महाराष्ट्र राज्य हे भौगोलिक दृष्ट्या खूप मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा खूप जुना आहे. महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या मोठ्या नद्या वाहतात. तसेच सह्याद्री सारख्या पर्वतरांगा देखील महाराष्ट्रामध्येच आहेत.
“जय जय महाराष्ट्र माझा” म्हणता आपण महाराष्ट्राचे कौतुक सुरू करूया! महाराष्ट्र राज्य हे खरंच कौतुकास्पद राज्य आहे. एक तर महाराष्ट्रात विविध प्रकारची शहरे आहेत, एकीकडे ‘मुंबई’ भारताची आर्थिक राजधानी आहे तर दुसरीकडे ‘नागपूर’ उपराजधानी आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक भाषेचे विविध लोक एकत्र राहतात. विविधतेला घेऊन चालणारी अशी आपली महाराष्ट्र राज्याची जनता आहे.
भारतातील अनेक भागातून लोक येऊन महाराष्ट्रात आपले स्थान प्रस्थापित करतात. मोठी मोठी स्वप्न बघून मुंबईत लोक येतात. एवढेच काय तर, आता पुण्याने देखील त्याच्या पाठोपाठ नंबर लावला आहे. सध्या आयटी क्षेत्रात खूप जास्त मागणी असल्याने, आयटी क्षेत्रातले बरेचसे लोक पुण्यात येऊन स्थायिक होतात. बेंगलोर नंतर पुण्याचा नंबर आयटी कंपन्यांसाठी लागतो!
महाराष्ट्राचा इतिहासही खूप जुना आहे. नद्या, पर्वतरांगा याचा इतिहास प्राचीन ग्रंथामध्ये सापडतो. इथे बरेच राजे येऊन राज्य करून गेले. अगदी सगळ्यात जुनी ‘मगध’ राजवट असू देत नाही तर मुघल, निजामशाही, किंवा अगदी पोर्तुगीज असू देत! सगळ्यात शेवटी महाराष्ट्रावर राज्य केले ते ब्रिटिश लोकांनी. परंतु मराठी माणसांनी महाराष्ट्र कायम जपला. त्याला संपुष्टात येऊ दिले नाही. हे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, की परकीय आक्रमणे होऊन सुद्धा महाराष्ट्र राज्य जसे होते तसेच आहे!
जेव्हा कोणतीही बिकट परिस्थिती येते. तेव्हा सगळे महाराष्ट्रातले लोक एकत्र येऊन, आपल्या राज्यावरचे संकट धुडकावून लावतात! हीच महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ताकद आहे.
महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागातले एक महत्त्वाचे राज्य आहे. जे सध्या ‘विकसनशील’ राज्य आहे. महाराष्ट्राचा सतत विकास चालूच असतो. कधी रस्ते निर्मिती चालू असते, तर कधी नवीन कारखाने उघडणे, कधी नवीन युनिव्हर्सिटी ची स्थापना करणे, तर कधी नवीन शाळा काढणे. महाराष्ट्र हा सतत कोणत्या ना कोणत्या नवीन उलाढाली मध्ये सहभागी होत आहे.
महाराष्ट्राच्या सीमा या गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा व कर्नाटक या राज्यांना जोडलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या बाबतीत देखील भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वेगवेगळ्या प्रकारचे नोकऱ्या देणे हे देखील एक जोखमीचेच काम आहे! एक तर महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या देखील खूप मोठा असल्याकारणाने येथील लोकसंख्या देखील प्रचंड प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील सगळेच माणसे कामासाठी कायम तत्पर असतात.
भारताची आर्थिक राजधानी देखील महाराष्ट्रातच आहे ती म्हणजे ‘मुंबई’.आणि महाराष्ट्राची राजधानी देखील मुंबईच आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती देखील खूप वेगळी आहे. एका ठिकाणी समुद्राने वेढलेले परिसर आहेत तर दुसऱ्या ठिकाणी डोंगरदर्यांनी व्यापलेला सह्याद्री आहे!
संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा व इतर या सगळ्यांनी महाराष्ट्रात संत आणि धर्माचे एकूणच खूप काम केलेले आपण बघतो. पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.
महाराष्ट्र हे नाव प्राकृत भाषेतील आहे जे ‘महान राष्ट्र’ म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात अनेक विविध प्रकारचे लोक राहतात, त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राचे मराठी भाषा जरी असली तरी सुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, बंगाली, पंजाबी, गुजराती या सगळ्या भाषा बोलल्या जातात.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कोणताही एकच धर्म नसल्याने सर्व धर्मातील लोक एकत्र राहतात. महाराष्ट्रातील हिंदू, बुद्ध, जैन, मुस्लिम, शिख, पारसी या सगळ्या धर्मातले लोक आहेत.
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले आहेत, जे आपण फार पूर्वीपासून नीट जतन करून ठेवलेले आहेत. तसेच काही महत्त्वाची मंदिरे देखील आहेत उदाहरणार्थ जेजुरी, त्र्यंबकेश्वर, सिद्धिविनायक.
महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची शहरे देखील आहेत. उदाहरणार्थ ‘मुंबई’ देशाची आर्थिक राजधानी आहे, जिथे सगळ्यांना मुबलक प्रमाणात नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच ‘पुणे’ हे विद्यापीठ किंवा ‘विद्येचे माहेरघर’ आहे. जिथे सगळ्या प्रकारचे कॉलेज, युनिव्हर्सिटी आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन देखील पुण्यात केले जाते. ‘नागपूर’ विदर्भ भागातील सगळ्यात मोठे शहर आहे, तसेच महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे. ‘नाशिक’ हे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. असेच कोल्हापूर, अमरावती, सातारा, नांदेड हे सगळेच शहर वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाची आहेत.
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती देखील प्रचंड वेगळी आहे. येथे आपल्याला साउथ इंडियन, गुजराती, बंगाली, महाराष्ट्रीयन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकारच्या विविध खाद्यपदार्थ अगदी सहज उपलब्ध होतात! तसेच महाराष्ट्रात सगळे सण उत्सव साजरी केले जातात.
महाराष्ट्रात मुंबई बॉलीवूड साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्या नट नट्यांची रेलचेल आपण महाराष्ट्रात सतत होताना बघतो. तसेच सिनेमा नाटक या सगळ्यांसाठी महाराष्ट्र ही एक मोठी इंडस्ट्री आहे.
एकूणच काय तर मुंबईसारख्या मॉडेल शहरात राहणारी लोक सुद्धा महाराष्ट्रात राहतात आणि आपण पंढरपूर सारखे आराध्य दैवत सुद्धा महाराष्ट्रात आहे. मला आपले महाराष्ट्र राज्य खूप आवडते.