प्राण्यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे ‘पाळीव प्राणी’ आणि दुसरे म्हणजे ‘जंगली प्राणी’. पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा खूप प्राणी असतात. त्यातील काही प्राणी आपण घरी पाळू शकतो. त्यामध्ये कुत्रा, मांजर, ससा, कासव हे सगळे प्राणी सामील आहेत.
परंतु या सगळ्या पाळीव प्राण्यांमध्ये माझा सगळ्यात आवडता पाळीव प्राणी म्हणजे ‘ससा’ आहे. मुळातच ससा दिसायला खूप छान, गुबगुबीत, पांढराशुभ्र असा दिसतो. आकाशातली एखादी चांदणी जमिनीवर उतरावी, असा हा ससा पांढराशुभ्र, लुसलुशीत असतो. सशाला गाजर खायला आणि घरभर पळायला खूप आवडते.
माझ्यासमोरच्या काकूंनी ‘सोनू’ नावाचा ससा पाळला होता. सोनुला खूप लहानपणी त्यांनी त्यांच्या घरी आणले होते. घरी आणल्या-आणल्या ते खूप छोटेसे पिल्लू होते. त्यामुळे सोनूला लहानपणी पिंजऱ्यातच ठेवले जायचे, तो पळून जाईल किंवा त्याला घरच्यांची भीती वाटेल, अशी त्यांना काळजी वाटायची. परंतु जसा-जसा सोनू मोठा झाला, तशी त्यांची भीती कमी झाली. आता त्याला सगळ्या माणसांची इतकी सवय झाली आहे, की तो बाहेर कुठेही जात नाही.
मध्यंतरी काकूंनी सोनुला बाहेर सोडले. तो थोडा वेळ बाहेर बागेत जाऊन परत घरी आला. त्यामुळे काका-काकूंना आता सोनू ची काही चिंता वाटत नाही. कारण जरी तो बाहेर गेला तरी सुद्धा तो परत घरी येतो. त्याला गाजर आणि कोथिंबीर खायला खूप आवडते. सोनू सगळ्या भाज्या खातो. त्याचे कान खूप झोपेदार आहेत, त्याचे दोन दात पुढे आलेले आहेत.
मुळात सशाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे ‘रानटी ससा’ आणि दुसरा म्हणजे ‘पाळीव ससा’. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. पण पाळीव ससे माणूस पाळू शकतो. पूर्वी काही जमातींमध्ये व अजूनही केरळच्या काही भागांमध्ये सशाचे मांस सर्रास खाल्ले जाते. काही भागात सशाचे मांस खायला बंदी घातली आहे. कायदेशीररित्या सशाचे मांस तिथे विकू शकत नाही. परंतु सशाचे मांस खूप मऊ असते, त्यामुळे लोक ते चवीने खातात.
सशाची मादी दहा ते बारा पिल्लांना एका वेळेस जन्म देते. त्यातील काही पिल्ले जिवंत राहतात तर काही पिल्ले थोड्याच दिवसात मरण पावतात. त्यामुळे सशाची मादी आई झाल्यावर आपल्या पिल्लांची खूप काळजी घेते. ती प्रयत्न करते की आपली सगळी पिल्ले जगावी. परंतु काही पिल्लांमध्ये पुरेशी शक्ती नसते त्यामुळे ती मरण पावतात.
सशांचे रंग देखील खूप वेगळे-वेगळे असतात. ससे हे पांढऱ्या, तपकिरी, पिवळट रंगाचे किंवा काळया रंगाचे असतात. काळया रंगाचे ससे सगळ्या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. ते काही ठराविक प्रदेशातच आपल्याला बघायला मिळतात.
ससा हा प्राणी शाकाहारी आहे. तो कधीच मांसाहार करत नाही. ससा हा सगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकतो परंतु कधीही चुकून सुद्धा कोणत्या दुसऱ्या प्राण्याला अगदी कीटकाला देखील ससा कधीच खात नाही. यांसारखे अजूनही जे शाकाहारी प्राणी आहेत, ते कधीच दुसऱ्या प्राण्याची शिकार करत नाहीत. कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचवत नाही. हीच पाळीव प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची सगळ्यात मोठी खासियत आहे.
ससा हा खूप चपळ, वेगवान असतो. जर सगळ्या प्राण्यांची आपण शाळा घेतली तर त्यात ससा हा सगळ्यात चपळ आणि वेगवान प्राणी ठरेल. ससा हा तसा भित्र्या स्वभावाचा देखील असतो.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतो. ससा हा जरी कथेत हरला असला, तरी सुद्धा ससा हा प्रचंड हुशार प्राणी असतो. त्याला त्याची काळजी बरोबर घेता येते. त्याची शिकार करणे बाकीच्या प्राण्यांना सोपे जात नाही. परंतु खूप मोठे प्राणी जेव्हा त्याची शिकार करतात, तेव्हा सशाला आपला जीव गमवावा लागतो.
तसेच सशाची अजून एक कथा देखील खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे ससा हा मुळातच खूप भित्रा प्राणी असल्याने, तो सगळ्याच गोष्टींना खूप जास्त घाबरतो. त्यामुळेच त्याच्यावर एक गोष्ट प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, ‘ससा एका झाडाखाली शांत झोपलेला असतो आणि त्या सशावरती झाडाचा वाळलेले पान पडते. त्यावेळी ससा इतका घाबरतो की त्याला वाटते की आकाश पडले आहे. तो घाबरून सगळ्यांना आकाश पडले, आकाश पडले असे सांगतो.’ ही कथा फार जुनी आहे. बऱ्याच काळापासून ती प्रसिद्ध देखील आहे. या गोष्टीतून असे आपल्याला शिकवले जाते की, ‘कोणत्याही गोष्टीला घाबरू नये.’ म्हणूनच ही कथा सगळ्या लहान मुलांना सांगितली जाते.
सशाच्या संपूर्ण जगात एकूण ३०५ जाती आहेत. ससा हा कायम समूहाने राहतो. गवत आणि गाजर हे सशाला खूप आवडते. सशाचे कान हे तीन-चार मीटर एवढे मोठे असतात. सशाचे आयुष्य खूप कमी असते. ते जास्तीत जास्त ‘१२ वर्षे’ जगू शकतात. ससा हा जास्त जोरात ओरडू शकत नाही. तो कोणाचीही शिकार पण करत नाही. मला असा हा प्राणी खूप आवडतो. म्हणून समोरच्या काकांकडे जाऊन सोनू सशाला मी रोज भेटते. जाताना त्याला गाजर आणि कोथिंबीर घेऊन जाते. ससा खरच खूप छान प्राणी आहे.