जाणून घ्या चिया सीड्स बद्दल संपूर्ण माहिती । Chia Seeds in Marathi

Chia Seeds in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” Chia Seeds in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जाणून घ्या चिया सीड्स बद्दल संपूर्ण माहिती । Chia Seeds in Marathi

बाजारामध्ये बहुतेक वेळा आपण Chia Seeds असे नाव ऐकलेच असेल. परंतु बहुतेक जणाला प्रश्न पडला असेल की चिया सीड्स म्हणजे काय? चिया सीड्स चा वापर कशासाठी करतात?

कारण चिया सीड ( Chia Seeds ) हे नाव बहुतेक जणांनी ऐकलेच नसेल. आणि आपल्यातील काही जणांना याबद्दल पुरेशी माहिती सुद्धा नसेल. शरीरासाठी अतिशय उपयुक्त असलेले या चिया सीड्स आरोग्यासाठी विविध मार्गाने खूप उपयुक्त ठरतात.

ज्या लोकांना चिया म्हणजे काय? हे माहिती नाही त्या लोकांसाठी आजचे आमचे आर्टिकल “Chia Seeds in Marathi”खूप फायदेशीर ठरेल.कारण आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही संपूर्ण चीया विषयी संपूर्ण माहिती घेऊन आलोत.

चीया ( Chia ) म्हणजे काय What is Chia Seeds ?

 चीया ही एक फुलांची वनस्पती असून, साल्व्हिया हिस्पनिक पासून मिळालेले बीज आहे. ची आणि मुख्यता अमेरिका आणि मेक्सिको मधील आहे. सुरुवातीला चीया बद्दल कोणालाही जास्त माहिती नव्हती. परंतु अलीकडील काळामध्ये चीया मुळे होणारे शरीरासाठी फायदे सर्वांना माहिती झालेले आहेत.

 त्यामुळे या बियाण्यांसाठी अलीकडे लोकांची लोकप्रियता वाढत चालली आहे.

काही लोक Chia Seeds ला सुपर फूड असे सुद्धा म्हणतात.

चीया बियाण्यांनी जगातील बऱ्याच देशांमध्ये आपले स्थान मिळवले असून भारतामध्ये सुद्धा अलीकडे सर्वांच्या घरामधील चीया हा महत्त्वाचा घटक बनत आहे.

चीयाच्या बियानां मध्ये आरोग्यासाठी बरेच उपयुक्त घटक आढळतात. त्यामुळे chia seeds मनुष्यासाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक रोजच्या आहारामध्ये Chia seeds घालत आहेत.

Chia seeds आकाराने अतिशय छोट्या दिसत असल्या तरी त्यासाठी एक प्रकारचा खजिनाच आहे.

Chia seeds कशा ओळखाव्या How to identify chia seeds ?

आकाराने अतिशय लहान असलेल्या या chia seeds तुम्ही पहिले कधी पाहिला नसल्या तरी chia seeds ना बघताच आपण त्यांना ओळखू शकतो.

कारण चिया बियाणे हे लहान आणि कळ्या रंगाचे असतात. परंतु काही लोकांचा गोड गैरसमज असा आहे की, चीया बिजाणे म्हणजेच सब्जा.

परंतु, चिया बीजणे आणि सब्जा पुर्णता वेगवेगळ्या आहेत. फक्त दोन्ही बिया आहेत हा दोघांमधील एकच साम्य आहे.

सब्जा हा जास्त काळसर रंगाचा असतो तर चिया बियाणे हे राखाडी रंगाचे असतात.

वर उल्लेख केल्याप्रमाणे chia seeds अमेरिका देशात मोठ्या प्रमाणात आढळतात. चिया बीजणे हे भारतामध्ये आढळत नाही. परंतु, जागतिक बाजारपेठा मार्फत या चीता बिजाणे आज भारतात सर्वत्र आढळतात.

चिया बीजाणे हा भारतीय नसल्याने त्यांना मराठी मध्ये दुसरे कुठलेही नाव नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे यांना chia seeds किंवा चीया बिजाणे‌ म्हणणे उचित ठरेल.

काही लोकांच्या मते चीया‌ बिजाणे आणि सब्जा हा एकच असतात. परंतु हा लोकांचा गैरसमज आहे.

चिया बीजणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये प्रथिने, ओमेगा 3, फायबर हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

Chia seeds मधील पौष्टिक तत्व Nutrients in chia seeds :

Chia seeds मनुष्याच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. कारण यामध्ये बरेच पौष्टिक तत्व आहे जे मनुष्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

प्रत्येकी 28 ग्राॅम चिया बीजणे मध्ये प्रथिने 4 ग्रॅम, फायबर 11 ग्रॅम, फॅट 9 ग्रॅम,

कॅल्शियम 18% RDI, मॅंगनीज 30% RDI, मॅग्नेशियम 30% RDI, फॉस्फरस 27%

RDI अशा प्रकारचे वेगवेगळे पौष्टिक तत्व चिया सीड्स मध्ये आढळते.

Chia Seeds फायदे Chia Seeds Benefits :

Chia seeds मध्ये वेगवेगळे पौष्टिकतत्त्व असतात ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये चीया बीजाणांचा वापर केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो.

 Chia Seeds मुळे होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

1. हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगी Useful for Strengthening Bones :

 आपल्यातील बहुतेक जणांना माहिती आहे की हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शिअमची खूप आवश्यकता असते.chia Seeds मध्ये कॅल्शियम चे प्रमाण 18 टक्के आढळते. त्यामुळे चिया सीड्स कॅल्शियम साठी उत्कृष्ट स्रोत मानला जातो.

 हाडे मजबूत करण्यासाठी चिया सीड्स आणि दूध पिल्याने नक्कीच फायदा होतो.

2. प्रथिने च्या स्वरूपात फायदे Benefits in The Form of Protein :

 बॉडी बिल्डिंग साठी प्रोटीन म्हणजेच प्रथिने खूप आवश्यक असतात. बॉडी बिल्डर करणाऱ्या लोकांना डॉक्टर नेहमी प्रथिने घ्या असा सल्ला देतात. चिया सीड्स मध्ये 4gram प्रथिने आढळतात. त्यामुळे नवीन स्नायू तयार होण्यास मदत होते. चिया सीड चे सेवन केल्यास शरीरातील प्रोटीन चे प्रमाण योग्य होते.

3. ॲनेमिया पासून संरक्षण Protection from Anemia :

 ॲनेमिया ची समस्या ही मुख्यता गर्भवती स्त्रियां मध्ये आढळते. ॲनेमिया म्हणजे रक्तवाहिन्यांचे अशी अवस्था ज्यामध्ये रक्ताची खूप कमतरता भासते, आणि रक्ताची ही कमतरता योग्य वेळेत दूर होणे फार महत्त्वाचे आहे.

 आशा वेळी चीया सीडस् चे सेवन केल्यास आपल्या शरीरातील रक्ताचा अभाव पूर्ण होण्यासाठी मदत होते.

4. त्वचेसाठी फायदेशीर Beneficial For The Skin :

 चिया सीड्स चे नियमित सेवन केल्याने त्वचे संबंधित सर्व विकार दूर होतात. चिया सीड्स मध्ये असलेले ऑंटी अक्सिडेंट चे प्रमाण आपल्या त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. ज्यामुळे त्वचा सुरकुतलेली अशा समस्या दूर होऊन त्वचेवर कडकपणा निर्माण होतो.

 त्वचेच्या संबंधित अनेक रोग टाळण्यासाठी हे सीड्स मध्ये असलेले ऑंटी अक्सिडेंट अजितच्या सौरक्षण करण्यात सक्रिय भूमिका बजावते. त्यामुळेच चिया सीडस् चे नियमित सेवन केल्यास त्वचे संबंधित सर्व विकार दूर होऊ शकतात.

5.वजन कमी करण्यास मदत होते Helps to Lose Weight :

 वजन वाढणे म्हणजे सर्व रोगांना आमंत्रित करणे होय. त्यामुळे शरीराचे वजन वाढल्यास आणि प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्यासाठी chia seeds खूप फायदेशीर ठरतात. भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास चिया सीड्स खूप उपयोगी ठरतात.

6. स्मरणशक्ती वाढते Memory Increases :

 आजच्या तरुण पिढी मध्ये मेमरी लॉस किंवा कमी स्मरणशक्तीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामागचे कारण म्हणजे अयोग्य आहार, धूम्रपान, मध्यपान इत्यादींचे सेवन केल्यास स्मरणशक्ती कमी होते.

 अशावेळी chia seeds चे सेवन केल्यास मेमरी पावर ला प्रोत्साहन देण्यास मदत होते. जर चिया सीड्स नेहमीच्या आहारात वापरल्या तर स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.

7. केसांसाठी फायदेशीर Beneficial For Hair :

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आपण केसांची विशेष काळजी घेत असतो. अशा वेळी केस केवळ शाम्पूने किंवा कंडीशन ने धुणे महत्वाचे नसून केसांना मुळातून मजबूत करणे गरजेचे आहे.

Chia seeds मध्य विटॅमिन बी असून, हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे चीया बिजाणे चे सेवन केल्यास केसांना विटामिन बी चा पुरवठा होतो. त्यामुळे केसातील कोंडा कमी होऊन व केसांची वाढ चांगली होते.

8. पाचक प्रणाली सुधारते Improves The Digestive System :

ज्या व्यक्तींना पचनक्रिया विषयी काही अडथळा किंवा समस्या असतील त्यांच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे चिया सीड्स सेवन करणे. चिया सीड्स मध्ये फायबर असल्याने संपूर्ण पचन क्रिया सक्रियपणे कार्य करण्यास मदत होते.

Chia seeds पौष्टीक आणि उपचारात्मक दृष्टिकोन Chia seeds Nutritional and Therapeutic Approach :

चिया सीड्स हे प्राचीन अन्नधान्य आहे. जे अमेरिकेमध्ये मुख्यत आढळते. परंतु जागतिक बाजारपेठ यामुळे भारतामध्ये ही ते सहज उपलब्ध होत आहे. चिया सीड्स

एक प्राचीन अन्नधान्य आहे. चिया सीड्स ला सुपरफुड चा दर्जा देण्यात आलेला आहे. बऱ्याच देशांमध्ये आधुनिक खाद्यपदार्थांमध्ये चिया सीड्स चा वापर केला जातो.

चिया सीडस मध्ये अल्फा लीनोलेनिक ऍसिड व ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

Chia Seeds ऑंटी अक्सिडेंट चा देखील एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. सोबतच्या मध्ये क्लोरोजेनिक ऍसिड, मेरीसिटीन, कॅफिक ऍसिड, कवरसेंटिंन अशा प्रकारचे शरीराला पौष्टिक द्रव्य असतात. जे हृदय विकार, यकृताचा संरक्षणात्मक प्रभाव, वृद्धत्व विरोधी आणि ऑंटीकासिनोजेनिक वैशिष्टे चिया सीड्स मध्ये असतात. चिया सीड्स मध्ये मुबलक प्रमाणात फायबर देखील असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

चिया सीड्स कसे वापरावे How to Use Chia Seeds ?

जगभरातील विविध भागातील लोक चिया सीड्स चा वापर आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करतात. चिया सीड्स ना सत्ता ची कुठलीही चव नसल्याने आपण ज्या पदार्थांमध्ये चिया सीड्स घालतो त्या पदार्थाचा स्वाद या बियाणे घेतात. त्यामुळे नेहमीच्या जीवनामध्ये आपण या बियांचा वापर करू शकतो.

1. काहीजण नेहमीच्या आहारामध्ये ची या सेवेचा वापर सलाद म्हणून करतात.

2. आपण फक्त चिया बियाणे खाऊन शकल्याने, जेवणाच्या विविध पदार्थांमध्ये त्या मिसळून खाऊ शकतो.

3. चिया सीड्स चहासोबत सुद्धा घेऊ शकतो.

4. चिया सीड्स आईस्क्रीम मध्ये टाकून सुद्धा खाल्ले जातात.

5. तसेच, आपण चिया सीड्स चे इतर कुठल्याही पातळ पदार्थ सोबत खाऊ शकतो.

चिया सीड्स यांचे विशेष म्हणजे, या बिया 8 पट जास्त पाणी शोषून घेऊ शकतात. त्यामुळे पाण्यात टाकल्यास किंवा इतर पातळ पदार्थ टाकल्यात या फुगतात व जेलीसारखा आकार प्राप्त करतात. त्यामुळे यांना खाणे सोपे जाते.

चिया सीड्स खरेदी मार्गदर्शन Chia Seeds Buying Guide:

आज भारता मधील बऱ्याच बाजारात सुपर मार्केटमध्ये या बिया सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. मेडिकल स्टोअर्स, ऑनलाईन वेबसाईट, डी मार्ट, बिग बाजार, ॲमेझॉन मार्केट, फ्लिपकार्ट अशा विविध वेबसाइट्स किंवा स्टोअर मधून आपण सहज रित्या चिया बियांची खरेदी करू शकतो.

 चांगल्या प्रमाणाची सीड्स घ्यायचे असल्यास प्रमाणित सेंद्रिय आणि नॉन जीएमओ बियाणे पॅकिंग जेवर तपासून पहावेत.

 चमकदार कळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बिया तपासून घ्याव्यात मात्र तपकीरी रंगाच्या बिया घेऊ नका.

Chia Seeds अतिवापरामुळे होणारे परिणाम Consequences of Overuse of Chia Seeds :

 चिया सीड्स आरोग्यासाठी जितका फायदेशीर आहेत तेवढ्याच प्रमाणात त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम सुद्धा आहे.

1. काही लोकांना ऍलर्जीच्या संबंधित समस्या. अशा लोकांनी चिया सेट सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

2. चिया सीड्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. मनुष्याची पचनशक्ती साई बसला लवकर पोचू शकत नाही, त्यामुळे पोट खराब होणार सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3. आपल्याला माहिती आहे चिया सीड्स मध्ये ओमेगा थ्री चे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. ज्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. परंतु ज्या लोकांना पहिल्या पासून कमी रक्तदाबाची समस्या आढळते, त्या लोकांनी चिया सीड्स चे सेवन केल्यास रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तीने च्या शेड चे सेवन करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4. तसे चीया सिडस् चे सेवन भरपूर प्रमाणात केल्यास या बिया घशामध्ये आवडतात त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते.

तर मित्रांनो ! ” जाणून घ्या चिया सीड्स बद्दल संपूर्ण माहिती । Chia Seeds in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Chia Seeds in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर,कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *