लॉकडाऊन अनुभवताना निबंध

भारताला मुळात लॉकडाऊन म्हणजे काय हेच माहिती नव्हते. परंतु 2020 ला आलेल्या जगभरातील महामारीमुळे लॉकडाऊन म्हणजे काय? किंवा निर्बंध काय असतात? याची सर्वप्रथम प्रचिती झाली.

भारतात यापूर्वी झालेल्या महामारींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच निर्बंध घातले गेले नव्हते. परंतु कोविड या महामारीमुळे मात्र जगभरात जसे निर्बंध लागले तसेच निर्बंध भारतात देखील लादले गेले होते. या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत गेला. त्यामुळे सामान्य माणसाचे जीवन हे प्रचंड बदलून गेले. साध्या गोष्टींना देखील निर्बंध आकारण्यात आले होते. माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता, गरजेच्या वस्तू जसे अन्न, पाणी, औषधी, भाजीपाला एवढ्याच गोष्टी आणायला सरकार परवानगी देत होते. बाकीच्या सर्व गोष्टींना निर्बंध लागला होता.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘कोविड’ ही जगातील सगळ्यात मोठी महामारी होती, जी ‘चीन’ या देशातून जगभरात पसरली होती. कोविड हा अत्यंत गंभीर असा विषाणू सर्व ठिकाणी पसरत होता. त्या विषाणूला पसरण्या पासून निर्बंध लागावा म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केले.

एप्रिल 2020 ला पहिल्यांदा 24 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. हे लॉकडाऊन अत्यंत सिरीयस असून ‘कोणीही बाहेर जाऊ नये, गरजेच्या वस्तू घेण्यासाठी फक्त बाहेर जाऊन यावे’ इतक्याच परवानग्या देण्यात आल्या होत्या.

कोणत्याही खाजगी वाहन रस्त्यावरून जात नव्हत्या, पोलिसांचे निर्बंध ही लागले होते. ही महामारी एका माणसातून दुसऱ्या माणसाकडे विषाणू संपर्कात आल्याने स्थलांतरित होत असे. या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी सरकारने केलेले हे नियोजन होते.

या महामारीचा इतका भयंकर परिणाम होईल असे कोणालाच वाटले नव्हते! 24 दिवसांचा निर्बंध संपल्यानंतर एक मोठा लोकडाऊन जाहीर केला गेला. अनिश्चित काळासाठी हा लॉकडाऊन जाहीर केला. यात फक्त धान्य, भाजीपाला, मेडिकल क्षेत्र या तीनच गोष्टी चालू होत्या. मुलांचे शाळा आणि कॉलेजेस ऑनलाइन चालू केल्या गेल्या होत्या. जसेजसे रुग्णांची संख्या वाढत गेली तसेतसे लॉकडाऊन चे निर्बंध हे वाढत गेले. या लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी होईल, असे सरकारला वाटले. म्हणून याचे नियम जास्त तीव्र केले गेले. या सगळ्याचा परिणाम असा झाला, बरेचसे लोकं जे रोजगारी वरती अवलंबून आहेत त्या सगळ्यांच्या नौकऱ्या गेल्या.

लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैसे मिळत नसताना लोक त्यांच्या गावी परतण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. मात्र कोणत्याच सहाय्याने ते घरी जाऊ शकत नव्हते. रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक या सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी लोक रस्त्यावर उतरून चालत घरी गेलेले देखील आहेत! शहरात राहणारे कामगार, माथाडी कामगार या सगळ्यांना रोजगार उपलब्ध होत नव्हता. ही महामारी वाढत असल्याने हळूहळू लॉकडाऊन चे नियम हे जास्त गंभीर होत गेले.

पोलिसांना हे नियंत्रित करणे अत्यंत अवघड जात होते. तरीसुद्धा पोलिसांनी खूप सुंदर पद्धतीने या संकटावर मात केली. जे नियम पाळत नव्हते त्यांना शिक्षा व्हायची किंवा मार बसायचा, त्यामुळे लोकं घरातच बसून होते.

या सगळ्यामुळे लोकांच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम झालेले देखील आपण बघितले. काही लोक घरात बसून आपल्याला कोविड होईल का या भीतीनेच देवाघरी गेले!

ही महामारी इतकी भयानक होती की कोविड झालेल्या रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांकडे पीपीए किट्स कमी, प्लाजमा उपलब्ध होत नव्हता, ऑक्सिजन मास्क या सगळ्या गोष्टींचाही तुटवता जाणवत होता. ही अशा प्रकारची महामारी ही जगासाठी अत्यंत नवीन होती. लॉकडाऊनचे भयानक परिणाम जसे भारताला जाणवले तसे जगभरालाही जाणवले.

परंतु भारताच्या या लॉकडाऊनमुळे आपल्या देशातील रुग्णांची संख्या अमेरिकेतील रुग्णांपेक्षा थोडी कमी झालेली जाणवली. अमेरिकेतील लॉकडाऊन मध्ये निर्बंध हे तेवढे कठोर नसल्याने लोक बाहेर फिरत होते आणि त्यांचे सगळ्यात जास्त लोक कोविड मुळे मृत्यू झालेले आपण बघितले. काही युरोपियन देशानमध्ये देखील हीच परिस्थिती बघायला मिळाली.

या लॉकडाऊनचे जसे वाईट परिणाम खूप झाले तसे काही चांगले परिणामही झाले, जसे लोकांनी ऑनलाईन शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

सगळे लोक एकमेकांना मदत करायला लागली. लोक ऑनलाईन जॉब म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ करायला लागले. घरी बसूनही पैसे कमवता येतात ही गोष्ट आधुनिक जगाला समजले! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या लॉकडाऊनमुळे माणसाला निर्बंधातही आपण कसे मार्ग काढून सुयोग्य रीतीने जगू शकतो हे कळले.

लोक नवीन पाककला शिकू लागले, घरच्यांशी छान सुसंवाद होऊ लागला. लोक नवीन काहीतरी शिकायला लागले, लोकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला सुरुवात केली. आपण या महामारीला बळी पडू नये यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने औषधे घेऊ लागला, व्यायाम करू लागला. या सगळ्यातून जितकी जमेल तितकी सकारत्मकता पसरायला सुरुवात केली. बरेचसे लोक घरून योगा, जिम यासारख्या गोष्टी देखील करू लागले.

या लॉकडाऊनचे जसे लोकांना वाईट अनुभव आले, तसे काही लोकांना खूप चांगले अनुभव देखील आले. ही महामारी खूप मोठी होती. जोपर्यंत भारतात स्वतःचे वॅक्सिन आले नव्हते, तोपर्यंत हे लोकडाऊन चे निर्बंध असेच ठेवले गेले, मात्र जसजसे वॅक्सिंग सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ लागले तसेतसे भारताने लोकडाऊन चे निर्बंध कमी केले. या लॉकडाऊनचे अनुभव प्रत्येकाला वेगळे वेगळे आले, काहींना चांगले तर काहींना वाईट!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *