सौर ऊर्जा निबंध

‘सौर ऊर्जा’ म्हणजे काय? तर सूर्यापासून मिळणारी उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला ‘सौर ऊर्जा’ असे म्हणतात. सौर ऊर्जा ही अनेक गोष्टींसाठी सध्याच्या काळात वापरली जाते.

कारण अती वापरामुळे अनेक इंधने आणि बाकीच्या गोष्टींचा सध्या पृथ्वीवर असणारा साठा संपत चालला आहे. म्हणूनच सौर ऊर्जा हा त्याला एक उत्तम पर्याय आहे.

सूर्याकडून मिळणारा प्रकाश आणि सूर्यकिरणांचा योग्य वापर करून एक उर्जा बनवली जाते. त्या उर्जेचा वापर वेगवेगळ्या उपकरणांमध्ये केला जातो. यालाच सौर ऊर्जेचा योग्य वापर असे म्हणतात.

आपण सौर ऊर्जेचा वापर कधीपासून करायला लागलो? मुळात सूर्यापासून मिळणाऱ्या शक्तीचा अशाप्रकारे वापर करू शकतो, हे कधीपासून समजले?

सगळ्यात सुरुवातीला एडमंड बेकरेल या फ्रेंच शास्त्रज्ञाने पहिल्यांदा १८३९ यावर्षी सौर ऊर्जा उपयोगात आणली. म्हणजेच सौर ऊर्जेचा वापर आपण उपकरणांमध्ये करू शकतो याचा शोध त्यांनी लावला.

त्यानंतर अनेक युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचे पॅनल्स उभारले गेले. पण ते पॅनल्स आजच्या पॅनल पेक्षा खूप वेगळे होते. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बल्ब आणि छोटी उपकरणे चालवून पाहिली. ती उपकरणे व्यवस्थित चालू लागल्यावर मग मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर उपकरणांसाठी व्हायला सुरुवात झाली.

आता त्याचा वापर एवढा वाढला आहे की, ‘इस्त्रो’ आणि ‘नासा’ यांसारख्या संघटना त्याचा वापर अगदी मोठ्या-मोठ्या यानांमध्ये देखील करतात. जे यान चंद्रावर सोडले जाते, अशा यानांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

सध्याच्या काळात पृथ्वीवर सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर का वाढला आहे?

तर सध्याच्या काळात आधुनिकीकरणामुळे पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचा खूप वापर होऊन त्यांच्या किमती गगनाला पोहोचल्या आहेत. खूप जास्त प्रमाणावर इंधन पूर्वीपासून वापरात आल्यामुळे आता त्याचा साठा खूप कमी झाला आहे. त्यामुळे आता असणाऱ्या मर्यादित साठ्यामुळे त्याच्या किमती या खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत.

तसेच आता पृथ्वीवर इंधनांचे खूप कमी स्त्रोत उपलब्ध आहेत. इंधनाच्या अतिवापरामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंगची’ देखील भीती खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

इंधनांमुळे होणारे प्रदूषण आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण करत आहे. जर अशाच प्रकारे आपण इंधनांचा अति वापर करत राहिलो, तर पृथ्वी नष्ट व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. थोड्याच वर्षांमध्ये पृथ्वीचा नाश व्हायला सुरुवात होईल. म्हणूनच हे सर्व थांबवायचे असेल, तर सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा सोलर बल्बसारख्या गोष्टी वापरात आणणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारतीय सरकार द्वारा अनेक गोष्टींमध्ये सध्या सौर ऊर्जेचा वापर केला जातो.

सगळ्यात मोठा बदल आजकाल आपल्याला अशा गोष्टींमध्ये दिसतो, की नवीन तयार होणाऱ्या प्रत्येक बिल्डिंग वरती सोलर पॅनल असतेच. त्यामुळे सोलारचे गरम पाणी त्या इमारतींमध्ये वापरले जाते जेणेकरून गॅस गिझर किंवा इलेक्ट्रॉनिक गिझर याची गरज त्या माणसांना पडत नाही. त्यामुळे इंधनाची बचत होते. सोलार वर चालणारी उपकरणे व त्यातून निर्माण होणारी वीज ही छोट्या-छोट्या उपकरणांमध्ये वापरली जाते.

प्रदूषण किंवा संपणारे इंधनाचे साठे या सगळ्या वर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवर आपण अवलंबून राहू शकतो. कारण भारताची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे एवढ्या लोकसंख्येला इंधन पुरवायचे म्हणजे सौर ऊर्जेचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.

सौर ऊर्जेचे काय – काय फायदे आहेत?

सौर ऊर्जेमुळे अन्न शिजवता येते. तसेच अशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यामध्ये रूपांतर करता येते. सौर ऊर्जेचा शेतीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये देखील सोलार पॅनल्स बसवले जातात. त्यामुळे निर्माण होणारे इंधन हे शेतीसाठी वापरले जाते.

सोलर पॅनल चा उपयोग हॉटेल्स मध्ये, घरी मोठ्या प्रमाणावर करतात. हॉटेल्स मध्ये देखील मोठ्या मोठ्या कामांसाठी लागणारे इंधन हे सोलर पॅनल मुळेच मिळते.

हॉटेलमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर गरम पाणी लागते. हे गरम पाणी सोलार मुळेच बऱ्याचशा हॉटेलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये देखील अनेक उपकरणांमध्ये सोलार पॅनलचीच ऊर्जा वापरली जाते.

मोठमोठ्या औद्योगिक ठिकाणी देखील सोलार चा वापर करून अनेक उपकरणे चालवलली जातात. सोलार मुळे विद्युत निर्मिती व्हायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

सौर ऊर्जेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे, की याने पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. सौर ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण होत नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत. इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते.

सौर ऊर्जेचे फायदे आपण आतापर्यंत बघितले पण प्रत्येक गोष्टीमध्ये फायदे आणि तोटे असतातच. तसेच सौर ऊर्जेचे देखील काही तोटे आपल्याला आढळून येतात.

ते म्हणजे फक्त दिवसा सौर ऊर्जेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. विद्युत निर्मिती दिवसा होते, रात्री होत नाही. कारण सूर्य मावळल्यावर विद्युत निर्मितीची प्रक्रिया देखील मंदावते.

विद्युत उपकरणांना सौर ऊर्जा जोडलेली असते आणि त्याचा दाब कमी-जास्त होतो. त्यामुळे विद्युत उपकरणे खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात किंवा कधी-कधी ढग असल्यावर किंवा ऊन नसतांना या उपकरणांचा काहीच वापर होऊ शकत नाही. तसेच उन्हाळ्यात खूप ऊन असल्यावर उपकरणांवरील दाब वाढतो आणि उपकरणे खराब होतात. तरीदेखील अती वापर आणि बाकीच्या गोष्टींमुळे सध्या पृथ्वीवर असणारा इंधन साठा संपत चालला आहे. म्हणूनच सौर ऊर्जा हा त्याला एक उत्तम पर्याय आहे. अशाप्रकारे सौर ऊर्जा आपल्या आयुष्यात खूप बदल निर्माण करते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *