वेळेचे महत्व

Featured Image- veleche mahatva essay in marathi

वेळेचे महत्व

आपण आपल्या आयुष्यात वेळेला महत्त्व दिलेच पाहिजे. जर वेळ निघून गेली, आपण वेळेची नीट किंमत ठेवली नाही, तर वेळ देखील आपली किंमत ठेवत नाही. एखादी गोष्ट दहा दिवसात पूर्ण करणे खूप गरजेचे असते, आपण दहा दिवस नुसता टाईमपास करून तो वेळ सत्कारणी लावत नाही. मग 11 व्या दिवशी आपल्याला आठवण होते, ‘अरे ही गोष्ट आपल्याकडून करायचीच राहिली’! परंतु ते गेलेले दहा दिवस आपण परत आणू शकत नाही. त्यामुळे ते जे दहा दिवसात करायचे काम आहे ते सगळे आपण अकराव्या  दिवशीच पूर्ण करू शकतो. म्हणजेच काय एकदा आपल्या हातातून वेळ निघून गेली, की ती गोष्ट माणूस परत कधीच आणू शकत नाही. वेळ ही एकमेव गोष्ट आहे ज्याला माणूस थांबवून ठेवू शकत नाही किंवा माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेरची ही गोष्ट आहे.

वेळेला महत्व न देता, जर आपण वेळेची किंमत ठेवली नाही तर वेळ निघून जाते आणि आपण काहीच करत नाही. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा, आपल्या हातात आलेली संधी आहे त्याचे सोनं करणे जास्त महत्त्वाचा आहे.

शाळेत असल्यापासून या गोष्टी आमच्या बाई नेहमीच समजवायच्या. पण आम्ही कधीच या गोष्टींना महत्त्व दिले नाही. परीक्षा उद्या असेल तर आज अभ्यास करणे! गृहपाठ सुद्धा एक दिवस आधीच पूर्ण करायचे! त्यासाठी रात्रभर जागायचे आणि ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी मग शरीरातील पित्त वाढते, उलटी होते, झोप पूर्ण होत नाही, अंगात शक्ती उरत नाही अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

खेळांमध्ये वेळेला खूप महत्त्व असते. बुद्धिबळ, मैदानी खेळ या सगळ्या खेळांमध्ये प्रत्येक सेकंदा सेकंदाला महत्त्व असते, जर एक सेकंद आपण लक्ष दिले नाही, तर समोरचा व्यक्ती बाजी मारून जाईल आणि आपण हरून जाऊ. त्यामुळे खेळात तर वेळेला खूप जास्त प्रमाणात महत्त्व असते!

जर आपण वेळेला महत्त्व दिले नाही तर, ट्रेन व बसचा प्रवास आपण करू शकणार नाही. कारण ट्रेन ही दिलेल्या वेळेलाच स्टेशनवर उभी असते. आपण एक सेकंद जरी उशीर केला, तर आपल्याला ती ट्रेन मिळणार नाही. बसचे देखील असेच आहे. त्यामुळे ट्रेन निघून न जाऊ देता त्या ट्रेनमध्ये वेळेवर पोहोचणे जास्त महत्त्वाचे असते, वेळेला महत्त्व देणे जास्त महत्त्वाचे असते.

वेळेला जर महत्त्व आपण दिले नाही, तर आपण परीक्षाही देऊ शकत नाही. कारण परीक्षागृहात दहावी-बारावी च्या परीक्षेला बोर्डची एक्झाम असते आणि प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. आपण परीक्षागृहात जरी एक मिनिट उशिरा पोहोचलो, तरी आपल्याला पेपर देण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे परीक्षागृहात वेळेवरच जावे.

तसेच ऑफिसचे देखील आहेत. जर आपण ऑफिसला वेळेवर पोहोचलो नाही आणि रोज रोज उशीर करायला लागलो. वेळेला किंमत दिली नाही तर एक दिवस आपला जॉब निघून जाईल.

एक नाही अनेक उदाहरणे आहेत, जर आपण शाळेत वेळेवर पोहोचलो नाही तर आपला अभ्यास होणार नाही, जर आपण अपघात झालेला असताना हॉस्पिटलला वेळेवर पोहोचलो नाही तर आपला जीव देखील गमावू, जर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये वेळेवर पोहोचले नाहीत तर तो रुग्ण मरण्याची शक्यता असते, जर शेगडी वेळेवर बंद केली नाही तर एखादा पदार्थ खराब होऊ शकतो. कंपन्यांमध्ये वेळेला महत्त्व असते, जर एखादे केमिकल आपण दिलेल्या वेळेत बंद केले नाही, तर त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. जेव्हा एखाद्या शेतकरी शेती करतो, तेव्हा पेरणीसाठी जर वेळेवर बियाणे टाकली नाही आणि नुसते खोदून ठेवले तर त्याच्या शेतीचे मोठे नुकसान होते. म्हणजेच काय तर माणसाचे संपूर्ण आयुष्य हे वेळेपासून सुरू होऊनच वेळेवरच संपते!

म्हणून माणसाला सतत घड्याळाच्या काठावर चालायला लागते. आपण किती वाजता उठायचे? काय करायचे? किंवा ऑफिसला जायचे? हे सगळे आपण वेळ बघूनच ठरवतो. म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे.

तसेच आपण जर वेळ पाळली नाही तार आपली छाप लोकांवर पडत नाही. हा माणूस कायम उशिरा येतो, असा शिक्का आपल्यावर लोक बसवतात आणि हे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी चांगले नाही.

आपले आयुष्य हे वेळेवर जन्माला येऊन सुरू होते आणि शेवटी जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा लोक म्हणतात की आहो त्याची वेळ आली होती असं म्हणून आपले जीवन संपते म्हणूनच काय आपल्याला वेळेला महत्व देणे खूप गरजेचे असते.

आणि वेळ माणसाला खूप काही गोष्टी देखील शिकवून जाते माणूस परिस्थिती समोर अनेकदा हातबल होतो परंतु सकाळी लोटतो तसतसे सगळ्या गोष्टी नीट व्हायला लागतात. आणि म्हणूनच आपण वेळोवेळी वेळेला महत्व देणे गरजेचे आहे. जर आपण व्यवस्थित वेळ पाळणारे पंक्चुअल  असे असू, तर आपल्याला देखील स्वतः बाबत फार बरे वाटते. वेळेवर जर सगळी कामे पूर्ण झाली तर आपल्याला कोणत्याही गोष्टींचा मानसिक ताण उरत नाही. आपले आरोग्य चांगले राहते, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहणे हे एक चांगल्या नागरिकाचे, चांगल्या शरीराचे लक्षण असते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *