवितहानी होते आणि वाईट प्रवृत्तींचा नाश होत नाही.

पूर्वी औद्योगिक क्षेत्रात प्रगती झाल्यावर किंवा देश प्रगत झाल्यावरती तो देश श्रेष्ठ आहे असे ठरवले जायचे. परंतु आता बदललेल्या मानसिकतेमुळे ज्या देशाकडे वेपन्स आहेत आणि दुसऱ्याला नष्ट करणारी ताकद आहे, अशा देशाला श्रेष्ठ मानले जात आहे. ही खूप चुकीची गोष्ट आहे, दुसऱ्या देशाला त्रास देऊन स्वतःची प्रगती करणे यात काहीच चांगले आपण करत नाही.

स्वतःच्या देशाची चांगली प्रगती करून आपल्या देशाला पुढे कसे आणता येईल याचा विचार सगळ्या देशांनी करायला हवा.

तसेच अजून महत्त्वाचे म्हणजे आजकाल ध्वनी प्रदूषणामुळे खूप लोकांना अकाली बहिरेपणा, मानसिक ताण निर्माण होणे या सगळ्या गोष्टी होतात. म्हणूनच जर मी शास्त्रज्ञ झालो तर होर्न पासून त्रास मुक्त करणारे असे एखादे मशीन बनवेल जे कानात लावल्यावर त्याची तीव्रता कमी होईल जेणेकरून कानाचे पडदे फाटणार नाहीत.

तसेच जर मी शास्त्रज्ञ झालो तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला माझा आवडता कार्टून डोरेमॉन याच्या सारखा दरवाजा बनवून घेईल जेणेकरून मला एका जागे वरून दुसऱ्या जागेवर अगदी पटकन जाता येईल. मला शास्त्रज्ञ म्हणून एक नाही अशा अनेक गोष्टी करायचे आहेत, म्हणूनच मला एक चांगला शास्त्रज्ञ व्हायचा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *