जवस म्हणजे काय? जवस खाण्याचे फायदे व तोटे । Flax Seeds in Marathi

how to eat flax seeds in marathi flax seed in marathi meaning
what is flax seed in marathi

flax seeds in marathi javasFlax Seeds in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” जवस म्हणजे काय? जवस खाण्याचे फायदे व तोटे । Flax Seeds in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जवस म्हणजे काय? जवस खाण्याचे फायदे व तोटे । Flax Seeds in Marathi

आपल्यातील बहुतांशी जणाला फ्लॅक्स सीड्स माहिती असेल.फ्लॅक्स सीड्स आरोग्यासाठीग्यासाठी खूप लाभदायी आहे. परंतु शहरी भागातील बहुतांश जणाला फ्लॅक्स सीडस् म्हणजे काय? त्याचे उपयोग माहितीच नाही. त्यांच्यासाठी आजचे आमचे आर्टिकल “Flax Seeds in Marathi” फायदेशीर ठरेल.

 Flax Seeds माहिती :

Flax Seeds ला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस.

जवसाचे शास्त्रीय नाव ” लीनम युसीटॅसिमम “ आसे असून, ही “लीनासेस” कुटुंबातील एक वनस्पती आहे.

हे एक गळतीचे धान्य आहे.फ्लॅक्स सीड्सना मराठीत आळशी किंवा जवस असे म्हणतात. तर हिंदीत अलसी किंवा तीसी असे म्हणतात.

जवसाचा उगम मुख्यता इजिप्त या देशातून झाला. भारतातील महाराष्ट्र राज्यातील जवस हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. त्याच्या एका फळात दहा टोकदार चमचमीत चपट्या बिया असतात. यापासून तेल निर्मिती सुद्धा केली जाते. विदर्भात जवसाचे तेल हे खाद्य निर्मिती साठी वापरले जाते.

फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस त्याला सुपर फुड चा दर्जा दिलेला आहे. यामध्ये केवळ पुष्कळ घटक नसतात तर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले चांगले घटक सुद्धा असतात. जवसाच्या बिया पासूनच चटणी केली जाते. जवसाच्या वनस्पतीच्या खोडापासून धागा निघतो.

जवस हे मुख्यता सिमशीतोष्ण प्रदेशात येणारे पीक आहे. व्यापारीदृष्ट्या सुद्धा जवसाचा बराच फायदा होतो. Flax Seeds याच्या रेषेपासून कापड, दोरी, रस्सी बनवली जाते. तर जवसाच्या बियांपासून तेल निर्मिती होतेच त्यासोबतच वार्निस, रंग, साबून, पेंन्ट तयार केले जाते.

कफ खोकल्याचा त्रास झाल्यावर जवसाच्या बियांचे मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

Flax Seeds उत्पादनामध्ये चिन देश प्रथम क्रमांकला येतो. त्यासोबतच जगातल्या अमेरिका, बेल्जियम, भारत, फ्रान्स अशा विविध देशात जवसाचे पीक घेतले जाते.

आयुर्वेदामध्ये सुद्धा जवसाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. आयुर्वेदानुसार, जवसाला मंद गंधयुक्त, पित्तनाशक, किंचित कप वात कारक, गरम, पौष्टिक, पाठीचा कणा दुखणे कमी करणारे आणि सुजेला नष्ट करणारे म्हटले जाते.

तसेच गरम पाण्यामध्ये flax Seeds चे चूर्ण टाकून ते पाणी पिल्यास रक्तातिसार आणि मूत्र संबंधित सर्व विकार दूर होतात.

 Flax Seeds काय म्हणजे आहे :

जवस हे शरीरासाठी उपयुक्त आहे. जवसाच्या बिया ना तरुण आणि जुन्या पिढीसाठी आहारातील प्रथिनांचे आश्चर्यकारक स्त्रोत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आहारामध्ये जवसाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. वास्तविक बियांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी शेतकरी निवडक पाण्याचा उसाचे उत्पादन करत आहेत. विज्ञान आणि संशोधन यांनी बाजारात जवस बियाना सुधारित आवृत्ती पुरवण्यासाठी यश मिळालेले आहे.

जवस बियांची सर्वात पहिली माहितीही पाषाण युगातील काळात झाली होती. मिस्त्री लोकांनी मृत्यू देह पुरवण्या पूर्वी संरक्षण करण्यासाठी आणि गुंडाळून ठेवण्यासाठी लीनेन आणि लींसीड वापरण्याचा उल्लेख आढळतो. म्हणून स्वतः मानवा येवढे जवसाचा वापर जुना असल्याचा म्हंटले जाते.

 Flax Seeds मधील  पौष्टिक तत्व :

Flax Seeds  मध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात.  जवसाच्या बियांमध्ये इतर नट्स पेक्षा  केवळ कॅलरीज जास्त नसतात, तर त्यामध्ये बरेच पौष्टिक घटक देखील असतात. दहा ग्राम फ्लॅक्स सीड्स मध्ये  7% पाणी, 1.9  ग्राॅम प्रथिने, 3 ग्राॅम कार्ब, 0.2  ग्रॅम साखर, 2.8  ग्राॅम फायबर, 4.3  ग्रॅम चरबी असते.

वरील सर्व घटक मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. Flax Seeds सेवनाने शरीरातील या सर्व घटकांची पूर्ती होते व  आरोग्यदायी शरीर प्राप्त होते.

त्यामुळे नेहमी त्याच्या जेवणामध्ये फ्लॅक्स सीडस् चा  वापर फायदेशीर ठरेल.

 Flax Seeds  का खावे आणि वापरावे ?

जवस मध्ये विविध प्रकारचे पौष्टिक तत्व आढळतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जवस बिया ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा एक  मुख्य स्त्रोत आहे.

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ऍसिडचा एक असा समूह आहे जो आपले शरीर  स्वतः तयार करत नाही तो बाह्य स्वरूपाने म्हणजेच आपल्या खाद्य पदार्थातून आपल्याला शरीराला द्यावा लागतो.

जवस बिया यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याने आपल्या नेहमीच्या आहारामध्ये जवसाचा वापर करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

याव्यतिरिक्त  फ्लॅक्स सीडस मध्ये जीवनसत्व ए, सी, ई, आणि एफ आसतात. तसेच   फ्लेक्स सीड्स मध्ये  पोटॅशियम, लोह, मॅंगनीज   सुद्धा आढळते.

जवस विविध मार्गाने आपण आपल्या आहारामध्ये वापरू शकतो. काहीजण जवसाची भाजी करून खातात तर काहीजण भाकरी सुद्धा करतात.

जवस खाण्याचा स्त्रोत कुठलाही असला, तरी तो आपल्या शरीरामध्ये. नियमित पाण्यात जाणे हे महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जवसाचा वापर आहारामध्ये करू शकतो.

 Flax Seeds जवस खाण्याचे फायदे :

फ्लॅक्स सीड्स मध्ये बरचसे पौष्टिक  तत्त्व जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात.

Flax Seeds मुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत;

1. रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीव चे नियंत्रण :

फ्लॅक्स सीडस मध्ये फायबर आणि लिग्निन या घटकांचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे नियमित फ्लॅक्स सीडस् चे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी सहा ते अकरा टक्क्याने कमी होते. त्यामुळे फ्लॅक्स सीडस्  रक्तातील कोलेस्ट्रॉल च्या पातळीचे नियंत्रण करण्यास फायदेशीर ठरतात.

2. कमी रक्तदाब :

फ्लेक्स सीड्स मध्ये मुबलक प्रमाणात  फायबर  असते. त्यामुळे फ्लॅक्स सीडस् चे सेवन केल्यास नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

फ्लेक्स सीड्स मध्ये असलेले घटक  रक्तवाहिन्यांच्या भिंती वर ताण कमी करण्यास मदत करतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

3. हृदय विकार साठी फायदेशीर :

फ्लॅक्स सीडस मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे चे प्रमाण असते. हे   ॲसिड आपल्या  हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सोबतच  फ्लॅक्स सीडस मध्ये अल्फा- लीनोलेनिक ऍसिड  लक्षणीय प्रमाणात आढळते. त्यामुळे रुदया संबंधित सर्व विकारांसाठी  फ्लॅक्स सीडस् हा रामबाण उपाय आहे.

4. कर्करोग वर फायदेशीर :

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असे आढळले की, फ्लॅक्ससीड मध्ये असणाऱ्या कंपाउंड मुळे  स्तन, पुरस्थ आणि कॉलन या कर्करोगापासून आराम मिळू शकतो. या संशोधनानुसार, 6,000  महिलांनी फ्लेक्स सीड्स बियाणे जे सेवन केले असता त्यांच्यामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 18 टक्क्याने कमी झाली. त्यामुळे फ्लॅक्स सीडस् या कर्करोगावर खूप फायदेशीर ठरतात.

5. मधुमेहावर फायदेशीर :

लिग्नन चे  सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच पातळीमध्ये कमी होते.

फ्लॅक्स सीडस मध्ये लग्नाचे प्रमाण मुबलक प्रमाणात आसते. त्यामुळे  फ्लॅक्स सीड्स नियमित सेवन केल्यास मधुमेह  नियंत्रित राहण्यास मदत होते.

6. लांब आणि चमकदार केस :

प्रत्येक महिलांना लांब आणि चमकदार केस ची अपेक्षा असते. अशावेळी केसांना जवस लावल्याने हेअर फॉलिकल पोषण मिळते आणि डोक्याच्या कातडीसाठी अतिआवश्यक आद्रता मिळते. त्यामुळे  केस गळणे थांबते व केसाची जलद गतीने वाढ होते. व केस मजबूत आणि चमकदार होतात.

7. ब्रेन  स्ट्रोक चे प्रमाण कमी करते :

हल्ली बेन स्ट्रोक चे प्रमाण खूप वाढलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये नियमित फ्लॅक्स सीडस् चे सेवन केल्यास हा धोका कमी होतो. कारण फ्लेक्स सीड्स मध्ये फॅटी ऍसिडचे प्रमाण असते. फॅटी ऍसिड ब्रेन स्ट्रोक चा धोका कमी करण्यास मदत करतात.

तर मित्रांनो ! ” जवस म्हणजे काय? जवस खाण्याचे फायदे व तोटे | Flax Seeds in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” Flax Seeds in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पण  पॉईंट्स राहिले असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

हे अन्य माहिती देखील अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *