माझा आवडता पक्षी मोर

मी लहानपणापासूनच ‘नाच रे मोरा’ हे गाण ऐकत मोठी झाले. या गाण्यावरती सगळी लहान मुले एकदा तरी नाचले असतील. भारतात मोराचे खूप महत्त्व आहे. मोराला बघून आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो. मोराचा पिसारा खूप छान असतो.

मोर हा ‘कुकुट वर्गीय’ पक्षी आहे.मोराला भारतात ‘राष्ट्रीय पक्षी’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. मोराची खरी पिसे खूप महाग असतात. मोराची पिसे कार्तिकेय देवाला खूप आवडतात’ म्हणूनच कार्तिकी एकादशीला मोराची पिसे ‘प्रसाद’ म्हणून वाहिली जातात.

मोर हा अत्यंत आकर्षक पक्षी आहे. मोराला बघितल्यावर खूप छान वाटते. पावसात मोर नाचू लागला की, खूप आनंद होतो. लहान मुलांना त्याने पिसारा फुलवल्यावर खूप मजा येते. मोराला बघून खरंतर सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात. मोर सगळ्या वयातील माणसांना खूप आवडतो. मोराचे एकूण तीन प्रकार आढळतात. त्यात दोन आशियाई प्रजाती आहे. त्या म्हणजे ‘भारतीय उपखंडातील मोर’ आणि ‘दक्षिण पूर्व आशियातील हिरवा मोर’. तसेच तिसरी प्रजाती हि ‘आफ्रिकन मोर’ आहे. हा मोर भारतीय मोरा पेक्षा खूपच वेगळा असतो.

मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे, अळी असे आहे, तसेच ते काही फळेही खातात. पण बाकीचे प्राणी किंवा अंडे वगैरे सारख्या गोष्टी मोर कधीच खात नाही.

मोर हा शक्यतो शहरी भागात आढळत नाही. पुण्यात काही डोंगरांवरती मोरांचे वास्तव्य दिसते. पण याचे प्रमाण खूप कमी आहे. ते शक्यतो पानझडी जंगलात आणि अरण्यात राहतात. ते रात्री आश्रयासाठी झाडांवर जातात. दाट गर्द झाडीमध्ये मोरांचे वास्तव्य जास्त आढळते. महाराष्ट्रातही बऱ्याच गावात आणि जंगलात मोरांचा वावर आढळतो. महाराष्ट्रात तर अनेक अभयारण्यांमध्ये मोरांचे अनेक प्रकार आपल्याला सापडतात.

तसेच वैदिक काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये मोराचे महत्व आपण लिहिलेले वाचतो. जसे सरस्वती मातेचे वाहन मोर आहे. तसेच गणपती बाप्पा चे भाऊ कार्तिकेय देवाचे देखील वाहन मोरच मानले जाते. आपल्या पुराणांमध्ये त्यांची गोष्ट सांगितली जाते. सरस्वतीला मातेला आणि कार्तिकेय देवाला मोर फारच आवडायचा म्हणूनच आपण दोघांच्याही पूजेला मोराचे पीस आणतो. मोराचे महत्व आपल्या भारतीय संस्कृतीत खूप आधीपासून आणि खूप मोठे आहे.

पुण्यात ‘शिरूर’ तालुक्यात ‘मोराची चिंचोली’ नावाच्या गावात मोराचे झुंड आढळतात. बाकीच्या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोर आढळतात. मोरांसाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील ‘नायगाव’ येथे ‘मयूर अभयारण्य’ भरपूर प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रजातीतील मोर आढळतात. येथील मोरांचे वेगवेगळे रंग बघून आपले मन प्रसन्न होते. भारतात हे एकमेव मयूर अभयारण्य आहे. जिथे सगळ्या प्रकारच्या मोरांचे संरक्षण आणि संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते.

सध्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मोराच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी अनेक विभागांमार्फत प्रयत्न करत आहे. तसेच मोराच्या वाढीसाठी दिवस-रात्र प्रयत्न केले जातात. मोरांना कोणत्या गोष्टींपासून त्रास होतो, अशा गोष्टी शक्यतो पर्यावरणाच्या आजूबाजूला ठेवत नाहीत. जेणेकरून त्यांच्या वाढीसाठी आणि एकूणच त्यांच्या राहण्यासाठी चुकीचे वातावरण त्यांच्या आजूबाजूला निर्माण होणार नाही.

‘कृष्ण जन्माष्टमीच्या’ दिवशी सुद्धा मोराची पिसे वाटली जातात. कृष्ण भगवान यांच्या ठिकाणी सुद्धा मोराचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर असते. गोकुळाष्टमीच्या दिवशी सुद्धा बालगोपाळांना डोक्यावरती मोराचे छान पीस लावले जातात. त्यांना कृष्णाचा अवतार बनवला जातो. एकूणच काय तर कृष्ण आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी मोराचे महत्त्व खूप होते.

मोराचे एकूण खूप महत्त्व आपण आत्ताच बघितले. आपण मोरांची काळजी घेतली पाहिजे, आपण जी जंगले नष्ट करत आहोत ते थांबवले पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीला मोर हा फक्त चित्रातच दिसेल! मोर एवढे सुंदर दिसतात की सगळे चित्रकार एक ना एक चित्र तरी मोराचे काढतातच! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संस्कृतीत कला क्षेत्रामध्ये मोराचे महत्व खूप आहेत. कारण मोराच्या पिसात जितके रंग आढळतात, तितक्या रंगांच्या विविध छटा या कलेमध्ये वापरल्या जातात. तसेच ‘पैठणी’ हा एक सगळ्यात महत्त्वाचा साडीचा प्रकार देखील महाराष्ट्रात आहे, ज्याच्या काठावरती मोराचे चित्र रेखाटले जाते. त्या साड्या खूप प्रसिद्ध असल्याने, सगळ्या स्त्रियांना मोराचा पिसारा आपल्या पदरावर असणे खूप महत्त्वाचे वाटते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *