चिमणी पक्षी माहिती मराठी । Information About Sparrow in Marathi

Information About Sparrow in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” चिमणी पक्षी माहिती मराठी । Information About Sparrow in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

चिमणी पक्षी माहिती मराठी । Information About Sparrow in Marathi

भारतामध्ये सर्वाधिक जास्त संख्येने आढळणारा पक्षी म्हणजेच ” चिमणी. “ चिमणी पक्षी हा सर्वसाधारणपणे सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.

सर्वसाधारण मनुष्यवस्ती मध्ये चिमणी मुख्यता पाहायला मिळते. मानवी वस्त्यांमध्ये व घरांमध्ये आपले घरटे करून राहणारा एकमेव पक्षी म्हणजे चिमणी होय.

म्हणून चिमण्यांना माणसांजवळ राहणारा पक्षी असे सुद्धा ओळखले जाते. चिमण्या आकाराने खूप लहान असतात व त्यांचे घरटे ही तितकाच लहान असते.

परंतु अलीकडे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याने आजच्या पिढीला चिमण्या बद्दल पुरेशी माहिती नाही.

येणाऱ्या भविष्यकाळातील पिढीला चिमणी बद्दल माहिती असावी म्हणून

आम्ही आजच्या आर्टिकल ” Information About Sparrow in Marathi “ मध्ये संपूर्ण चिमण्या विषयी माहिती घेऊन आलो.

Information About Sparrow :

सर्वसाधारणपणे आपण जरी चिमणीला ” चिमणी “ मनात असलं तरी चिमणीचे शास्त्रीय नाव ” पॅसर डीमेस्टिकस ( Passer Demesticus ) “ असे आहे. टचमी ला इंग्रजी भाषेमध्ये ” स्पॅरो ( Sparrow ) “ असे म्हणतात.

चिमणी हा पक्षी वर्गाच्या ‘पॅसरीफॉर्मिस’ गणातील आणि पॅरेडी कुलातील पॅसर प्रजातीच्या 25 व्या जातींपैकी एक पक्षी आहे.

चिमणी हा मुळातील युरोप, भू मध्य प्रदेश व आशियातील असलेला हा पक्षी आता जगभर सर्वत्र पाहायला मिळतो.

कथा मानवी वस्तीजवळ आढळत असल्याने चिमणी पक्षाची सर्वत्र स्वाभाविक वाढ झाली आहे. भारतात हिमालयाच्या दोन हजार मीटर उंचीपर्यंतच्या सर्व भागांमध्ये चिमणी पक्षी आढळतो.

भारतात हा पक्षी चिमणी या सामान्य नावाने प्रसिद्ध असून याला ‘तपकिरी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.

चिमणीचा आकार जरी लहान असा असला तरी चिमणी अतिशय चातुर असते. माणसाची जराही चाहूल लागताच चिमणी भूरर् अशी उडते.

जगभरात चिमणीच्या एकूण चोवीस ( 24 ) प्रजाती पाहायला मिळतात. शहरी व ग्रामीण भागात आढळणारा चिमणाला ” घरेलू चिमणी “ असे सुद्धा म्हणतात.

चिमणी या पक्षाचे वर्णन कवितांमध्ये, बालकथा मध्ये आढळते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना चीमिया पक्षाकडे विशेष ओढ असते. चिमणीचे पसरलेले पंख हे माणसाला तिच्याकडे आकर्षित करतात. तसेच चिमणीचा “चिलचिव” आवाज आणि चिमणीची उड्डाण माणसाचे लक्ष सहजपणे तिच्याकडे वेधून घेते.

चिमणी चे वर्णन Description of Sparrow Bird :

सर्व साधारण पक्षाप्रमाणे चीमणी नर आणि मादी या स्वरूपात आढळते. नर चिमणीच्या कपाळाचा ,शेपटीचा आणि पार्श्वभाग राखाडी रंगाचा असून, काना जवळचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो तर चोच कळ्या रंगाची असते. कंठ ते छाती पर्यंतचा सर्व भाग गडद काळा रंगाचा असतो. डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी कळ्या रंगाच्या तुटक रेषा असतात. नर चिमणी चे पाय बारीक राखाडी रंगाचे असतात.

मादीची चिमणी मातकट रंगाचे असून तिच्या अंगावर काळ्या व तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. तर पाय बारीक राखाडी रंगाचे असतात.

चिमणीचे वजन जास्त नसून चिमणी 25 ते 35 ग्रॅम एवढ्या वजनाचे भरते. चिमणीच्या शरीराची लांबी ही केवळ 14 ते 16 सेंटीमीटर पर्यंत भरती. फूट 1,000 उंचीपर्यंत उडू शकते. चिमणी पक्षाचे आयुष्यमान हे केवळ दोन वर्षाचे असते. चिमणी पक्ष्यांचा विणीचा काळ हा 12 महिन्याचा असतो. चिमणी पक्षी एका वेळेला चार ते सहा अंडी देते.

चिमणीचे अन्न Food of Sparrow Bird :

चिमणी ही सर्वभक्षक पक्षी आहे. चिमणी साधारणता मनुष्य वस्ती मध्ये राहात असल्याने चिमणी सर्व प्रकारची धान्य, किडे, नाकतोडे, सुरवंट, कोळी, पिकांवरील आळ्या, कोवळ्या रोपांची शेंडे इत्यादी चिमणीचे खाद्य आहे.

तसेच शिजवलेले अन्न, कळसावरील दाणे चिमण्या आवडीने खातात. आपल्या पिलांना खाद्य भरविण्याचे काम नर व मादी दोघे मिळून आळीपाळीने करतात.

चिमणी या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात.

सन 1950 मध्ये चिमण्या चीन मधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामुळे चीनच्या सरकारने चिमण्यांना आणण्याचा आदेश दिला.

परंतु याचे परिणाम उलट झाले. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने चीन मध्ये इतर कीटक, मुंग्या आणि जीवजंतू यांचे प्रमाण वाढू लागले. हे कीटक चिमण्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करू लागले.

परिणामी चीन मधील लोकांना अन्नाची कमी व उपासमारीची जास्त दिवस आले.

चिमणीचे घरटे Nest of Sparrow Bird :

चिमणी आपले घरटे शक्यतो उंच झाडावर, इमारतींच्या छिद्रां मध्ये, एखादा कोपऱ्याला, छप्परावर, झुडपांमध्ये बनवतात.

चिमणी आपले घरटे मिळाल त्या वस्तू म्हणजेच वाळलेल्या गवताच्या काड्या, कापूस, दोरा, वायर, विविध पक्ष्यांची माऊ पिसे यांच्या पासून बनवतात.

याच घाटांमध्ये चिमण्या विणीचा हंगाम मध्ये चार ते सहा अंडी घालतात. चिमणीचे अंडे पांढरा रंगाचे असून त्यावर हिरव्या रंगाच्या छटा व तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

याच घारटामध्ये चिमणी अंडे उबवून आपल्या पिल्लांचे संगोपन करतात. पिलांना अन्न भरवण्याचे काम नर व मादी दोघे मिळून करतात. पिल्ले मोठी झाल्यानंतर त्यांना उडवण्याचे शिक्षण नर व मादी दोघे मिळून देतात.

चिमण्यांचे विविध प्रकार Different types of Sparrows Birds :

चिमण्यांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, ते म्हणजे न्यू वर्ल्ड चिमणी आणि जुनी जागतिक चिमणी. या दोन प्रकारातील काही चिमण्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1. हाऊस स्पॅरो ( House Sparrow Bird ) :

या चिमण्या मुख्यता ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आढळतात. या चिमण्यांना माणसांमध्ये राहायला फार आवडते. या चिमण्यांचे घरटे हे माणसांच्या घरांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे या चिमण्यांना हाऊस स्पॅरो असे म्हणत असावेत.

या प्रकारच्या चिमण्या आकाराने खूप लहान असतात व या चिमण्या तपकिरी रंगाचा असतात.

2. स्पॅनिश चिमणी ( Spanish Sparrow Bird ) :

 चिमण्या स्थलांतर रूपातील चिमणी आहेत. स्पॅनिश देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये मुख्यता या चिमण्या आढळतात.  या चिमण्या नेपाळ किंवा पाकिस्तान होऊन भारतीय उपखंडात स्थलांतरित करतात.

  या चिमण्या दिसायला पूर्णता हाउस स्पॅरो सारख्या असतात.

3. रूसेट चिमणी :

 रूसेट चिमणी ही मुख्यता हिमालयाच्या पूर्वेकडील भागात आढळते. त्या चिमण्यांचा रंग सुद्धा तपकिरी असतो. पाण  या चिमण्यांची खालची बाजू पिवळसर रंगाचे असते.

 रुसीट चिमणीला सॅनेमॉल किंवा सॅनेमाॅल ट्री चिमणी असेसुद्धा म्हणतात.

3. सिंध चिमणी :

 सिंध चिमण्या दक्षिण आशियामधील इंडस दरीमध्ये आढळतात आणि या चिमण्या दिसायला हाउस स्पॅरो सारख्याच दिसतात.ही चिमणी  दिसायला 13 सेंटिमीटर लांब असते.

4. सोमाली चिमणी :

 सोमाली चिमणी ही पेसरिडे जातींपैकी एक आहे. या  चिमण्या मुख्यता सोमाली लँड, इथिओपिया आणि केनिया या भागांमध्ये आढळतात. या चिमण्या दिसाला रुसेट चिमणी सारख्याच असतात.

5. साॅकोट्रा चिमणी :

साॅकोट्रा  चिमणी ही पेसरिन जाती पैकी एक आहे. या चिमण्यांची लांबी साधारण 14 सेंटीमीटर असते. तर या चिमण्यांचे वजन 20 ते 35 ग्रॅम एवढे असते. या चिमण्या झुडपांमध्ये घरटे करून राहतात.

चिमणी नष्ट होण्याची कारणे Causes of Sparrow Bird Destruction :

  आपल्याला माहिती आहे की, अलीकडील काळामध्ये चिमण्या ह्यात लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

 वाढती लोकसंख्या,उद्योगधंदे, प्रदूषण यांमुळे होणारे वृक्षतोड मुळे चिमण्यांना राहण्यासाठी जागा राहिल्या नाहीत.

 तसेचं,  शहरी भागांमध्ये झाडांची संख्या कमी असून मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. त्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा राहिलेली नाही.  कडे वापरल्या जाणारे मोबाईल्स मोबाईल चे टावर यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक  रेंज चिमण्यां वर डायरेक्ट इफेक्ट करतात.

 जेव्हा चिमण्या मोबाईलच्या रेंज मध्ये येतात तेव्हा त्यांचा जागीच मृत्यू होतो. त्यामुळे अलीकडे चिमण्यांची संख्या खूप कमी होत आलेली आहे.

 काही भागांमध्ये तर चिमण्या नामशेष झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये चिमणी संरक्षणासाठी ” 20 मार्च “ हा ” जागतिक चिमणी दिवस “ म्हणून साजरा केला जातो.  चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धन हा हेतू लक्षात घेऊनच सरकारने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.

 असे केल्याने सर्वांच्या मनामध्ये चिमण्या बद्दल थोडीशी आपुलकी निर्माण होऊन चिमण्यांच्या वाढीव इकडे लक्ष केंद्रित केले जाईल.

 तर मित्रांनो ! ” Information About Sparrow in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” Information About Sparrow in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद मित्रांनो !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *