नदीला आलेला महापूर

Featured Image-mahapurache thaiman

नदीला आलेला पूर

12 जुलै 1961 या दिवशीची ही गोष्ट. पुण्यामध्ये मुळा-मुठा नदीला आलेला प्रचंड मोठा पूर बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन अगदी शब्दशः सरकलेली होती.

आज 56 वर्षानंतर देखील जरी या सगळ्या गोष्टी आठवल्या, तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कारण हा आलेला पूर भयानक होता. याने जवळजवळ संपूर्ण पुणे शहर धुवून काढले.

पुराचे कारण त्या वेळेला असे सांगितले जाते, की पानशेत या धरणाचा जो बांध आहे. तो सकाळी साडेपाच वाजता फुटला, नंतर दहा वाजेपर्यंत सर्व घरांमध्ये पाणी आलेले होते. आत्ताच नवीन पुणे फार वेगळा आहे. त्या वेळेला जी नगर अस्तित्वातही नव्हती, अशा ठिकाणी पाणी गेलेले होते. लोकांची घरे वाहून गेली होती. पानशेत धरण फुटल्यामुळे खडकवासला धरणनातील पाणी देखील सोडावे लागले होते. ते पाणी सोडल्यावर सर्व पेठांमध्ये पाणी घुसले. पुण्याच्या सर्व पेठा या पाण्याखाली गेल्या होत्या. त्याकाळी पेठेंना खूप महत्त्व होते. सगळ्यात महत्त्वाचा पुण्याचा भाग आजही पेठानाच मानला जातो. त्यामुळे शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग हा संपूर्ण पाण्याखाली गेला होता. लोकांचे सगळं सामान वाहून गेले होते .प्रत्येकाची पळापळ चालली होती. तसेच लोकांना आसरा घेण्यासाठी देखील आजूबाजूचा परिसर उरला नव्हता. इतके पाणी फार थोड्या काळात सर्वत्र पसरले होते. या सगळ्याची खूप भयानक अवस्था झाली होती. लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले होत. त्यांची घराची बांधकामे ढासळली. घरे पार जमिनीला मिळाली.

आत्ताचे लक्ष्मी नगर, सहकार नगर ही सर्व ठिकाणी त्याकाळी पेठांची जागा होती. त्यामुळे तो सगळा परिसर वाहून गेला, मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली, लोकांना खायला अन्न नव्हते, प्यायला पाणी नव्हतं, राहायला जागा नव्हती. सगळ्यात भीषण अवस्था म्हणजे लोकांना साधी एका ठिकाणी थांबायला, एकत्रित व्हायला ही जागा नव्हती. बरेचसे लोकं तर ओंकारेश्वर मंदिराच्या कळसावर चढून बसले होते कारण खाली उतरल्यावर पाण्यातच वाहून जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कारण पुणे शहर हे उंचावर नसल्यामुळे पाणी शहराच्या अगदी आतपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सगळा परिसर अगदी सहज वाहून गेला होता.

ही गोष्ट झाल्यानंतर त्याचे परिणाम खूप भीषण व्हायला लागले. जसे जसे पुराचे पाणी थोडे फार प्रमाणात ओसरायला लागले तसे तसे लोक परत जिथे आपली पूर्वी घरे होती तिथे परतायला लागले. पण ती दुर्घटना एवढी भीषण घडलेली होती की लोकांच्या घरांचे थोडेसे अवशेष सुद्धा उरले नव्हते. सगळ्या गोष्टी वाहून गेल्या होत्या, सर्व काही मातीमोल झाले होते. घर पाहून गेल्यावरती त्यांच्याकडे काहीच उरला नाही. लोकांच्या घराची कागदपत्रे देखील वाहून गेली, त्यामुळे कोणत घर कोणाचं? याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे घर मालकांवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला. जे पूरग्रस्त नव्हते त्यांनी देखील त्यात हात धुऊन घेतले. लोकांचे दागिने, देवाच्या मुर्त्या, जमिनीची कागदपत्रे ,सोन्याची भांडी व मौल्यवान वस्तू या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या होत्या.

सगळ्यात भीषण गोष्ट जर कुठची घडली असेल, तर ती म्हणजे पुण्यात आणि पेठेमध्ये वाडा संस्कृती होती. जी आपल्या इतिहासाचा आणि परंपरेचा एक मोलाचा साठा होती. वर्षांनूवर्ष वाडे आणि वाड्यांमध्ये राहणारी लोक ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली होती, परंतु या पुरामुळे पाणी आत घुसल्यामुळे वाडा संस्कृतीचा नाश झाला. कित्येक वाडे हे भिंती कोसळून नामशेष झाले.

पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे घर वाहून गेले होते. मुळात त्यांचे घरच उरले नव्हते. हे रोगराईपेक्षा खूप भीषण आहे. एक वेळ रोगराई असते, तेव्हा हॉस्पिटलला जाऊन आपण बरे होऊन परत घरी येतो. परंतु पूर ही एक अशी भयानक गोष्ट आहे, जी आपल्या हातातून सर्वस्व घेऊन जाते, यामुळे असे झाले की आता वाडे ओळखू येत नव्हते. त्यावेळेला सरकारने पूरग्रस्त लोकांना मदत करायची, म्हणून त्यांना जमिनी द्यायला सुरुवात केली. अशा वेळेला, खोटी कागदपत्रे दाखवून काही लोकांनी नसलेल्या जमिनी देखील बळकवल्या आणि ज्या लोकांची खरच घरे होती, त्यांच्यावर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला. या लोकांवरती आयुष्यभराचा इम्पॅक्ट पडला. आज त्या पुरची घटना घडून ‘56 वर्षे’ झाली आहेत. पण तरीसुद्धा या जमिनीच्या चुकीच्या व्यवहाराची शिक्षा पुण्यातली चौथी पिढी अजूनही भोगतिये.

त्या दिवसांमध्ये लोकांकडे घर नव्हते, खायला अन्न नव्हते, लोकांची भांडीकुंडी वाहून गेली होती. जमिनीची कागदपत्र गेली होती. त्यांचे संसार उध्वस्त झालेले होते. आपल्या डोळ्यासमोरून आपल्या सर्व वस्तू, ज्या परंपरागत आहेत, अशा वाहून जाताना बघितल्या होत्या. हा काळ खरंच पुणेकरांसाठी खूप भीषण काळ होता. मराठ्यांच्या इतिहासात आणि पेशव्यांच्या काळापासून पुणे हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे, त्याला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या पुरामुळे या सांस्कृतिक वारसाला खूप मोठ्या प्रमाणावर धक्का बसला. लोकांच्या जमिनी गेल्या त्याचे कागदपत्रे गेले चौथी पिढी आज ते भोगती आहे, नदीला आलेला एक पूर किती जणांचे आयुष्य बदलू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे आणि आज इतक्या वर्षानंतरही त्या पुराची आठवण जरी आली तरी अंगावर काटा येतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *