शेती विषयक संपूर्ण माहिती । Information of Agriculture in Marathi

Information of Agriculture in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” शेती विषयक संपूर्ण माहिती । Information of Agriculture in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

शेती विषयक संपूर्ण माहिती । Information of Agriculture in Marathi

सर्वसाधारणपणे सर्वांनाच ” शेती “ ही माहिती आहे. परंतु नुसती शेती हे नाव असून चालणार नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न आणि हे अन्न मिळते ते म्हणजे शेतीतूनच.

आपल्यातील बहुतेक जण हे शेती नाव फक्त एकूणच आहे परंतु त्यांना शेती बद्दल पुरेशी माहिती अद्यापि माहिती नाही.

म्हणूनच आर्टिकल मध्ये आम्ही ” Agriculture Information in Marathi “ घेऊन आलोत.

ज्या लोकांना शेती बद्दल पुरेसे माहिती जाणून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी आजच्या आमची आर्टिकल खूप फायदेशीर ठरेल.

शेती विषयी माहिती Agriculture information :

जगातील बहुतांशी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी केव्हा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चाललेला व्यवसाय अशी शेतीची व्याख्या केली जाते.

शेतीमधून काढावयाचे उत्पादा नुसार शेतीचे विविध प्रकार पडतात त्यामध्ये उसाचा मळा, भात शेती, पशु प्रधान शेती, मत्स्त शेती.

त्याप्रमाणेच पाण्याच्या व सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती व जिरायती शेती असेदेखील शेतीचे प्रकार पडतात. व खतांच्या वापराने नुसार सेंद्रिय शेती व रासायनिक शेती हे प्रकार पडतात. स्थूल मानाने आणि नैसर्गिक व आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांमध्ये विभिन्नता आढळते.

भारतामध्ये मुख्य तीन ऋतू आहेत. त्यामुळे हवामानामध्ये होणारे बदल, जमीन आणि भूरचना ही सतत बदलत असते.

एखादा भाग्यातील जमिनीमध्ये कुठले पीक घ्यावे हे तेथील हवामान आणि जमिनीवर ठरवले जाते. कमी पावसाच्या भागात जर सिंचनाद्वारे पाण्याची उपलब्ध असेल तर त्याठिकाणी बागायत, कापूस आणि उसासारखी दीर्घ मुदतीचे पिके उत्तम रित्या येऊ शकतात.

भात शेती आणि उष्णकटिबंधातील फळबागां ची शेती साठी कोकण विभाग महत्त्वाचा ठरतो. कारण कोकणातील हवामान हे भात, आंबे ,नारळ-सुपारी, काजू आणि मसाल्यांच्या पिकांसाठी पोषक असते.

तसेच नवीन संकरित जाती मुळेही हवामान,जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके घेता येतात. त्यामुळे पिके आणि शेतीचे प्रकार हे जमीन आणि भूरचना यावर अवलंबून असतात. त्यासोबतच जर प्रजन्यमान व्यवस्थित असेल तर पीक आणखी चांगले येऊ शकते.

खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणी पाऊस भरपूर चांगला पडणारा असेल तर शेतीचे भरभराटी योग्यरीत्या होते.

डोंगराळ भागात आणि पुरेशा पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात गवताळ राने, कुरण, वनशेती,गवत शेती किंवा पशुधन प्रधान शेती करणे फायदेशीर ठरू शकते.

माफक खोलीची जमीन सोबत तुटक पाऊस पडणाऱ्या प्रदेशात दुर्जल शेती किंवा जिरायती शेती केली जाते.

आर्थिक घटक किंवा निरनिराळ्या नेसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकवता येणे हे शक्य झाले आहे. परंतु कोणती पिके किंवा शेतीचा प्रकार किती फायदेशीर ठरेल हे सांगणे अशक्य आहे. आर्थिक घटक हा शेती वरती परिणाम करतो हे बरोबरच आहे.

कारण, वेळोवेळी बदलणारे आर्थिक घटक म्हणजे उत्पादन खर्च, विक्री खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्यांशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट हे घटक शेतीवर परिणाम करत असतात.

शेतीचे प्रकार Types of Farming :

विविध प्रदेशात आढळणाऱ्या हवामान ,जमीन आणि भूरचना यावरून शेतीचे विविध प्रकार पडतात. शेतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत, शादी कभी

1. जिरायती शेती :

शेतीच्या या प्रकारांमध्ये 50 ते 100 सेंटीमीटर च्या आसपास असणाऱ्या व अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमान वरून पिके घेतली जातात.

भारतातील काही भागांमध्ये खरीप पिके आणि रब्बी पिके अशा दोन हंगामामध्ये पिके घेतली जातात. अशा प्रकारात केल्या जाणाऱ्या पिकांसाठी सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

तसेच आच्छादनाचा वापर करून जिरायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये जिरायती शेती केली जाते. भारत देशामध्ये 70 टक्के पाणी असले तरी भारतामध्ये बहुतांशी शेती जिरायती शेती या प्रकारामध्ये मोडते.

2. दुर्जल शेती :

शेतीच्या या प्रकारामध्ये 50 सेंटिमीटर केव्हा त्यापेक्षाही कमी निश्चित पर्जन्यमान असलेल्या भागात दुर्जल शेती केली जाते.

जमिनीमध्ये ओलावा टिकवणे, आणि भूसंरक्षण करणे या समस्यांवर आधारित ही दुर्जल शेती केली जाते.

दुर्जल म्हणजेच पाण्याची कमतरता असलेली शेती. मुख्यता पावसाळी महिन्यात होणारी हंगामी शेती असते. या शेतीमध्ये होणाऱ्या पिकांची निवड ही सुद्धा मर्यादित असते. भू संरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारसींचा वापर करून या शेतीमध्ये पिके काढली जातात.

उदाहरणार्थ: समपातळीत बांध घालून पिकांची समांतर लागवड करणे, कमी बी पेरणे, शेतातील रोपांची संख्या मर्यादित ठेवणे, पट्टा पेर पद्धतीने पीक पिकवणे, आच्छादनाचा वापर करणे आणि खतांचा माफक वापर करणे. इत्यादी शिफारशींचा वापर करून दुर्जल शेती केली जाते.

3. बागायती शेती :

शेतीच्या या प्रकार शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्धत आहे. या शेतीतील पिके मुख्यता पावसावर अवलंबून नसतात. त्यामुळेच या पिकांचे उत्पादन

जिरायती पिकांपेक्षा अधिक असते.

पुरेसा पाणीपुरवठा असल्यामुळे या शेतीतील पिके वर्षभर घेतली जातात. पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून हीमबागायती शेती केली जाते. या शेतीच्या समस्या जिरायती शेतीपेक्षा पूर्णतः वेगळे आहेत.

उदाहरणार्थ :

बागायती शेती पुढील सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलत्सारणाने काळजीपूर्वक रित्या अतिरिक्त मृदा काढून टाकून जमिनीची उत्पादन क्षमता टिकवणे.

4. फळबाग शेती :

शेतीच्या प्रकारामध्ये विविध प्रकारची फळ हे मुख्य उत्पादन असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमानला अनुसरून आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळपिकांना पोषक आहे.

तर महाराष्ट्रातील पठारी भागात लिंबू, संत्रे, मोसंबी यांसारखी फळांची शेती केली जाते. कोरड्या हवामानाचा पाण्याची उपलब्धता असेल काय तर द्राक्ष शेती केली जाते.

जमिनी चांगली सुपीक असेल आणि सिंचन उपलब्ध असेल तर केळीची बाग उत्तम रीत्या होऊ शकते. बहुवर्षीय फळबाग मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची गरज भासत नाही.

5. फुल शेती :

फुल शेती हा सुद्धा बागायती शेती हाच एक मुख्य प्रकार आहे. पूर्वीपासूनच फुलांचा होणारा मोठ्या प्रमाणातील वापराला लक्षात घेऊन फुलशेती केलीओ जाते. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे आणि जलद वाहतुकीची सोय असल्याने फुल शेतीपासून खूप फायदा होतो.

अलीकडच्या काळात हरितगृहांचा वापर हा मुख्यत फुलशेतीसाठी केला जातो. या कार्नेशन, जरबेरा आणि ट्युलिप इत्यादी फुलांचे उत्पादन हे हरित गृह यांच्या सहाय्याने घेतले जाते. तर गुलाब, निशिगंध यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. आज व्यावसायिक दृष्ट्या फुल शेती ही महत्त्वाची ठरली जात आहे.

6. भाजीपाल्याची शेती :

भाजीपाल्याची शेती पूर्णता बागायती शेतीच्या प्रकारातील आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधांची उपलब्धता आणि बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनांचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. या प्रकारच्या शेतीत उत्पादन होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने याची जलद मालवाहतुकीचे सोय असल्यास हे पीक घेणे फायद्याचे ठरू शकते.

7. पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती :

कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशात किंवा अनुकूल परिस्थिती असूनही तो प्रदेश पशुसंवर्धन आणि पशु संरक्षण दुग्ध व्यवसाय यांच्याबाबतीत फायदेशीर असेल तर त्या भागामध्ये पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती केली जाते.

या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राणे व जनावरांना वैरण, चारा,धान्यादी खाद्य इत्यादींसारख्या उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. याशिवाय पशुधन संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभपणे व किफायतीपणे विक्री करण्याची सोय या भागात असणे आवश्यक आहे. ही परिस्थिती या शेती प्रकाराला पोषक असते.

मिश्र शेती पद्धती Mixed Farming Methods :

मिश्र शेती म्हणजेच पिके आणि पशुधनास सह शेती या प्रकाराला मिश्र शेती पद्धती असे म्हणतात. या प्रकारामध्ये रोख विक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुसंवर्धन सुद्धा केले जाते.

1. मत्स्त शेती :

शेतीचा हा प्रकार अलीकडे खूपच मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतीतील माती खोदून, मोठ्या आकाराची तळी तयार करून त्यात पाणी सोडतात. व या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस केली जाते.

माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते.

2. सेंद्रिय शेती :

या शेतीच्या प्रकारांमध्ये पिकांची अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागवली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करून ही शेती केली जाते. उत्पादनवाढीचे उद्दिष्ट साध्य करताना अन्नद्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो.

पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखे हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खत पिकांसाठी वापरतात. तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात.

अशाप्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्ध केलेल्या जमिनीत पिके घेतली जातात.

3. रासायनिक शेती :

फक्त रासायनिक पदार्थांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीला उत्पादन वाढीसाठी मर्यादा येतात. म्हणून यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते व उत्पादन वाढवले जाते.

त्यासोबतच रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. या प्रकारच्या शेतीतून काही काळासाठी उत्पादन वाढवले जाते परंतु उत्पादन धान्याची गुणवत्ता कमी होते. या शिवाय धान्या मधून मानवाच्या शरीरात जाणारे रासायनिक द्रव्य आरोग्याला घातक ठरतात.

4. हरित गृहातील शेती :

कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे, आणि जमीन, हवामान ,उष्णता, आद्रता,ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो.

5. रोपवाटिका शेती :

रोपवाटिका ही फुलबागग शेती, फळबाग शेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेती साठी पूर्वतयारी म्हणून गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन काही प्रगतिशील शेतकरी फक्त रोपवाटिकेची शेती करतात.

शेतीला पाणी देण्याच्या पद्धती :

शेतीतील पिके वाढवण्यासाठी मुख्य गरज असते ती म्हणजे पाण्याची. शेतीला पाणी देण्याच्या काही पद्धती आहेत त्या पुढील प्रमाणे.

1. रहाटगाडगे:

रहाट आणी गाडगे या दोघांना मिळून एक यंत्रणा बनते तिला रहाटगाडगे असे म्हणतात. रेडा आणि बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते. या पारंपारिक पद्धती मध्ये राहटा च्या मदतीने घाडग्यांची एक माळ गोल गोल आशी  बसवलेली असते. फिरवताना ही गाडगे पाण्याने भरतात. रहाटावर ऊनही गाडगे खाली जाताना उलटी होऊन त्यात भरलेले पाणी पिकांना दिले जाते.

2. मोट पद्धती:

 मोठ म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी असते तिला मोठा असे म्हणतात. पूर्वी विहिरीचे पाणी उपसून शेतीला देण्यासाठी मोठे वापरले जात असे.

शेतीतील कामे Farm work :

 शेतीमध्ये विविध प्रकारची कामे केली जातात त्यामध्ये नांगरणे, वाखरीणी, पेरणी, लावणी, खुरपणी, कापनी, मळणी‌ अशा प्रकारची कामे केली जातात.

शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे Agriculture Tools Information in Marathi :

 शेतीसाठी काही महत्वाचे अवजारे असता तर ते पुढील प्रमाणे-

1. खुरपे :

 खुरपे हे लोखंडी अर्धवर्तुळ आकाराचे असते. व याची मूठ लाकडाचे असते. शेतातील गवत काढणी, खुरपणी यांकरिता खोपड खुरपे यांचा वापर केला जातो.

2.  फावडे :

 शेतातील जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी फावड्या चा वापर केला जातो.

3. नांगर :

 नांगर म्हणजे शेतात नांगरण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. नांगर हे बैलाच्या साह्याने वापरले जाते. याचा उपयोग शेता साठी सरी तयार करण्यासाठी केला जातो.

4. गोफण :

 शेतातील धान्य पक्षांनी, प्राण्याने खाऊ नये याकरिता त्यांना दगड मारून पळवीण्या करता  वापरले जाणारे मानव निर्मित  उपकरण म्हणजे गोफण असते.

 तर मित्रांनो ! ” शेती विषयक संपूर्ण माहिती । Information of Agriculture in Marathi वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

 Information of Agriculture in Marathi यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर ,कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *