आंब्याच्या झाडाची संपूर्ण माहिती मराठी । Information About Mango Tree in Marathi

Information About Mango Tree in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले Information Essay वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आंब्याच्या झाडाची संपूर्ण माहिती मराठी । Information About Mango Tree in Marathi “ घेऊन आलोत.

या वेबसाईट वरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आंब्याच्या झाडाची संपूर्ण माहिती मराठी । Information About Mango Tree in Marathi

आंबा हे फळ आपल्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे. सोबत सर्वांचे आवडते च सुद्धा फळ आहे. आपण सर्वांनी आंबा या फळाबद्दल सर्व माहिती माहितीच असेल. आपण सर्व आंब्या बद्दल ऐकूनच आहात पण तुम्हाला आंब्याच्या झाडा बद्दल माहिती आहे का?

आपल्यातील सर्वसामान्यांना आंब्याच्या झाडाची माहितीच नसेलं? शहरी भागातील लोकांना तर आंब्याचे झाड कसे असते ? त्याचे महत्त्व काय ? त्याबद्दल कोणालाही माहिती नसेल. म्हणूनच आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही आंब्याच्या झाडाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये ( Information About Mango Tree in Marathi ) घेऊन आलोत.

  • चला तर मग जाणून घेऊया, काय आहे आंब्याच्या झाडाची‌ माहिती :

आंबा हे फळ आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे. फळांचा राजा असे देखील म्हटले जाते. आंबा हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे वृक्ष आणि फळ आहे.

चवीला आंबट आणि गोड असणाऱ्या या फळाला कोकणचा राजा सुद्धा म्हणतात. मुख्यता उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या झाडाचे फळ पाहायला मिळते. आंब्याचा उगम कुठे झाला हे कोणालाही माहिती नाही तरी काही तज्ञांच्या नुसार, 250 ते 300 वर्षाचा इतिहास पाहता, आंबा या फळाचा उगम दक्षिण किंवा दक्षिण पूर्व आशिया मध्ये झाला असावा. कारण या प्रदेशांमध्ये आंब्याच्या विविध जाती व जैवविविधता पाहायला मिळते.

आंब्याच्या झाडाला आपण मराठीत आंब्याचे झाड म्हणत असलो तरी ,इंग्रजीमध्ये मॅन्गो ट्री असे म्हणतात. तर आंब्याचे शास्त्रीय नाव हे मॅजिफेरा इंडिका असे आहे.

आंब्याच्या झाडाच्या फळाला आंबा म्हणतात. जेव्हा हा आंबा कच्चा असतो तेव्हा त्याला कैरी म्हणतात‌.

आंब्याची झाडे ज्या ठिकाणी एकत्रित असतात किंवा समूहाने असतात त्याला अंबराई असे म्हणतात.

आंब्याच्या झाडाचे वर्णन Description of mango tree :

आंब्याचे झाड हे भारतात साधारणता सर्वत्र आढळते. आंब्याचे झाड हे साधारणत 35 ते 40 मीटर उंच असते. तर पूर्ण वाढ झालेल्या आंब्याच्या झाडाचा घेर हा दहा मीटरचा असतो. आंब्याचे झाडे दिसायला दाट आणि सदाबहार आसतात.तर आंब्याच्या झाडाची पाने एकाआड एक असे येतात.

आंब्याच्या झाडाचे पान हे 15 ते 35 सेंटिमीटर लांब तर, सहा ते सोळा सेंटिमीटर रुंद असते. आंब्याच्या झाडाची पाने हे कोवळी असताना फिकट गुलाबी किंवा लालसर रंगाचे असतात. तर आंब्याच्या झाडाची पाने जसे मोठे होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.

जेव्हा आंब्याच्या झाडांना फुले येतात त्याला “मोहोर”असे म्हणतात. आंब्याची फुले हे 10 ते 40 सेंटीमीटर लांबीच्या गुच्छा मध्ये येतात. तर प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून प्रत्येकी फुलाचा आकार हा पाच ते दहा मिलिमीटर एवढा असतो. आंब्याच्या झाडाला येणाऱ्या मोहराचा वास हा एक प्रकारचा मंद सुवासिक असतो.

आंब्याच्या झाडाचे फळ हे ” वनस्पती शास्त्रातील अश्मगर्भी फळ” या प्रकारात मोडते. या प्रकारात येणाऱ्या सर्व फळांच्या बाहेरील भागात गर आणि आत मध्ये कडक कवच असते. आणी या कवचाच्या आत मधी फळांचा बी असतो. आंब्याच्या झाडाच्या फळाच्या म्हणजेच आंब्याच्या या कवचाला ” कोय” असे म्हणतात.

आंब्याच्या झाडाच्या बऱ्याच जाती पडतात त्यानुसार ,आंब्याच्या फळाच्या आकारात वेगळेपणा येतो.

आंब्याच्या झाडाच्या फळाचा आकार हा साधारणपणे 10 ते 25 सेंटिमीटर लांब तर

त्याचा वास सात ते बारा सेंटीमीटर एवढा असतो. तर आंब्याचे वजन हे साधारणता पाच किलो पर्यंत असू शकते.

कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणता हिरवा असतो तर कैरी चवीला आंबट असते. जसजसा कैरी रे पक्वता येते तसंतसा कैरीचा रंग पिवळा किंवा केशरी पडायला लागतो.

आंबा हे झाड भारतात सर्वत्र आढळून येते तर काही ठिकाणी आंब्याची शेती सुद्धा केली जाते. भारतात मुख्यता ग्रामीण भागामध्ये आंब्याच्या झाडाचा वापर सावलीसाठी केला जातो.

आंब्याच्या झाडाचे महत्व Importance of Mango Tree :

आंब्याचे झाड हे शंभर-दोनशे वर्षापर्यंत जगू शकते आंब्याचे झाड हे डेरेदार असल्याने सावलीसाठी याचा उपयोग होतो. भारतामध्ये सगळीकडे आंब्याचे झाड पाहायला मिळते विशेषता कोकणामध्ये आंब्याच्या झाडाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. आपल्या देशात आंब्याच्या झाडाला खूप महत्त्व आहे.

आंब्याच्या झाडाचे लाकूड हे फर्निचर साठी वापरले जाते. या झाडाच्या लाकडापासून विविध वस्तू बनवल्या जातात.

आंब्याच्या झाडाचे धार्मिक महत्व Religious Significance of the Mango Tree :

आंब्याच्या झाडाला प्राचीन काळापासूनचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. कुठलेही धार्मिक काम करताना त्यामध्ये आंब्याच्या झाडाचा उपयोग होतो.

कुठल्याही शुभ प्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी आंब्याच्या झाडांच्या पानाचे तोरण करून घराला बांधणे हे शुभ मानले जाते. कलश पूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात. गुढी पाडवा या सणाला आंब्याच्या पानाला फार महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आंब्याच्या झाडाचे आयुर्वेदिक महत्त्व Ayurvedic Importance of Mango Tree:

आंब्याच्या झाडाला आयुर्वेदामध्ये ही खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आयुर्वेदानुसार लांब आंब्या पेक्षा गोल आंबे अधिक चांगले मानले जातात. तसेच बिना रेषेचे अधिक पिकलेले व पातळ सालीचे आंबे ज्यामध्ये अधिक गर असतो आणि लहान कोय असते असे आंबे उत्तम समजावेत.

आयुर्वेदानुसार आंब्याचा मोहर हा थंड रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि पित्त दूर करणारा समजला जातो.

उन्हाळ्यामध्ये अंगातून घाम येऊन अंगातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो, अशावेळी कैरी ठाणे किंवा कैरीचा सरबत करून पिणे शरीराला फायदेशीर ठरू शकतो. तसेच कैरीचा कीस एका कपड्यामध्ये बांधून तो कपडा डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याचा ताण कमी होतो. कैरीचा चूर्ण अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ केल्यास घामोळ्या येत नाही. तसेच कैरीचा चूर्ण हिरड्यांवर ती लावल्यास हिरड्याचा त्रास कमी होतो.

आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. आंब्यातील असे जीवन सत्व जंतुनाशक आहे तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे.

या सर्व गुणधर्मामुळे आंब्याच्या झाडाला विशेष प्रकारचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

आंब्याच्या झाडाचे उपयोग Mango Tree Uses in Marathi :

आंबा हे शरीराच्या दृष्टीने फायदेशीर आणि आरोग्यदायी फळ आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आंब्याच्या झाडाला येणारे फळ आंबा यामुळे आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडतीचा फळ असलेला आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यामध्ये आणि क जीवनसत्त्व असल्याने आंबा शरीरासाठी उपयुक्त आहे.

ग्रामीण भागामध्ये कच्च्या आंब्यापासून लोणचे बनवले जातात. आंबा हे फळ वर्षातून एकदाच बाजारात येते. परंतु, सध्याच्या काळात आंब्याचा ज्यूस वर्षभर मार्केटमध्ये पॅकिंग मध्ये आणि बाटली मध्ये उपलब्ध मिळतो. पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात किंवा फोडी करून खातात. राजपुरी कैऱ्या पासून मुरंबा बनविला जातो.

आयुर्वेदा आंब्याची साल, पाने फुले आणि फळे यांचा उपयोग त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्याकरिता होत आहे.

आंब्याच्या पानांचा उपयोग धार्मिक हिंदू कार्यक्रमात सजावटीसाठी करतात.

आज काल सर्वत्र आंब्याची शेती केली जात आहे.

शेतकरी आंब्याची शेती करून अधिक उत्पादन घेत आहेत. जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 56% आंब्याचे उत्पादन एकट्या भारतातून होते. आंब्याच्या तीनशेपेक्षा अधिक जाती भारतात आढळतात.

आंब्याच्या प्रसिद्ध जाती Famous Varieties of Mango :

आंब्याच्या भारतामध्ये तीनशेपेक्षा अधिक जाती आढळतात. वीस ते पंचवीस जाती या व्यापाऱ्यारिक दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात.

गुजरात राज्यातील केसर ही आंब्याची जात वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्र प्रदेशातील बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशातील दशेरी आणि लांडगा, दक्षिण भागातील नीलम, पायरी, मालेगाव या आंब्याच्या सुप्रसिद्ध जाती आहेत.

तर मित्रांनो ! ” Information About Mango Tree in Marathi “ वाचून आपल्याला आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Information About Mango Tree in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *