ऑनलाइन शिक्षण शाप की वरदान निबंध

ऑनलाइन शिक्षण पद्धती ही सर्वप्रथम भारतात आणि जगात कोविड च्या काळापासून वापरायला सुरुवात झाली. याआधी सुद्धा ऑनलाईन शिक्षण पद्धती ही संकल्पना होती, पण कोणी त्याला जास्त महत्त्व दिलेले नव्हते. कारण भारतामध्ये अगदी गुरुकुल पद्धती पासून शिक्षण घेण्याची पद्धत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजेस म्हणजेच महाविद्यालयाचे आणि विद्यापीठांची स्थापना झाली. एकूणच भारतीय शिक्षण पद्धती ही कधीच ऑनलाईन शिकवण अभ्यास करायचा अशा पद्धतीची नव्हती, रोज शाळेत जाऊन शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ करणे, स्वतःचा अभ्यास नीट करणे अशा पद्धतीचे शिक्षण गेल्या कित्येक वर्षात भारतात चालू आहे. परंतु या कोविड महामारीमुळे भारतातच नाही तर जगात ऑनलाइन शिक्षण पद्धती ही वापरायला सुरुवात झाली.

त्याचे कारण असे की या महामारीमुळे लोकडाऊन जाहीर झाले आणि लॉकडाऊन च्या काळात रस्ते बंद आणि अनेक निर्बंध लागलेले होते, त्यामुळे शिक्षण पद्धती किंवा शिक्षण संस्था थांबवू शकत नाहीत. म्हणून ऑनलाईन हा त्याला एक महत्त्वाचा पर्याय ठरला.

लॉकडाऊन च्या काळात साध्या जगण्याच्या गोष्टींसाठी सुद्धा धडपड करावी लागत होती, त्यावेळेला खरंच ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे एक वरदान शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देखील मिळाले! कारण या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही घरबसल्याच परीक्षा ही देऊ शकत होतात! त्यामुळे मुलांची वर्षे वाया गेली नाहीत. काही मुले तर कोविडशी झुंज देत हॉस्पिटल मधून परवानगी घेऊनही लेक्चरला बसायची, कारण दुसऱ्या कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता! बरेचसे शिक्षकही काही दिवस शाळांमध्ये जाऊन ऑनलाईन वर्ग घ्यायचे, परंतु काही काळाने जेव्हा लोकडाऊन फार जास्त मोठ्या प्रमाणात वाढले तेव्हा शिक्षकांनी घरी राहूनच शिकवण्याचा निर्णय घेतला.

या ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक नवनवीन अँप्स मार्केटमध्ये येऊ लागले, तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक लोकांचे जॉब देखील वाचले. आपण नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करायचे? हे देखील याच काळात शिकलो!

ऑनलाइन मुळे जगातील भौतिक गोष्टीचे बंधन राहिले नाहीत, म्हणजेच काय तर इंटरनेटमुळे जग फार जवळ आले आणि जर एखादा कोर्स भारतात उपलब्ध नाहीये, पण तोच कोर्स जर भारताबाहेर अमेरिकेत उपलब्ध आहे तरी देखील विद्यार्थी तिकडून शिकत आहेत!

ऑनलाइन शिक्षण पद्धती ही फार सोपी पद्धत आहे, यात आपण इन्फ्रास्ट्रक्चर देखील वाचू शकतो. प्रत्येक जण आपापल्या घरी बसून व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतो.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तके देखील ‘इकोफ्रेंडली’ आहेत, म्हणजेच काय तर आपण पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता पुस्तकांचे पीडीएफ डाऊनलोड करून पुस्तके वाचून परीक्षा देऊ शकतो. यातून आपण निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास वाचवू शकतो.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला, तो असा कि जे मुलेमुली शिक्षण पूर्ण करू शकत नाहीयेत किंवा जे नोकरी करत आहेत, त्यांना पुढचे शिक्षण घेता येत नाहीयेत अशा विद्यार्थ्यांना तसेच गृहिणींना काम संपवून नवीन गोष्टी शिकायला एक नवीन सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला आणि नवनवीन गोष्टी देखील शिकले.

त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘आयटी इंडस्ट्री’ म्हणजे ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ इंडस्ट्रीचे भारतात खूप मोठे मार्केट आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाइन भारतात सुरू झाल्यामुळे या मोठ्या वर्गाचे नुकसान होण्यापासून आपण वाचवले. कारण तेवढे लोकं बेरोजगार झाले असते, तर भारताचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते.

या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये अजून एक पर्यावरणाला चांगला असा मार्ग म्हणजे वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे इंधनाची बचत खूप मोठ्या प्रमाणावर होत होती. प्रदूषणही खूप कमी झाले होते.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे खूप फायदे झाले पण थोडेसे तोटेही आपल्याला त्याच्या बरोबरीने बघायला मिळतात.

जी लहान मुले आहेत त्यांना डोळ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या! लहान वयात अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना पाठीच्या कण्याचे विकार दिसून येत आहेत, मुलांना आता बोलण्याची सवय राहिली नाहीये, कारण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे ते एकलकोंडे झाले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी घरीच बसल्यामुळे अंतर्मुख देखील झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शाळेतील शिक्षकांचा काही धाकच मुलांना उरलेला नाही! त्यामुळे मुलांवर ज्या वयात जे संस्कार व्हायला हवेत ते संस्कारही होत नाहीयेत. या ऑनलाइन शिक्षण पद्धती ‘शाप’ आहे की ‘वरदान’? असा प्रश्न पडल्यावर त्याचे फायदे जास्त झाले. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती हे भारतासाठी आणि जगासाठी खरंच एक वरदान ठरले आहे!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *