महाराष्ट्रातील अभयारण्य

महाराष्ट्रातील अभयारण्य

अभयारण्य ही महाराष्ट्रातील आणि देशातील खूप महत्त्वाची संपत्ती आहे. वन्य जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अभयारण्य ही खूप महत्त्वाची असतात. महाराष्ट्र राज्यात जवळ-जवळ 21% भूभाग हा अभयारण्यासाठी ठेवला आहे. महाराष्ट्रात एकूण 52 अभयारण्य आहे.

महाराष्ट्र हे तसे मोठे राज्य आहे. यात आढळणारी प्राण्यांची व पक्ष्यांची विविधता देखील खूप मोठी आहे. महाराष्ट्रात आढळणारा खास प्राणी म्हणजे ‘नील गाय’. तसेच खूप सारे वाघांचे प्रकार देखील आहे. ‘बंगालचा वाघ’ देखील महाराष्ट्रात आढळतो, अनेक प्रजातींचे बिबट्या सुद्धा आहेत.

आपण एक एक करून काही अभयारण्यांची माहिती घेऊया.

1. ताडोबा- ‘ताडोबा’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. सगळ्यात मोठे जंगल येथेच आढळून येते. येथे मुख्यत्वे ‘बांबूची’ आणि ‘निलगिरीची’ झाडे आढळतात. हे ‘रॉयल बंगाल’ या वाघाचे मुख्य निवासस्थान आहे. मुळात ताडोबाला लोक फक्त वाघांमुळेच जास्त करून भेट द्यायला येतात. हे संपूर्ण जंगल साधारण 1750 चौरस किलोमीटर मध्ये पसरले आहे. याला एकूण 19 गेट आहेत. यात आढळणारे प्राणी हे खूप खास आहेत. खूप वर्षांपासून ते याच जंगलात निवास करतात. त्यामुळे लोक वर्षानूवर्ष वाघोबाला भेट द्यायला या ठिकाणी येत आहेत.

2. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान- मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणार हे उद्यान आहे. कान्हेरी लेण्यांमुळे याला ‘काळा पहाड‘ हे नाव पडले आहे. याची स्थापना ब्रिटिश काळात झाली. 1974 ला ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ नाव असे करण्यात आले. या उद्यानाची खासियत म्हणजे येथे 250 वेगवेगळे पक्षी तसेच 150 हून अधिक प्राणी आहेत. बिबट्या देखील आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे येथे आढळणारी झाडे ही खूप वेगळी आहेत. येथे आपल्याला करंजीची झाडे, साग बांबूची झाडे पाहायला मिळतात. राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच खारफुटीचे जंगल आहे, ते बघायला येठे लोक मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच उद्यानात बऱ्याचदा मोर देखील आढळून येतात. परंतु संजय गांधी नॅशनल पार्क हे ‘लायन सफारी’ यासाठीच जास्त करून प्रसिद्ध आहे. येथे असणारा जो तलाव आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या प्रजाती देखील आढळतात.

3. ताम्हिणी अभयारण्य- या अभयारण्याची खासियत अशी आहे की पुण्यापासून 70 किलोमीटरवर हे अभयारण्य आहे. म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन्ही अंतरापासून जवळ असलेले असे हे अभयारण्य आहे. येथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी दरवर्षी पावसाळ्यानंतर पाहायला मिळते. अभयारण्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी-पक्षी तर आढळतातच, परंतु पावसाळ्यात इकडे धबधबे देखील आढळून येतात. म्हणूनच फार मोठ्या प्रमाणावर लोक पावसाळ्यात या अभयारण्याला भेट द्यायला येतात. 150 हून अधिक वेगळे पक्षी, बहात्तर प्रकारची फुलपाखरे या अभयारण्यात आढळतात. तसेच 33 प्रकारचे दुर्मिळ अशी फुले देखील येथे सापडतात, त्यातीलच एक ‘दगडफूल’. या अभयारण्याची 3 मे 2013 रोजी स्थापना करण्यात आली. येथे कुठेही न सापडणारी अशी दुर्मिळ ‘जावडी मांजर’ देखील आहे. सध्याच्या काळात सरकारने पावसाळा सुरू झाल्यावर हे अभयारण्य काही दिवसांसाठी बंद ठेवलेले आहेत. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबर महिन्यानंतर हे अभयारण्य परत प्रेक्षकांसाठी सुरू होते.

4. भीमाशंकर अभयारण्य – हे अभयारण्य महाराष्ट्रातले जिल्ह्यात ‘खेड’ तालुक्यात आहे. हे ‘शेकरू’ या प्राण्याच्या घरासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो. तो जवळ-जवळ दीड ते दोन हजार मिलिमीटर पर्यंत तितका जातो. त्यामुळे येथे पावसाळ्यात यायला बंदी असते. येथे अनेक विविध प्रकारची झाडे आहेत. जसे की उंबर, पिसा, साग तसेच औषधी वनस्पती देखील आहेत. इथे असणारी झाडे ही खूप दुर्मिळ आहेत. तसेच येथे शंभर हून अधिक प्राणी आहेत. त्याच्यात बिबट्या, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, काळवीट असे अनेक प्राणी आढळतात.

तसेच हे अभयारण्य इतके प्रसिद्ध होण्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे ‘भीमाशंकर’ हे ठिकाण ‘बारा ज्योतिर्लिंग’ पैकी  एक आहे. त्यामुळे लोक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. म्हणजे अभयारण्य बघून होते आणि मंदिरातही जाता येते. असा विचार करून खूप पर्यटक येथे भेट देतात. 5. कर्नाळा पक्षी अभयारण्य – ‘पनवेल’ जवळ ‘कर्नाळा पक्षी अभयारण्ये’ वसलेले आहे. हे पनवेल पासून बारा किलोमीटरवर आहे. येथे वर्षाला 125 ते 150 जातीचे पक्षी भेट द्यायला येतात. प्रत्येक पक्षी येथे वर्षभर राहत नाही. त्यांचा येण्याचा काही कालावधी निश्चित असतो. ते त्या वेळेला या अभयारण्यात असतात, मग दुसरीकडे उडून जातात. परंतु काही काही पक्षी हे खूपच दुर्मिळ झालेत, असे पक्षी देखील येथे सापडतात. त्यात ‘मलबार’ पक्षाचे मान पहिला असतो. त्याचप्रमाणे कोकीळ, कोतवाल, पांढऱ्या पाठीचे गिधाडे अशा प्रकारचे वेगळ्या प्रजातीचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *