मी पाहिलेला किल्ला निबंध मराठी

Featured Image - mi pahilela killa marathi nibandh

मी पाहिलेला किल्ला निबंध मराठी

मी पाहिलेला किल्ला हा ‘लोहगड आणि विसापूर’ आहे. मुळात किल्ला म्हणजे काय? तर किल्ला म्हणजे ‘समुद्राच्या उंचापासून वर असलेला डोंगर होय!’ डोंगरातच वसलेला पण थोडासा वेगळा, असा प्रकार म्हणजेच गड. त्यालाच दुसरे नाव किल्ला आहे.

मुळात महाराष्ट्र आणि गडकिल्ले या दोघांचे अत्यंत घनिष्ठ नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गडकिल्ल्यांचे महत्त्व हे महाराष्ट्रात रुजू झाले, ते आजपर्यंत तसेच टिकून आहे.

महाराजांनी गडकिल्ल्यावरती राहूनच ‘मराठा साम्राज्य’ वाढवले. संपूर्ण साम्राज्य उभे केले आणि गडकिल्ल्यांमुळेच ते आज टिकून आहे.  आजकालची पिढी गडकिल्यांबद्दल, त्यांच्या साफसफाई बद्दल आणि एकूणच सगळ्या गोष्टींबद्दल खूप महत्वाकांक्षी झालेले दिसते.

खरे सांगायचे झाले तर, मी ट्रेकिंगला खूप घाबरते. परंतु माझ्या मित्राने मला गडकिल्ल्यांवर का गेला पाहिजे? हे समजावले. आपल्याला गडकिल्ले चढल्यावर किती आनंद होतो? त्याचा अनुभव सांगितला. आपल्यातली शारीरिक क्षमता आपल्याला समजते. एवढे सगळे कळल्यावर मग मला ही गड किल्ल्यांवर जावेसे वाटले. खूप कष्टांवर मात करून, जेव्हा आपण गड किल्ल्याच्या टोकावर पोहोचतो तेव्हा आपल्यातील आत्मविश्वास देखील मोठ्या प्रमाणावर वाढतो. कारण गडकिल्ले चढणे हे काही सोपे काम नाही! काट्याकुट्यातून, जंगलातून वाट काढून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत न थकता, न दमता आणि न डगमगता पोहोचायचे असते. हीच गडकिल्ल्यांची खासियत असते. या सगळ्या गोष्टी त्याने मला समजावून सांगितल्या.

मुळात गड किल्ल्यांवर आपला इतिहास जाणून घेण्यासाठी गेले पाहिजे. प्रत्येक गड एका इतिहासाचा साक्षीदार आहे. आणि इतिहासाच्या अनेक पाऊल खुणा आपल्याला गडकिल्ल्यांवरतीच सापडतात. म्हणूनच माझा आवडता गड किल्ला लोहगड आणि विसापूर आहे.

आपण आपली परंपरा जपण्यासाठी देखील गडकिल्ले फिरावेत. आणि आपला इतिहास जाणून घ्यावा.

गडकिल्ल्यांवर जाण्याची उत्तम वेळ म्हणजे ‘पावसाळा आणि हिवाळा ऋतू’. शक्यतो उन्हाळ्यात गडकिल्ल्यांवर जास्त जात नाहीत, कारण किल्ल्यावर राहण्याची तशी काही सोय नसते. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात कोणी जास्त गडकिल्ल्यांवर जात नाही.

आम्ही शनिवारच्या दिवशी सकाळी सात वाजता विसापूर किल्ल्यावर चढायला सुरुवात केली. हे दोन्ही किल्ले चढायला खूप सोपे आहेत. आमच्यातील दोन जण गड किल्ल्यांवर चढणारे नवशिके होते. त्यांच्यासाठीच आम्ही या दोन किल्ल्यांची निवड केली होती. विसापूर हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यापासून साधारण नऊ ते दहा किलोमीटर अंतर पार केले, की मळवली रेल्वे स्टेशन जवळ हा किल्ला आहे.

आम्ही मुंबई-पुणे लोकलने आलो होतो. त्यामुळे आम्ही मळवली स्टेशनला उतरलो. तिकडून दुचाकी घेऊन सर्वजण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ल्याकडे येतानाचा रस्ता थोडा अरुंद आहे.

समुद्राच्या भूभागापासून साधारण 1084 मीटर उंचीवर असा हा किल्ला आहे.  हा किल्ला १७१३ ते १७२० यादरम्यान ;बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवा’ यांनी बांधला. मराठ्यांच्या काळात लोहगड हा आधी बांधून पूर्ण झाला आणि मग विसापूर हा किल्ला बांधला गेला. दोन्ही किल्ले खूप जवळ-जवळ असल्याने ते जणू एकमेकांचे जुळे भाऊच वाटतात.

लोहगड आणि विसापूर या दोन्हींमध्ये बघायला गेले तर विसापूर किल्ला उंचीला थोडा मोठा आहे. विसापूर किल्ल्याच्या वरती गुफा आहेत, धबधबे आहेत, जुनी दगडात बांधलेली घर आहेत, तुळशी वृंदावन आहे तसेच हनुमानाच्या चित्राचे कोरीव काम देखील केलेली आहे. याचे बुरुज देखील खूप जुने आहेत आणि त्याचे बांधकाम खूप छान पद्धतीने केले असल्याने आज इतकी वर्ष झाली तरी या किल्ल्याला काहीही झालेले नाहीये!

गडाच्या पायथ्याशी सुरू होणारा रस्ता तसा सोपा आहे, परंतु उतरतानाचा रस्ता मात्र आम्हाला थोडा कठीण गेला. कारण चढताना पाऊस वगैरे काही नव्हता त्याच्यामुळे आम्ही पटापट वर चढत गेलो, फक्त एक ठिकाण असे आले की जिथे तुम्ही अगदी नीट लक्ष देऊन चढाई करणे गरजेचे होते. कारण खाली खोल दरी होती तुमचे एक चुकीचे पाऊल तुम्हाला मरणाच्या दारात आणून ठेवणार. हाही अजून एक गडकिल्ले चढण्याचा फायदा असतो की तुमची एकाग्रता वाढते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि अति बिकट काळात तुम्ही कसे वागतात? किंवा कसे वागायला पाहिजे? याची माहिती तुम्हाला कळते.

विजापूर दुर्गचा खूप मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांकडून पुरंदरच्या तहात देऊन टाकावे लागले होते. परंतु खूप मोठ्या अतोनात प्रयत्नांनी महाराजांनी या गडाला परत काबीज केले 1670 मध्ये. या गडकिल्ल्यांचे खूप महत्त्व आहे कारण हा किल्ला आपल्या हातून जाऊ न देणे हे महाराजांचे स्वप्न होते आणि त्यांनी ते पूर्ण केले. मग त्यानंतर १७१३ रोजी ‘बाळाची विश्वनाथ पेशवा’ यांनी हा किल्ला व्यवस्थितरित्या बांधला. या गडकिल्ल्यांचा वापर ‘नाना फडणवीस’ यांनी सुरतच्या सुटकेनंतर केला होता. आपल्याला या किल्ल्यावर अनेक इतिहासाचे अवशेष आजही दिसतात म्हणूनच हा किल्ला मला खूप आवडतो!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *