पेट्रोल संपले तर निबंध

निबंधाचे नावपेट्रोल संपले तर
निबंध प्रकारकल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल, डिझेल, कोळसा हे सगळे इंधनाचे स्त्रोत आहेत. तसेच हे इंधनाचे स्त्रोत खूप मोठ्या प्रमाणावर जरी पृथ्वीवर उपलब्ध असले, तरी ते संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे ते नीट सांभाळले ही आपली जबाबदारी आहे. जर आपण ते स्त्रोत सतत वापरत राहिलो, तर ते संपून जातील. या सगळ्या स्तोत्रांना काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा जर आपण ओलांडल्या तर आपण पृथ्वीवरचा इंधनाचा सगळा साठा नष्ट करू.

जर पेट्रोल संपले तर बऱ्याच गोष्टी घडतील. कारण पेट्रोलचे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमध्ये पेट्रोलचा वापर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या करत असतो. त्यामुळे जर पेट्रोल संपले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा दळणवळणावर बसेल. पूर्ण भारतात एकूण 68 टक्के वाहतूक ही पेट्रोल द्वाराच होते, त्यामुळे जर पेट्रोल संपले तर आपले दळणवळण ठप्प होईल, नुसतेच पेट्रोल नाही तर डिझेल, पेट्रोलियम गॅस या सगळ्या गोष्टी देखील त्यावर अवलंबून आहेत.

पेट्रोलवर चालणारी वाहने म्हणजे कार, मोटरसायकल, छोटे ट्रक, ट्रेन, बस, बोट, जहाजे, काही विमाने आणि काही हेलिकॉप्टर या सगळ्यांनाच पेट्रोलची आवश्यकता असते. जर या पृथ्वीतलावरचे पेट्रोल संपले तर ही सगळी दळणवळणाची साधने आपण वापरू शकणार नाही आणि याचा मोठा फटका आपल्याला दैनंदिन जीवनात बसेल.

तसेच पेट्रोलचा अजून एक फायदा म्हणजे ‘एलपीजी’ म्हणजेच आपण वापरणारा दैनंदिन जीवनातला गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडरला लागणारा जो वायू असतो किंवा जो घटक असतो, तो देखील संपून जाईल आणि मग आपल्याला अन्नधान्य शिजवायला गॅसचा वापर करता येणार नाही. गॅसला जरी अनेक पर्याय असले तरीसुद्धा बऱ्याच देशांमध्ये गॅसवर अन्न शिजवण्यावरच जास्त भर दिला जातो.

जर एलपीजी संपून गेला, तर आपण इलेक्ट्रॉनिक गॅस म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला ‘इंडक्शन’ असे म्हणतात त्याचा वापर करू शकतो, किंवा चुलीवर स्वयंपाक करू शकतो. परंतु या इलेक्ट्रॉनिक गॅस च्या सुविधेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गॅसचा वापर तसेच पेट्रोलचा वापर जपून करणे खूप गरजेचे आहे. जर या इंधनांचा शेवट झाला तर आपल्या निसर्गचक्रात खूप बदल होतील आणि माणसाला पृथ्वीतलावर राहणे दिवसेंदिवस कठीण होत जाईल. बरेचसे प्रदूषण ही माणसांमुळेच निर्माण होतात, ती आपण नियंत्रित करू शकतो.

संबंधित पोस्ट -  पृथ्वी बोलू लागली तर...

पेट्रोल हा मुख्य करून बऱ्याच गोष्टींचा ऊर्जेचा स्त्रोत आहे. जर पेट्रोलच संपले तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे स्त्रोत निर्माण होणार नाहीत. पेट्रोलचा आपण अप्रत्यक्षरीत्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो तो कसा हे बघूया.

आपण जेव्हा केव्हा औषधे बनवतो, त्यात देखील पेट्रोलचा वापर करतात. जर पेट्रोलच संपले तर खूप सारी औषधे तयारच होणार नाहीत. औषधे नसतील तर त्या आजाराचे निदान होणार नाही आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल.

तसेच शेतीच्या कामांसाठी देखील पेट्रोलचा अप्रत्यक्षरीत्या वापर होतो. शेतीला कीटकनाशके लागतात म्हणजेच ‘पेस्टिसाइड’ चा वापर आपण करत असतो त्यातही पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

तसेच बरेचसे केमिकल इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे ‘फायबर प्लास्टिक’ किंवा ‘केमिकल फर्टीलायझर्स’ या गोष्टींसाठी देखील पेट्रोलचा वापर आपण मोठ्या प्रमाणावर करतो.

पेट्रोलचा वापर अप्रत्यक्षरीत्या घरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो, उदाहरणार्थ डिटर्जंट, कपडे धुण्याचा साबण आणि पावडर तयार करत असताना मोठ्या प्रमाणावर पेट्रोलचा वापर केला जातो. तसेच आपण हिवाळा आला की जे व्हॅसलीन लिक्विड लावतो किंवा व्हॅसलीन जेली वापरतो त्या व्हॅसलीन मध्ये सुद्धा पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असतो. त्याच्या पॅकवर तर ‘पेट्रोलियम जेली’ असे लिहिलेले देखील असते.

त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या खूप गोष्टींमध्ये पेट्रोलचा वापर करत असतो. आपण हाताला जे वॅक्स लावतो त्यामध्ये देखील पेट्रोलचा वापर असतो. केरोसीन, गॅस्ट्रो लाइटिंग आणि बाकीच्या गोष्टींसाठी देखील पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सर्वसामान्यपणे पेट्रोल कडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा असतो की, वाहतूक आणि दळणवळण हे सुखकर होते, परंतु ते सोडल्यास एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे आपण त्याचा नीट वापर करणे अत्यंत गरजेचे आहे, नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *