शेतकरी जगाचा पोशिंदा निबंध

भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे आपल्यासाठी पर्यावरण, शेती हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे घटक आहेत. तसेच भारताची भौगोलिक परिस्थिती देखील खूप चांगली आहे. आपली जमीन आणि माती बाकीच्या देशांपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणूनच भारताला ‘कृषिप्रधान’ देश असे म्हणतात. पण ही कृषी कोण बरे सांभाळते?

तरी ही कृषी किंवा आपली जमीन खूप कष्टाने करतात ते म्हणजे आपल्या भारतातले ‘शेतकरी’!

भारतात असू दे किंवा जगात असू दे शेतकरी हा पर्यावरणातील आणि एकूणच जगातील एक महत्त्वाचा घटक आहे!

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते, कारण शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून धान्य पिकवतो आणि भारतातील 80 टक्के लोक शेती करतात. तसेच शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पादनावरूनच शेतकऱ्याची उपजीविका चालते. जर शेतकऱ्यांनी शेतीत केले नाही आणि अन्न-धान्य पिकवलेच नाही तर बाकी सगळ्यांचे पोट भरणे कठीण होऊन जाईल.

रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो, शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके नीट चालतात. भारतातील अर्थव्यवस्था ही शेती उद्योगाशी निगडित आहेत. भारतीय समाज व्यवस्थेत शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेती वरतीच आपले सगळे उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते.

शेतकरी आणि शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदीमानवांच्या विचारातून आणि स्त्रियांच्या लागवड तंत्रातून झाला.

अश्मयुगात इतिहासाचे फक्त शिकारीचे अवशेष सापडतात, परंतु जसजसे आपण अश्मयुगात प्रगती करत गेलो, तसे आपण शेती करू लागलो. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात.

भारतात पूर्वी शहरी भाग खूप कमी असल्याकारणाने आणि बरेचसे लोक शेतीवरतीच आपली उपजीविका चालवत असल्याने भारताला ‘कृषिप्रधान’ देश असे नाव पडले.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सगळ्यात पहिले लागते ती सुपीक जमीन आणि काळी माती. जर माती तेवढी सुपीक नसेल तर शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर करून आपली शेती पूर्णत्वास नेतो.

तसेच ‘पाणी’ हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. शेतीला जर मुबलक पाणी असेल तर शेती करणे शक्य आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मनुष्यबळ’. जर शेतात पिकांची नीट निगा राखायला मनुष्यबळच नसेल तर शेती करणे खरच मुश्किल आहे. चौथा घटक म्हणजे ‘बाजारपेठ’ ज्यातून शेतकऱ्याला भांडवल मिळते. शेतकऱ्यांसाठी तशी शेतीच सगळं काही असते, त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो आणि शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ ही देखील खूप महत्त्वाची असते. त्यांनी केलेल्या एवढ्या कष्टाचे चीज हे त्या बाजारपेठांमध्येच ठरते.

तसेच शेतीसाठी लागणारी महत्त्वाची उपकरणे शेतकऱ्याला वारंवार बदलावी लागतात. कोणती गोष्ट खराब झाली असेल तर ती बदलून नवीन घ्यावी लागते. तसेच शेतकऱ्यांचे मित्र म्हणजे ‘गाय, बैल, म्हैस, रेडा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाशा, कोंबड्या, शेळ्या आणि गांडूळ’. तसेच शेतकऱ्याचा दुश्मन म्हणजेच ‘उंदीर’ जो पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो.

शेतकऱ्यांपासून अन्न मिळते. शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या संकटांना झेलावे लागते. पिकांचा हंगाम असतो, रब्बी पिके असतात, त्यानुसार त्यांना पिके घ्यावी लागतात. त्यात काही चूक झाली तर त्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान होते.

तसेच शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘माती’ असते. पेरणी करायच्या आधी शेतकऱ्याला मातीची खूप जास्त तयारी करावी लागते. वेगळे खत तयार करावे लागते. तसेच पाण्याची देखील मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करावी लागते.

पाण्यासाठी परत विहीर आहे की नाही ,जर विहीर नसेल तर सिंचनाद्वारे पाणी सोडले जाते. त्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. ‘ठिबक सिंचन’ हे त्यातलाच एक भाग आहे. तसेच खुरपणी, कापणी यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतात. कापणी झाल्यावर ती सगळ्यात महत्त्वाचे काम असते, ते म्हणजे धान्य वेगळे करणे! ते धान्य पाखडून घेऊन व्यवस्थित वेगळे करावे लागते. कापूस असेल तर कापसाचेही कापडीनंतरचे काम खूप मोठे असते. उन्हातानाचे दिवसभर काबाडकष्ट करून ते एक धान्य उगवतात. तसेच सध्याच्या आधुनिक काळामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. कोणत्याही महिन्यात सध्या पाऊस पडतो ऊन प्रचंड वाढते. कधी थंडी वाढते या सगळ्यांचा परिणाम पिकांवर रोजच्या रोज होत असतो. अशा वेळेला जर आपण शेतीची नीट काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो.

तसेच शेतकऱ्याला सतत सतर्क रहावे लागते. कोणत्या पिकाची मागणी जास्त आहे, त्याचा त्याला अभ्यास करावा लागतो. दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांना काम करावे लागते. पाण्याच्या एकी खंडासाठी त्यांना मुलुंड मैल चालत जाऊन पाणी आणावे लागते, सगळ्यात जास्त कष्टाचे काम हे शेतकऱ्याचेच असते. तसेच एकूणच शेतीची सगळी कामे ही त्यांना करावी लागतात. माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा अन्नाचा असतो. माणसाच्या या मूलभूत गरजा आहेत, तशाच प्राण्यांच्या देखील मूलभूत गरजा याच आहेत. त्यामुळे शेतकरी खरंच जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला भारतातच नव्हे तर जगात देखील पोशिंदाच म्हटले जाते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *