कमळ या फुलांची माहिती मराठी । Lotus flower Information in Marathi

Lotus flower Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” कमळ या फुलांची माहिती मराठीLotus flower Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

कमळ या फुलांची माहिती मराठी । Lotus flower Information in Marathi

जगभरात विविध प्रकारच्या फुले आढळतात. दिसायला अतिशय सुंदर, रंगीबिरंगी आणि आकर्षित फुले मनाला मोहित करतात. त्याचे आपले विशिष्ट असा महत्व असते.

परंतु कुठेही फळाचा उल्लेख झाला की, सर्व प्रथम नजरेसमोर येणारे फुल म्हणजे कमळ. कारण कमळ दिसायला खूपच सुंदर आहे. एकदा का कमळ फुलाला बघितले की आयुष्यभर आपण आपण कमळ फुला ला विसरू शकत नाही. कमळाला विविध नावाने ओळखले जाते जसे की, कमल, कनवाल, अंबुज.

परंतु कामळाला इंग्लिश मध्ये लोटस् ( Lotus ) या नावाने ओळखले जाते. कमळ हे मुख्यता उथळ आणि चिखल असलेल्या पाण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते.

कमळ या वनस्पतीचे फूल मुख्यता भारत चीन जपान अशा विविध देशात मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच भारत देशाचे राष्ट्रीय फूल म्हणून कमळ या फुलाला महत्त्व देण्यात आले आहे मुख्यता चिखलात, पाण्यात आढळते. दिसणारा सुंदर असणारी ही जलवनस्पती “नीलंबियासी” कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हे ” निलंबो नुसिफेरा “ असे आहे.

जगभरात कमळ फुलाच्या शंभरपेक्षा अधिक जाती आढळतात. कमळ फुला चे मूळ स्थान हे भारत, चीन, जपान या देशांमध्ये असावे. इराण पासून ते हॉस्पिटल यांच्या सर्व देशांमध्ये कमळ वनस्पती आढळतात. कमळाचे फूल हे दिसायला खूप आकर्षित व उबदार असते. भारतात जवळपास सर्वच रंगाची फुले आढळतात.

कमळाचे वर्णन Description of the Lotus :

कमळ ही वनस्पती साधारणता गोड्या आणि उथळ पाण्यामध्ये आढळते. साधारणत एक ते दीड मीटर उंच असलेली ही वनस्पती एकाच पातळीत दोन मीटर पर्यंत पसरते.

कमळ वनस्पतीचे खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर पसरत वाढते. फळाच्या वनस्पतीची पाने मोठी वर्तुळाकार, छाया कृती आणि 60 ते 90 सेंटीमीटर व्यासा पर्यंतचे असतात. पानाचे देठ लांब असून, पानाच्या शिरा पानाच्या मध्यापासून किरणायाप्रमाणे पसरलेल्या असतात.

कमळाची पाने आणि फुले पाण्यामध्ये नाव वाढतात पाण्यावर तरंगतात. कमळाचे फूल आला कमळ फुले असे म्हणतात. कमळाचे फूल सुगंधी आणि आकाराने मोठी असते.

कमळ फुलाचे वर्णन Description of Lotus Flower :

कमळे फुल दिसायला खूप सुंदर आणि आकाराने खूप मोठे असते. कमळाच्या फुलाला खूप पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग गुलाबी किंवा पांढरा असू शकतो.

कमळ फुलाला लांब देत असते. जेव्हा कमळाचे फूल पाण्यातून वर येते तेव्हा कमळाचे लांब देते हे त्यां नाना शोभून दिसते. कमळाच्या फुलाला मंद असा सुगंध असतो.

कमळाच्या विविध जाती आढळतात आणि या जातीनुसार कमळाच्या फुलांचा रंग सुद्धा वेगवेगळा आढळतो. भारतात मुख्यता पांढरे आणि गुलाबी रंगाची फुले मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.

कमळ फुल आपल्या पर्यावरणातील जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. कारण कमळाकडे विविध कीटक आकर्षित होतात, त्यामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते.

कमळाची पुष्पथाली आणि बियांचा उपयोग अनेक भारतीय खाण्यासाठी करतात विशेषता सिंधी लोक.

 कमळ फुलाच्या पाकळ्या Lotus Flower petals:

 कमल फूल हे उगवल्यानंतर सुमारे तीन दिवस सतत चांगल्या अवस्थेत तर राहू शकते त्यांनंतर कमळ फुलाच्या सर्व पाकळ्या एकामागून एक पाण्यात पडू लागतात. कमळ फुला चा केवळ मधला भाग हा पाण्याच्या बाहेर असतो कामळ फुल केवळ पाण्यातच उगवत असल्याने या फुलाला सहज रित्या कोणीही तोडू शकत नाही.

 कमळ फुलाला धार्मिक महत्त्व प्राप्त असल्याने बाजारामध्ये या फुलाला खूप किंमत आहे.

 कमळाच्या पाकळ्या ह्या दिवसा म्हणतात व रात्रीच्या वेळी बंद होतात.

कमळ फुल कुठे आढळते Where the Lotus Flower is Found :

कमळ फुल मुख्यता उथळ पाण्याच्या आणि चिखलाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच कमळ फुल मुख्यत: कमी ऑक्सिजन असलेल्या दलदलीच्या प्रदेशात चांगले वाढते. दलदलीच्या भागात सरोवर, तलाव अशा ठिकाणी कमळाचे फूल आढळते.

कमळ फुल ही वनस्पती मुख्यता भारत,चीन, जपान या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

भारतामध्ये जे कमळ आढळतात त्याचे मुख्यता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

1. लाल कमळ Red Lotus :

लाल कमळ हा एक वेगळाच प्रकार आहे परंतु या कामाला एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. या जल वनस्पतीचे मूळ खोड आखूड,उभे आणि गोलाकार व ग्रंथील असते.

साधारणता उधळ पाण्यामध्ये आढळणारी ही जलवनस्पती भारतातील उष्ण भागात तसेच आफ्रिका, हंगेरी, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांमध्ये पाहायला मिळते. या वनस्पतीची पाने गुळगुळीत असून देटाच्या खालची बाजू लवदार असते.

या वनस्पतीला येणारे फुले ही पांढऱ्या व लाल रंगाचे असून साधारणत सकाळच्या वेळी उमटलेली दिसतात. या वनस्पतीला फुले साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्या दरम्यान येतात. या वनस्पतीला येणारे फळ हिरवे व गोलाकार असते‌. लाल कमळ या वनस्पतीचे बहुतेक सर्वच भाग खाण्याकरिता वापरतात.

2. उपाल्या कमळ Upalya Lotus :

या प्रकाराचे कमळ हे बहुवर्षीय असून ते मुख्यता अग्नेय आशियाला मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीची मुलक्षोड लंबगोल आकाराची असते. या वनस्पतीची पाने वर्तुळाकार पण तळाशी अरुंद खंडित असतात. या वनस्पतीच्या पानाच्या खालच्या बाजूला किरमिजी रंगाचे ठिपके असतात.

आपल्या कमळाला येणारी फुलेही निळी,जभळी ,पांढरी व गुलाबी रंगाचे असतात. या फुलांना किंचित मंदसा सुगंध असतो. ही फुले दिवसा उमलेली पहायला मिळतात.

कमळ फुलाचे उपयोग Use of Lotus Flower :

आशिया खंडामध्ये कमळाच्या फुलांचा तसेच कमळाच्या विविध भागांचा उपयोग औषधी गुणधर्म मध्ये तसेच खाण्यासाठी केला जातो. कमळाचे पान, फुल, बिया यांचा वापर खाण्यासाठी करतात. तसेच कमळाचे गड्डे भाजून, तळून किंवा लोणचे करून खाल्ले जातात.

कमळाच्या गड्डामध्ये रिबॉफ्लाविन, निअॅसिन, व क आणि क जीवनसत्त्वे असतात. तसेच कामाच बी वर्तुळाकार असून तिचा उपयोग खाण्यासाठी करतात. कमळाचा मध सुधा गुणकारी असतो.

कमळाचे फूल ही थंड आकुंचन करणारे असून पटकी व अतिसार यांसारख्या आजारांवर उपयोगी ठरतात. कमळाचे बी ओकाऱ्या थांबवण्यासाठी, मुलांना लघवी होताना ज्वर साठी देतात.

तसेच त्वचा रोग आणि कुष्ठरोगावर कमळाचा बी याचा फार उपयोग होतो. यांची भुकटी करून मुळव्याध, अमांश, अग्निमाद्य इत्यादीवर गुणकारी असून नायटा व इतर त्वचारोगांवर लेप म्हणून लावतात.

कमळ फुल ज्ञानाचे प्रतीक The Lotus Flower Symbolizes Knowledge :

कमळाचे फूल हे धनाची देवी लक्ष्मी, ब्रह्मा, आणि विद्या ची देवी सरस्वती यांचे प्रतीक मानले जाते. तसेच धन आणि संपत्तीचे, सौंदर्याचे सुद्धा प्रतीक मानले जाते. ब्रह्मदेवा सोबत कमळ या फुलावर देवी सरस्वती विराजमान झालेली आहे.

म्हणून कामाला चे फुले ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये कमळाच्या फुलांना अत्यंत पवित्र स्थान आहे. कमळाच्या फुलांचा उपयोग विविध पूजा मध्ये केला जातो. ईजिप्शियन लोक कमळाच्या फुलाचा आणि सूर्याचा संबंध असल्याचे मानतात, त्यांच्या मते सूर्याचा उगम हा कमळापासून झालेला आहे त्यामुळे कमळाला उत्पत्तीचे प्रतीक सुद्धा मानले जाते.

 काही भागामधील लोक कमळाची लागवड करून त्याच्यावर उदरनिर्वाह सुद्धा करतात.

 कमळ फुलाच्या अशा बहुपयोगी गुणधर्मांमुळे आणि सौंदर्यामुळे भारत देशाने कमळ  फुलाला राष्ट्रीय पुलाचा दर्जा दिलेला आहे.

 निष्कर्ष Conclusion :

 कमळाचे फूल हे सौंदर्य, ज्ञान, कला, संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे कमळाच्या फुला तून आपल्याला सहनशीलता,  निर्मळता यांसारखे गुणांचे शिकवण मिळते.

 तर मित्रांनो ! ” कमळ या फुलांची माहिती मराठीLotus Flower Information in Marathi ” वाचून आपणास आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” Lotus Flower Information in Marathi ”  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद मित्रांनो !

1 Comment

  1. Kishor jadhav

    कमळाच्या फुलावर किती पाकळ्या आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *